फ्लावरसारखीच दिसणारी हिरव्या रंगाची ब्रोकोली ही भाजी आजकाल भारतीय बाजारपेठांमध्ये सहज उपलब्ध होते. दोघांची चव वेगवेगळी आहे. पण आपल्यापैकी अनेकांना ब्रोकोली म्हणजे हिरव्या रंगाचा फ्लॉवरच वाटतो. पण परदेशातून आलेली ही भाजी अधिक पोषक आहे का ? ब्रोकोलीचा आपल्या आहारात समावेश करावा का? याबाबतचा हा खास सल्ला आहारतज्ञ नेहा चंदना यांच्याकडून नक्की जाणून घ्या.
- ब्रोकोली की फ्लॉवर … काय आहे अधिक पोषक ?
ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन्ही एकाच प्रकारातील भाजी आहे. मात्र त्यामधील पोषणद्रव्य ही थोड्या फार फरकाने सारखीच आहेत फक्त त्याचे प्रमाण बदलते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के घटक असतात. तसेच कॅल्शियम, आयर्न, मॅग्नॅशियम, फॉस्फरस घटक फ्ल्वॉवरपेक्षा थोडे अधिक असतात.
या भाज्यांमध्ये डाएटरी फायबर्स आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक आढळतात. फ्ल्वॉवर आणि ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम घटक मुबलक असल्याने हृद्यविकाराच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. फायबर घटक अधिक असल्याने पचन सुधारायला मदत होते तसेच वजन घटवण्यासही फायदेशीर ठरतात.
पण ब्रोकोली की फ्ल्वॉवर यापैकी नेमके काय निवडावे असा तुम्हांला प्रश्न पडला असेल तर फ्ल्वॉवरपेक्षा ब्रोकोली अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये पोषक गुणधर्म अधिक आहेत. पण तुम्ही कॅलरी कॉन्शियस असाल तर ब्रोकोलीपेक्षा फ्ल्वॉवरमध्ये कॅलरीज कमी असतात. 100 ग्रॅम फ्ल्वॉवरमध्ये 25 कॅलरीज असतात तर तितक्याच ब्रोकोलीमधून 34 कॅलरीज मिळतात. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली खाणं खरंच सार्यांंसाठी आरोग्यदायी आहे का ?
- फ्ल्वॉवर ऐवजी ब्रोकोली खावे का ?
नेहा चंदनाच्या सल्ल्यानुसार, एखाद्या पदार्थाची गरज असेल तर फ्ल्वॉवरऐवजी ब्रोकोली वापरा.आहारात दोन्ही भाज्यांचा समावेश करून त्यामधून अधिकाधिक चांगले गुणधर्म मिळवण्याचा प्रयत्न करा. फ्ल्वॉवर किंवा ब्रोकोली तेलात शिजवण्यापेक्षा वाफवून खाणं अधिक फायदेशीर आहे. उकळून नव्हे तर वाफवून खाल्ल्याने त्यामधील पोषणद्रव्य टिकून राहण्यास मदत होते.
ब्रोकोली किंवा फ्ल्वॉवर चांगल्या बाजारपेठेतून / भाजी मंडईतून विकत घ्या कारण त्यामध्ये कीडे असण्याची शक्यता दाट असते. भाजी किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये त्याचा वापर करण्यापूर्वी मीठ टाकलेल्या गरम पाण्यामध्ये किमान 5-10 मिनिटं फ्ल्वॉवर किंवा ब्रोकोली भिजवून ठेवा. म्हणजे त्यामध्ये काही किडे असल्यास ते बाहेर पडतील. क्वालीफ्लावरच्या पानांमध्ये दडलेत आरोग्यदायी गुणधर्म !
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock