मी २४ वर्षांची विवाहित महिला आहे. गेल्याच आठवड्यात सेक्स करताना कंडोम फाटले. तेव्हापासून मला गरोदर राहण्याची भीती वाटते. म्हणून माझ्या पतीने मला गर्भनिरोधक गोळ्या आणून दिल्या. त्या गोळ्या मी थोड्या वेळच्या अंतराने दोनदा घेतल्या. मला माहित आहे, मी असे करायला नको होते. पण मला गरोदर राहण्याची भीती वाटत होती. माझ्या मैत्रिणीने मला सांगितले की या गोळ्या हानिकारक असतात आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की मी जे केले ते योग्य होते का ?
या प्रश्नाचे उत्तर मुंबई येथील वाशीच्या वर्ड ऑफ वूमनच्या डिरेक्टर आणि स्त्रीरोग तज्ञ व फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. बंदिता सिन्हा यांनी दिले. जरूर वाचा: सेक्स दरम्यान कंंडोम फाटले तर काय करावे…
मी देखील तुमच्या मैत्रिणीशी सहमत आहे. कारण गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक दुष्परिणाम आहेत. हा गोळ्या फक्त इमर्जन्सी असल्यास घ्याव्या. याचा अर्थ असा नाही की सेक्स करताना तुम्ही बेसिक सुरक्षिततेचा विचार करणार नाही. गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? गर्भनिरोधक गोळ्या घेण्याऐवजी कंडोम वापरणे अधिक योग्य ठरेल. पण ते वापरताना या चुका टाळा. तुम्ही ‘ कंडोम’ वापरताना या ‘ 6 ‘ चुका करत नाही ना ?
एका ठराविक ब्रँडच्या गर्भनिरोधक गोळ्या सध्याच्या तरुण मुलींमध्ये खूप वापरल्या जातात. कारण त्याची जाहिरात प्रिंट मीडिया आणि टीव्ही वर सतत येत असतात. परंतु, खरे हे आहे की, माझ्याकडे अनियमित मासिक पाळी व हार्मोनल इम्बॅलन्सच्या समस्या घेऊन अनेक मुली येतात आणि याचे मुख्य कारण गर्भनिरोधक गोळ्या घेणे, हे असते. असुरक्षित सेक्सनंतर घ्या हे ’3′ खबरदारीचे उपाय !
एक गोळी घेतल्याने देखील तरुण मुलींमध्ये गंभीर स्वरूपाचे हार्मोनल बदल होतात. म्हणजे त्याहून अधिक गोळ्या घेतल्यास नक्कीच अधिक गंभीर दुष्परिणाम होतील. तसंच काही वेळा या गोळ्यांमुळे ओव्हरीयन सिस्ट होण्याची शक्यता असते. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे वंधत्व येते का?
मी तर असा सल्ला देईन की, सेक्स करताना काही चूक झाल्यास आणि गरज भासल्यावरच या गोळ्यांचा वापर करा. गर्भधारणा न होण्यासाठी एक गोळी पुरेशी आहे. म्हणून त्याचा ओव्हर डोस घेऊ नका. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो का ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock