उन्हाळ्यात घामामुळे तुमचे बाळ अधिक अस्वस्थ व चिडचिडे होते त्यात सतत येणा-या घामामुळे बाळाला घामोळे देखील येऊ शकतात.घामोळ्यांच्या त्रासामुळे बाळ रडारड करुन हैराण होते.
तुमच्या बाळाला या उन्हाळ्यामध्ये घामोळ्यांपासून वाचविण्यासाठी इंटरनॅशनली सर्टिफाइड प्रेगन्सी,लेक्टेशन व चाईल्ड न्यूट्रीशन काउंसलर सोनाली शिवलानी यांच्याकडून जाणून घ्या या काही एक्सपर्ट टीप्स.तसेच उन्हाळ्यामध्ये बाळाची काळजी घेण्यासाठी ६ टीप्स देखील जरुर वाचा.
तुमच्या बाळाला नेहमी योग्य प्रकारचे कपडे घाला-
बाळाला उन्हाळ्यामध्ये नेहमी मोकळे व हलक्या रंगाचे सुती कपडेच घालावेत.लक्षात ठेवा सुती कापडाऐवडी इतर कापडाच्या कपडे घातल्यास ते बाळाच्या त्वचेवर घासले जाऊन घामोळ्यांचा त्याला जास्त त्रास होऊ शकतो.यासाठी उन्हाळ्याचे काही दिवस तुमच्या बाळाला अशा फॅन्सी सॅटीनच्या ड्रेसपासून दूर ठेवा व त्याला फक्त सुती व आरामदायक असेच कपडे घाला.तसेच बाळाला मोजे घालून झोपवणे योग्य आहे का?हे देखील वाचा.
बाळाला टाल्कम पावडर लावणे टाळा-
टाल्कम पावडर बाळाला लावणे टाळावे असे सांगण्यात येते.कारण या पावडरमधील केमिकल्स तुमच्या बाळाच्या नाजूक त्वचेसाठी हानिकारक असू शकतात.पावडर मुळे तुमच्या बाळाची त्वचा कोरडी होते.पावडरमुळे बाळाच्या त्वचेवरील आद्रता शोषली जाते.यामुळे बाळाची त्वचा कोरडी झाल्याने त्या ठिकाणी अधिक खाज येऊ लागते.त्यामुळे बाळाला पावडर लावण्याऐवजी त्याची घामोळे आलेली त्वचा दिवसभरात काही वेळा स्वच्छ धुवा व हळूवारपणे पुसून कोरडी करा.बाळाला मसाज करणे योग्य की अयोग्य ?जरुर जाणून घ्या.
बाळाला नियमित अंघोळ घाला-
बाळाचे खेळणे,मस्ती करणे यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याला घाम येतो.घामामुळे त्वचा अधिक संवेदनशील बनते.घामावर धुळ बसल्यामुळे घामोळ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होते.यासाठी बाळाला सकाळी व संध्याकाळी नियमित अंघोळ घाला.
जर तुम्हाला बाळाला दोन वेळा अंघोळ घालणे शक्य नसेल तर तुम्ही त्याला एखाद वेळी थंड पाण्याने पुसून काढू शकता ज्यामुळे तुमचे बाळा उन्हाळ्यामध्ये देखील स्वच्छ व स्वस्थ राहील.डी-हायड्रेशन पासून बचावण्यासाठी खास ’9′ टीप्स !देखील अवश्य वाचा.
बाळाला सुगंधी साबण व लोशन लावू नका-
लक्षात ठेवा ज्या प्रॉ़डक्ट्स मध्ये सुवास अथवा रंग मिसळलेले असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे घटक असतात.त्यामुळे बाळाला घामोळ्यांपासून वाचविण्यासाठी तुम्ही हे प्रॉडक्टस बाळासाठी वापरणार असाल तर त्याला याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते.कधीकधी तर यामुळे घामोळे वाढून समस्या अधिकच गंभीर देखील होऊ शकते.यासाठी अशा प्रॉ़डक्टस पासून बाळाला दूर ठेवा.त्याऐवजी बाळाला बाहेर नेताना तुमच्या पिडीयाट्रिशनच्या सल्लानूसार एखादे बेबी फ्रेन्डली सनस्क्रीन लोशन नक्कीच वापरु शकता.यासाठी वाचा लहान मुलांसाठी साबण आणि शाम्पू वापरायला सुरवात कधी कराल ?
पिडीयाट्रिशनची मदत घ्या-
जर तुमच्या बाळाचे घामोळे फारच वाढले व त्यामुळे तुमचे बाळ काही खात-पित नसेल किंवा चिडचिड करत असेल तर यासाठी तुमच्या पिडीयाट्रिशनचा सल्ला जरुर घ्या.त्यांच्या सल्लानूसार या घामोळ्यांवर लावण्यासाठी एखादे योग्य क्रीम अथवा लोशन घ्या.तसेच तुमच्या बाळाला सतत हायड्रेट ठेवा.त्याला असे अन्न देऊ नका ज्यामुळे त्याच्या शरीरातील उष्णता अधिक वाढेल.कारण अशा पदार्थांमुळे त्याला घामोळ्यांचा त्रास अधिक होऊ शकतो.तसेच जाणून घ्या बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock