उन्हाळ्यात सतत येणारा घाम आणि उष्णतेचा त्रास सार्यांनाच त्रासदायक असतो. पण मधूमेहींसाठी उन्हाळा तर अजूनच त्रासदायक ठरतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधूमेहींनी स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचे आहे. म्हणूनच मधूमेहींनी उन्हाळ्यात स्वतःची कशाप्रकारे काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध मधूमेहतज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी दिलेला सल्ला नक्की जाणून घ्या.
1. मुबलक पाणी प्या -
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील क्षार आणि अनेक पोषणद्रव्य कमी होतात. त्यामुळे सतत पाणी पिण्याची सवय ठेवा म्हणजे डीहायड्रेशनचा त्रास वाढणार नाही. पण प्रामुख्याने मधूमेहींनी सतत पाणी पिण्याची सवय ठेवा. कारण त्यांच्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास डीहायड्रेशनचा त्रासही वाढतो. मधूमेहींची रोगप्रतिकारशक्ती खालावल्याने gastroenteritis चा त्रासही बळावण्याचा धोका असतो. असे गाडगे सांगतात. दिवसभरात 2-3 लीटर पाणी मधूमेहींनी पिणे आवश्यक आहे. या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !
2. शीतपेयांचा मोह टाळा –
उन्हाळ्यात बाहेर फिरताना खाण्या-पिण्यावरही नियंत्रण ठेवा. या दिवसात तहान लागण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शीतपेयांमुळे तुम्हांला थंड वाटत असले तरीही हे आरोग्यासाठी त्रासदायकच ठरू शकते. मधूमेहींची खालावलेली रोगप्रतिकारशक्ती अशा शीतपेयांच्या सेवनामुळे सर्दी, खोकला, सोअर थ्रोट असा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरते. ज्या मधूमेहींना ब्रोन्क्रायटीसचा त्रास असेल त्यांच्यामध्ये शीतपेयाचे सेवन अधिक त्रासदायक ठरू शकते. अशा आजारांवरील उपचारांमध्ये स्टिरॉईडचा वापर केला जात असल्याने मधूमेहींची रक्तातील साखर आणि त्यावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. असा सल्ला डॉ. गाडगे यांनी दिला आहे. हा त्रास अल्कोहोलिक आणि धुम्रपान करणार्या मधूमेहींमध्येही आढळतो.उन्हाळ्यात हे ’5′ पदार्थ खाताना विशेष काळजी घ्या !
3. उन्हात बाहेर पडू नका -
तीव्र उन्हात म्हणजेच किमान दुपारचे 11 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळा. लहानसे स्किन इंफेक्शन देखील अशा दिवसात तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे स्किन इंफेक्शन असणार्या मधूमेहींनी उन्हाळ्यात कटाक्षाने पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. उन्हाळ्यात आरोग्य जपण्यासाठी आहारात कराच हे बदल
4. नियमित डोळे तपासा -
मधूमेहींमध्ये ग्लुकोमा किंवा diabetic retinopathy चा त्रास आढळतो. हा त्रास असलेल्या मधूमेहींमध्ये वातावरणातील बदलामुळे आय इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे उन्हाळ्यातही हमखास डोळ्यांची तपासणी करा. जाणून घ्या वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार
5. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवा -
ऋतू कोणताही असला तरीही रक्तातील साखरेचे पातळीवर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. त्यावर नियंत्रण असलंच पाहिजे. तुम्ही इन्सुलिन पंप वापरत असाल तर काळजी घ्या. हा पंप अनेकजण कारमध्येच विसरतात. त्यामुळे तो खराब होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे पंप वापरणे अधिक त्रासदायक ठरतात. त्यामुळे तुम्ही वापरत असलेली डिव्हाईस काळजीपूर्वक वापरा किंवा नियमित रक्ताची चाचणी करून ब्लड शुगरवर लक्ष द्या. मधूमेहींनो ! बिनधास्त घ्या आंब्याचा आस्वाद – ऋजुता दिवेकर
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock