Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

उन्हाळ्यात केसांना अधिक चमकदार ठेवतील या ’5′टीप्स

$
0
0

उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे डोक्याला खाज येणं, केसात कोंडा वाढणं हा त्रास हमखास आढळतो. उन्हाळ्यात त्वचेची,आरोग्याची काळजी घेतली जाते. पण केसांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. परिणामी अनेक छुपे त्रास किंवा त्वचा विकार वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच शुष्क आणि फ्रिझी केसांची नेमकी काळजी कशी घ्यावी याकरिता Fortis S. L. Raheja Hospital, Mahim च्या Consultant Dermatologist, डॉ. रिंकी कपूर यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता यामध्ये बदल होत असल्याने केस अधिक शुष्क होतात. उन्हाळ्याच्या दिवसात घाम येण्याचं प्रमाण अधिक वाढतं. त्यामुळे टाळूजवळील त्वचा अधिक चिकट होते. त्याचा परिणाम केसांवरही जाणवतो. उन्हाळ्यात डोक्याला येणारी खाज टाळण्यासाठी या ’4′ सवयी टाळा

  1. उन्हाळ्याच्या दिवसात किमान 2-3 वेळा केस स्वच्छ धुवावेत. नियमित केस धुणे शक्य नसेल तर एक आड एक दिवस केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस चिकट होणार नाहीत.
  2. केस धुण्यासाठी माईल्ड किंवा हर्बल शाम्पू वापरा. केमिकलयुक्त शाम्पूमुळे केसांचे अधिक नुकसान होते. तुम्हांला डॅन्डरफचा त्रास असेल तर अ‍ॅन्टी डॅन्डरफ शाम्पू वापरा. भारतातील ‘५’ बेस्ट अँटि-डँड्रफ शाम्पू 
  3. शाम्पूने केस धुतल्यानंतर चांगल्या दर्जाचे कंडिशनरही वापरा. टाळूवर कंडिशनर लावू नका. शक्य असेल तर लिव इन कंडिशनर वापरा. यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांप्रमाणेच प्रदूषणामुळे केसांचे होणारे नुकसान टाळण्यासही मदत होते.
  4. उन्हाळ्याच्या दिवसात केसांची चमक आणि पोत सुधारण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरते. या घरगुती उपायासाठी दोन टीस्पून अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर एक लीटर पाण्यामध्ये मिसळा. केस शाम्पूने धुतल्यानंतर केस या पाण्यानेही स्वच्छ धुवा.
  5. तुमचे केस मोकळे सोडणार असाल तर सनस्क्रीनयुक्त हेअर कंडिशनर आणि सेरम वापरा. यामुळे घामाने केस चिकचिकीत होण्याची शक्यता कमी होते. यामुळे केस रफ आणि विस्कटलेले दिसण्याची शक्यता कमी होते.

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>