Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Schizophrenia बद्दलचे ८ समज-गैरसमज !

$
0
0

मानसिक समस्या किंवा मानसिक परिस्थिती बद्दल जनजागृतीचा नसणे तसेच त्याबाबत असलेले अनेक समज-गैससमज यामुळे मानसिक समस्या अधिक गंभीर होतात.मानसिक विकारांबाबतचे हे गैरसमज दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत कारण त्याबद्दल कोणीही तर्कशुद्ध पद्धतीने विचारच करत नाही.या गैरसमाजांमुळे तज्ञांना देखील रुग्णावर उपचार करणे कधीकधी फारच कठीण जाते.

सामान्य जनतेमध्ये स्किझोफ्रेनिया या आरोग्य स्थितीबाबत देखील अनेक गैरसमज आहेत.काही लोकांना असे वाटत असते की या आरोग्य स्थितीतील माणसे स्प्लीट पर्सनॅलीटीची किंवा असक्षम पालकत्व असेलेली किंवा आत्मविश्वासाचा अभाव असलेली असतात.पण सत्य परिस्थिती यापेक्षा फार वेगळी आहे.जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त या गोष्टी जाणून घेऊयात याबाबत लोकांच्या मनात असलेले काही समज व गैरसमज.

तसेच ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !देखील जरुर वाचा.

१.पालकांच्या निष्काळजीपणामुळे स्किझोफ्रेनिया होतो.

स्किझोफ्रेनिया होण्यामागे अनेक कारणे असतात त्यापैकी एक कारण अयोग्य पालकत्व देखील असू शकते पण याचा अर्थ फक्त त्यामुळेच हा विकार होतो असे नाही.या विकाराचे खरे कारण जाणून घेण्यासाठी अनेक जेनेटीक,न्यूरो डेवलपमेंटल मॉडेलचा वापर करण्यात अाला पण तरी देखील या आजारामागील गुढ अजूनही कायमच आहे.हा विकार वैश्विक असून जगभरातील एक टक्का लोकसंख्या या विकाराने त्रस्त आहे.चुकीच्या पालकत्वामुळे पर्सनालिटी डिसॉर्डर,डिप्रेशन,व्यसनांच्या आहारी जाणे किंवा मानसिक विकार होऊ शकतात पण त्यामुळे स्किझोफ्रेनिया हा विकार होत नाही.

२.स्किझोफ्रेनिया रुग्ण मल्टीपल पर्सनालिटीचे असतात.

असा एक सामान्य समज आहे की स्किझोफ्रेनिया ग्रस्त रुग्ण स्प्लीट पर्सनालिटीचे असतात. स्प्लीट पर्सनालिटी म्हणजे एकच व्यक्ती निरनिराळ्या परिस्थितीमध्ये दोन वेगळ्या व्यक्तीमत्व असल्यासारखी वागत असते.पण खरेतर हे रुग्ण सत्य परिस्थिती विसरल्यामुळे भ्रम अथवा आभासी विश्वात जगत असतात.सहाजिकच याचा परिणाम त्यांच्या सामाजिक जीवनावर होत असतो.अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं देखील जरुर जाणून घ्या.

३.स्किझोफ्रेनिया रुग्ण मतिमंद असतात.

स्किझोफ्रेनिया रुग्णांना संवाद साधणे व लक्षात ठेवण्यासाठी काही वेळा समस्या येतात पण असे असले तरी ते सामान्य बुद्धीमत्तेचे असतात.अनेक क्रिएटीव्ह व हुशार माणसे या समस्येने त्रस्त असूनही त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेली आहेत.

४.स्किझोफ्रेनिया रुग्णांना घरात उपचार करता येत नसल्यामुळे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज असते.

पुर्वी कोणताही मानसिक विकार झाल्यास त्या रुग्णाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जायचे व संपुर्ण आयुष्य या रुग्णांना तिथेच रहावे लागायचे.पण आजकाल अनेक प्रगत औषधांमुळे बहुतेक रुग्णांना घरीच मानसिक उपचार देता येतात व हे उपचार घेताना ते त्यांच्या कुटूंबासोबत राहू शकतात व नोकरी देखील करु शकतात.

५.स्किझोफ्रेनिया रुग्ण हिंसक असतात व त्यांच्यापासून समाजाला धोका असू शकतो.

स्किझोफ्रेनिया रुग्ण कधीकधी अनपेक्षितपणे वागतात पण ते क्वचितच हिंसक असू शकतात.उलट एखाद्याला त्यांच्यामुळे नुकसान होऊ शकते या भ्रमातून ते ब-याचदा एकटे व अलिप्त रहातात.स्किझोफ्रेनिया समस्येमधील हिंसाचार याचा सबंध मद्यपान किंवा इतर व्यसनांशी असू शकतो.दुर्देवाने स्किझोफ्रेनिया रुग्णांनी स्वत:वरच हिंसाचार करणे सामान्य लक्षण असू शकते कारण या समस्येमध्ये १० टक्के रुग्ण आत्महत्या करुन मरण पावतात.त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हिंसाचारापेक्षा आत्मघातकी विचारांबाबत सावध रहाणे गरजेचे आहे.यासाठी आत्महत्येच्या विचार करणा-या लोकांना त्यापासून परावृत्त कसे कराल?हे जरुर वाचा.

६.स्किझोफ्रेनिया रुग्ण काम करु शकत नाहीत व ते आळशी होतात.

आजारापणामुळे अशा रुग्णांना स्वत:ची काळजी घेणे व कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाऊ शकते.योग्य औषधोपचार व आधारामुळे अनेक रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात व करीयरमध्ये देखील यशस्वी होऊ शकतात.

७.कालांतराने स्किझोफ्रेनिया या समस्येवरील औषधोपचारांचा काहीही फायदा होत नाही.

स्किझोफ्रेनिया बाबत असलेल्या गैरसमजांपैकी हा एक विध्वंसक गैरसमज आहे.कारण त्यामुळे हे औषधोपचार तात्पुरते असल्याचे दर्शविले जाते जे फारच निराशाजनक आहे.खरेतर मानसोपचारांमधील औषधे ही नेहमी ट्रायल-अॅन्ड-एरर प्रयत्नांवर वापरण्यात येतात.तसेच ही औषधे व त्यांचे डोसेस रुग्णाची बॉडी केमिस्ट्री, जीवनशैली, डाएट, वय व इतर काही घटकांनूसार बदलण्यात येऊ शकतात.

८.स्किझोफ्रेनिया हा विकार बरा होऊ शकत नाही.

स्किझोफ्रेनिया हा विकार कधीच पुर्ण बरा होऊ शकत नाही हे जरी सत्य असले तरी योग्य उपचार व जीवनशैलीत केलेले चांगले बदल यामुळे स्किझोफ्रेनिया रुग्ण त्यांच्या कुटूंबासह सामान्य आयुष्य नक्कीच जगू शकतात.ब-याच रुग्णांना त्यांच्या लक्षणानूसार देण्यात येणा-योग्य औषधोपचारांमुळे चांगले आयुष्य जगता येेऊ शकते.डीप्रेस मूड सुधारायला आहारात करा हे बदल !देखील जरुर वाचा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>