व्हेकेशनवर असताना तुम्हाला निश्चितच आरामदायक व उत्साही वाटत असते.पण या आरामासोबत तुमचे वजन देखील काही किलोने नक्कीच वाढू शकते.कारण सुट्टीवर असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाता-पिता ज्याचा परिणाम थेट तुमच्या वजनावर पडू लागतो.पण या काही सोप्या युक्ता करुन तुम्ही सुट्टीत देखील तुमच्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता.यासाठी पोटभर खा पण जाड न होता!हे जरुर वाचा.
देशभरात आउटलेट असलेल्या Prettislim या स्लीमींग अॅन्ड बॉडी-शेपींग क्लिनीक चे CMD डॉ.पुनीत नायक यांच्यामते जाणून घेऊयात सुट्टीत देखील वेट लॉस गोल्स साध्य करण्यासाठी या काही सोप्या टीप्स.
व्हेकेशनवर असताना तुमच्या जेवणाचे नियोजन कसे कराल?
व्हेकेशनवर असताना तुमच्या समोर अयोग्य पदार्थ खाण्या-पिण्याच्या अनेक संधी येतात.सुट्टीवर असताना दैनंदिन चिंतेसोबतच वजन वाढू नये यासाठी खाण्या-पिण्याबाबत पाळायचे नियम देखील तुम्ही चक्क विसरुन जाता.त्यामुळे कदाचित या मौजमजेसह तुमचे वजन देखील वाढू शकते.पण खाण्या-पिण्याबाबत काही गोष्टींचे नियोजन केले तर तुम्ही सुट्टीत मजा करताना देखील तुमच्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता.
-
इंटरनॅशनल फ्लाइटमधील फ्री अल्कोहोल तुमचे वजन वाढवू शकते.कारण या माध्यमातून तुम्ही तुमच्या कॅलरीज वाढवत आहात हे तुमच्या लक्षातच येत नाही.वजन वाढू नये यासाठी कमी प्रमाणात मद्यपान करा.
-
सतत पाणी मागवा व ते थोड्या-थोड्या वेळाने नियमित प्या.
-
फ्लाइट मेन्युमधील सर्वच पदार्थ खाण्याची गरज नाही.हाय फॅट व हाय कार्ब असलेले पदार्थ खाणे टाळा.ज्यामध्ये कमीतकमी कॅलरीज असतील असेच पदार्थ खा.
-
चांगल्या पद्धतीने शिजवलेले पदार्थ खाण्यासाठी निवडा.उदा: डीप फ्राय पेक्षा ग्रील व बेक केलेले पदार्थ खा.जर तुम्ही एखादा नवीन पदार्थ खाणार असाल तर त्याआधी वेटरला तो हेल्दी आहे का हे विचारण्यासाठी संकोच बाळगू नका.
-
उपाशी पोटी हॉटेलमधून बाहेर पडू नका कारण त्यामुळे बाहेर तुम्ही एखादा अनहेल्ददी पदार्थ खाण्याची शक्यता वाढते.
-
जर तुम्ही हेवी लंच केला असेल तर रात्री हलका डिनर घेण्याचा प्रयत्न करा.
-
हळूहळू खाण्याने तुमचे पचन तर चांगले होतेच पण यामुळे तुम्ही कमी प्रमाणात देखील जेवता.
-
दिवसभर खूप चिप्स किंवा कोला असे पदार्थ घेतल्यास नेहमीपेक्षा २० टक्के कमी जेवण करा.
-
बुफे जेवण टाळा कारण अशा जेवणामुळे तुमचे वजन वाढू शकते.
-
डेजर्टसाठी इतर कॅलरीज वाढवणारे पदार्थ खाण्याऐवजी फळे खा.
तसेच रोड ट्रीप च्या प्रवासामध्ये आरोग्यदायी जेवणाची निवड कशी कराल ?हे देखील अवश्य वाचा.
जर तुम्हाला हवे असेलेले पदार्थ तुमच्या हॉटेलमध्ये नसतील तर काय कराल?
ब-याच हॉटेलच्या रुममध्ये मिनी फ्रीज असतात.त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये अनहेल्दी पदार्थ खावे लागणार असतील तर जवळच्या एखाद्या सुपरमार्केटमधून काही फळे,भाज्या व योगर्ट असे पदार्थ आणा व रुममधील फ्रीजमध्ये ठेवा.तसेच काही हॉटेलच्या रुममध्ये छोटे किचन देखील असते.असे असल्यास तुमच्यासाठी एखादा हेल्दी पदार्थ तुम्ही तिथे शिजवून खाऊ शकता.त्याचप्रमाणे तुमच्या हॉटेल स्टाफकडे हेल्दी फूड बनविण्यासाठी मागणी करण्यास अजिबात संकोच बाळगू नका.ब-याच हॉटेलमध्ये तुमच्या मागणीनूसार जेवण करुन दिले जाते.
प्रवास करताना सुरक्षित व सहज उपलब्ध असलेले योग्य अन्नपदार्थ कोणते?
तुम्ही प्रवास करताना तुमच्या सोबत काही ड्रायफ्रुट नक्कीच घेऊन जाऊ शकता.किंवा एखादा लो-कॅलरी स्नॅक्स अथवा हाय-फायबर बिस्किट्स,हाय-प्रोटीन बार देखील तुम्ही प्रवासात सोबत घेऊन जाऊ शकता.एखाद्या आर्टिफिशल कलर अथवा फ्लेवरच्या स्पोर्ट ड्रींकपेक्षा रसाळ फळे व भाज्या तुम्हाला अधिक ताजे ठेऊ शकतात.याचा आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये कॅलरीज कमी असतात व त्यामुळे तुमचे पोट लगेच भरते.
फळे तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतात.यासाठी तुम्ही रिजनल व सिजनल असे फळांचे निरनिराळे प्रकार खाऊ शकता.तसेच सफरचंद,पिअर या कमी कॅलरीज असलेल्या फळांना तुम्ही प्रवास करताना देखील सहज सोबत घेऊन जाऊ शकता.वजन घटवण्याचा अस्सल भारतीय ‘डाएट प्लान’देखील जरुर जाणून घ्या.
व्हेकेशनवर असताना वर्कआउट कसे करावे?
जरी तुम्ही सुट्टीवर असला तरी तुम्ही तुमच्या फीटनेसकडे दुर्लक्ष करता कामा नये.यासाठी तुम्ही घेतलेल्या एक्ट्रा कॅलरीजला बर्न करण्यासाठी या काही सोप्या टीप्स जरुर करा.
-
अनेक हॉटेल्स अथवा रिसॉर्टमध्ये जीम,फीटनेस सेंटर किंवा स्विमींगपूल या सुविधा उपलब्ध असतात या सुविधांचा वापर करा.
-
ताज्या हवेसाठी समुद्रकिनारी अथवा डोंगरमाथ्यावर फिरायला जा.
-
थोडेसे अंतर चालण्यामुळे तुमचा व्यायाम तर होईलच पण ते ठिकाण देखील तुम्ही नीट पाहू शकाल.
-
जर तुमच्या हॉटेलमध्ये नाइट क्लब असेल तर क्लबमध्ये डान्ससाठी जा.ज्यामुळे तुमचा वेळ मजेत जाईल व आपोआप थोडासा व्यायाम देखील होईल.
-
सुट्टीवर असताना तुमच्या मुलांसोबत अनेक आऊटडोअर गेम्स खेळा.ज्यामुळे व्यायामासोबतच तुमचे फॅमिली बॉडींग देखील वाढेल.
तसेच परदेशी फिरायला जाताना ही औषधे नक्की सोबत ठेवा!
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock