Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पर्सनल ट्रेनर अथवा डाएटीशन शिवाय या मुलीने ४५ किलो वजन कमी केले

जर तुम्हाला अतिवजनामुळे शाळेत अथवा कॉलेजमध्ये ‘मोटी’ अथवा ‘अान्टी’ असे चिडवले जात असेल तर मुंंबईतील २४ वर्षीय रेश्मा बेदीची ही वेट लॉस कहाणी जरुर वाचा.रेश्मा सांगते की ती लहानपणापासूनच लठठ् दिसायची.तिच्या घरातील सर्वच मंडळी अगदी तिचे आई-वडील व बहीण देखील लठठ्च आहेत.तसेच रेश्माला जंक फू़ड फार आवडत असल्याने ती ते कधीही व कितीही प्रमाणात खात असे.तसेच बाळंतपणानंतर २८ किलो वजन कमी करणा-या महिलेची प्रेरणादायी कहाणी ! देखील जरुर वाचा.

Image may be NSFW.
Clik here to view.
reshma in hindi.-300x162

रेश्माचा अतिवजन असतानाचा प्रवास-

रेश्मा सांगते, “सतत लोकांनी अतिवजनावरुन चिडवल्यामुळे मी एक रागीट व उद्धट व्यक्ती झाले होते.जे जे लोक मला चिडवत असत त्यांना मी उलट उत्तर देत असे.माझ्या क्लासमेट्सनी मी क्लासमध्ये गेल्यावर माझे बुलींग करणे हे माझ्यासाठी नित्याचेच झाले होते.मी दहावीत असताना माझ्या  मैत्रिणी मला सतत माझ्या अतिवजनावरुन चिडवत असल्यामुळे मी एकदा भयंकर निराश झाले होते.शेवटी माझ्या टीचरला यामध्ये हस्तक्षेप करुन मला यातून बाहेर काढावे लागले.माझे लहानपणीचे आयुष्य मी हे अशाच पद्धतीनेच घालवले होते.”

या नकारात्मक परिस्थितीचा रेश्माच्या आत्मसन्मानावर विपरित परिणाम झाला.त्यामुळे रेश्मा लोकांमध्ये मिसळणे किंवा नवीन ओळखी वाढवणे टाळू लागली.तिच्या साइजचे चांगले कपडे मिळत नसल्यामुळे ती सुंदर देखील दिसत नव्हती.यावर उपाय म्हणून तिने जीमला जाणे सुरु केले.पण महागडया जीम मेंबरशिपमुळे तिला तिथे जाणे बंद करावे लागले.वर्षोनवर्ष रेश्मा तिचे नाव जीममध्ये रजिस्टर करीत असे,वर्षातून एकदा-दोनदा जीममध्ये जात असे व पुन्हा तिची जीम मेंबरशिप रद्द होत असे.रेश्माचे वजन ११५ असण्यामागे तिचा आळशीपणा,प्रोत्साहन व वेळेचा अभाव ही देखील इतर काही कारणे होती.तिच्या लोकल जीममधून देखील तिची मेंबरशिप रद्द करण्यात आली कारण ती कधीच नियमित जीमला जात नसे.सहाजिकच तिच्या आईवडीलांनी देखील तिला जीमसाठी पैसे देणे बंद केले.वजन कमी करण्यासाठी तिने ती १७ वर्षांची असताना जीएम डाएट,कोबी सूप डाएट व रॉ फूड डाएट करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.यासाठी जाणून घ्या जीम बंद झाल्यानंतर घटवलेले वजन पुन्हा वाढते का ?

Image may be NSFW.
Clik here to view.
IMG_3772-1-300x16

तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली-

रेश्माच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला ज्यामुळे रेश्माने वजन कमी करणे मनावर घेतले.रेश्मा सांगते, “२०१४ साली मी कॉलेजमधून घरी येत होते व रस्तावर खेळणा-या काही शाळकरी मुलांनी निरागसपणे मला ‘आन्टी’ अशी हाक मारली.त्या मुलांनी माझ्या फ्रेन्डससमोरच मला अशी हाक मारल्यामुळे मला प्रचंड लाज वाटली.त्याच क्षणी मी निर्णय घेतला की मला माझ्या वजनाबाबत काहीतरी करणे अत्यंत गरजेचे आहे.”

तिच्या क्लासमधील एका मैत्रिणीने तिला वेटलॉस केल्याचा पुरावा दाखवणारा फोटो दाखवणे हे देखील रेश्माला प्रोत्साहन देणारे ठरले.

त्यानंतर रेश्माने पुन्हा जीमला जाणे सुरु केले.पण यावेळेस मात्र तिने वजन कमी करण्याचा मनात पक्का निर्धार केला.पुर्वी तिने कधीच एखाद्या विशिष्ट वर्कआउटवर फोकस केले नव्हते कारण तिला एक्सरसाइज बाबत पुरेशी माहितीच नव्हती.पण यावेळेस मात्र तिने वर्कआउट शिकण्यास सुरुवात केली.दोन महिन्यानंतर ती तिचे रुटीन व्यवस्थित फॉलो करु लागली आणि तिच्या वेटलॉसच्या प्रवासाला सुरुवात झाली.जिममध्ये न जाता, या मुलीने ‘८’ महिन्यांत घटवले 23 किलो वजन !हे देखील अवश्य वाचा.

रेश्माने स्वत:च वर्कआउटवर मेहनत घेतली-

कोणत्याही पर्सनल ट्रेनरची मदत न घेता रेश्मा तिच्या मनाप्रमाणे वर्कआउट करु लागली.यासाठी सुरुवातीला ती आठवड्यातून तीनदा फुल बॉडी वर्कआउट व कार्डिओ करीत असे.त्यानंतर ती आठवड्यातून चारदा वेट ट्रेनिंग व कार्डिओ करु लागली.काही वेळा ती दिवसातून दोन वेळ वर्कआउट करीत असे.

२०१५ साली तिला एक गंभीर दुखापत झाल्यामुळे तिच्या वेट लॉस ध्येयामध्ये काही काळ व्यत्यय आला.पण याकाळात जरी तिने बेड रेस्ट करीत असतना योग्य व पोषक आहारावर कटाक्षाने भर दिला.त्यामुळे वर्षांच्या अखेरीला रेश्माचे २० किलो वजन कमी झाले.

रेश्मा सांगते की यामुळे तिच्यामध्ये एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला व तिचे बॉडी पोश्चर देखील सुधारले.त्याच प्रमाणे ती तिच्या फॅमिलीला देखील व्यायाम करण्यासाठी व पोषक आहार घेण्यासाठी प्रोत्साहीत करु लागली.

सध्या रेश्मा तिच्या आई व बहिणीसह स्विमींग क्लासला जाते.तसेच ती क्रॉस फीट,स्ट्रेंथनींग,कंडीशनींग,किकबॉक्सिंग व इतर एमएमए देखील करते.दोन वर्षांनंतर आता देखील तिचा वजन कमी करण्याचा प्रवास सुरुच आहे.आता रेश्माचे वजन ७० किलो आहे.

Image may be NSFW.
Clik here to view.
FullSizeRender-2-300x16

रेश्माने स्वत:साठी तयार केलेला हेल्थी डाएट प्लॅन-

रेश्मा एक बायोटेक्नॉलॉजीची स्टुडंट आहे त्यामुळे तिला आहाराबाबत बरेच ज्ञान आहे.वजन कमी करण्यासाठी तिने स्वत: अभ्यास करुन तिचा डाएट प्लॅन तयार केला आहे.

ती दोन डाएट प्लॅन फॉलो करते-

१. Intermittent fasting साठी तिला तिच्या ‘खाण्याची वेळ’ आठ तासांवर मर्यादित ठेवावी लागली.हा सोळा तास रिकाम्या पोटी असण्याचा काळ असतो.रेश्मा आठवड्यातून तीन वेळा असे करते.तिच्यामते यामध्ये खाण्याच्या वेळेवर मर्यादा येत असल्यामुळे तुम्हाला बहूतेक वेळा पोट भरलेले असल्यासारखे वाटत राहते व त्यामुळे तुम्ही कॅलरीजवर नियंत्रण मिळवू शकता.

२.ती आठवड्यातून ४ वेळा कार्ब सायकलींग फॉलो करते.यासाठी रेश्मा सांगते की ती अंडी व भाज्या असलेला नास्ता करते.लंचमध्ये भाज्या,चिकन/टोफू/पनीरसह चपाती आणि थोडासा भात ती घेते.वर्कआउट नंतर व्हे व फळांची स्मुदी घेते.डिनरमध्ये प्रोटीन व भाज्यांचा समावेश करते.

Image may be NSFW.
Clik here to view.
IMG_1991-1-300x1621

      Image may be NSFW.
Clik here to view.
IMG_2363-1-300x162

चिटमील ची ती दर शनिवारी आतुरतेने वाट बघत असते.कारण त्या दिवशी ती तिच्या आवडीप्रमाणे खाऊ शकते.या अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांनीही , वजन ठेवा काबूत!देखील जरुर वाचा.

मजेची गोष्ट अशी की रेश्माला चिडवणारे तिचे मित्र-मैत्रिणी देखील आता तिच्याकडून वेट-लॉस टीप्स घेतात.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Reshma Bedi


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>