मुलांना सोडून कामावर जाताना अनेक महिलांना अपराधी वाटते. मुलांना आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही, त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, असे विचार डोक्यात येतात. त्याचबरोबर मुलांची काळजी, चिंता पाठ सोडत नाही. नोकरी आणि मुलं या द्विधा मनःस्थिती बऱ्याचजणी कामावर जातात. परंतु, यावर मात करणे गरजेचे आहे. कारण मुलांना वाढवणे हा विज्ञानातील प्रयोग नाही. तर ती एक जबाबदारी आहे आणि नोकरी करणे हा त्या जबाबदारीची पूर्तता करण्याचा एक भाग आहे, हे समजणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमच्या विचारात काही बदल केल्यास ही जबाबदारी तुम्ही आनंदाने पार करू शकाल. यासाठी काही टीप्स. मुलांच्या हट्टीपणाला कमी करण्याचे ’7′ मार्ग !
- काळजी वाटणे स्वाभाविक आहे, हे समजून घ्या: आपल्या लहानग्या मुला/मुलीला घरी सोडून कामावर जाणे अनेक मातांना जड जाते. सुट्टीच्या दिवशी आई घरी राहणार म्हणून मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद काही वेगळाच असतो. परंतु, रोज घरी राहणे शक्य नसते. त्यामुळे कामावर निघाल्यावर मुलांची काळजी वाटते अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे तुमच्या भावना समजून घ्या. त्या सहज आहेत. त्यावर मात करण्याची गरज नाही. या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा
- आपल्या मुला/मुलीकडे लक्ष द्यायला चांगली माणसे आहेत, याचे समाधान बाळगा: वेगवेगळ्या लोकांशी संबंध आल्याने मुलं अनेक नव्या गोष्टी शिकतात. त्याचा त्यांच्या विकासावर प्रभाव पडतो. आपल्या विचारांपेक्षा नवे विचार त्यांना कळतात. मुलं मोठयांचे अनुकरण करतात. त्यामुळे अनेक नवीन विचारातून मुलांची जडणघडण होते. या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !
- अपराधीपणाच्या भावनेपलीकडे बघा: मुलांना सोडून कामावर जाताना अनेक मातांना अपराधी वाटते. आपण त्याला/तिला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, असे वाटत राहते. परंतु, जॉब करणे ही गरज असते. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता व मुलाच्या भविष्यासाठी ते आवश्यक असते. या सगळ्याचा विचार केल्यास तुम्ही अपराधीपणाच्या भावनेपलीकडे बघू शकता. लहान मुलांना खोटं बोलण्याच्या सवयीपासून कसं परावृत्त कराल ?
- आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची: जॉब करणाऱ्या अनेक मातांना असे वाटते की घरात असणाऱ्या महिला चांगल्या माता असतात. किंवा मी पण घरी असते तर मुलांकडे नीट लक्ष देता आले असते. पण अनेकदा मुलांना सांभाळताना काही माता आळशी होतात. कामाची इच्छा काहीशी कमी होते. त्यामुळे असा विचार करू नका. कारण तुमच्या जॉबमुळे तुम्हाला व तुमच्या परिवाराला आर्थिक सुरक्षितता जाणवेल आणि ते अधिक महत्त्वाचे आहे.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock