डोळा हा आपल्या शरीरातील एक अत्यंत नाजूक अवयव आहे.या अवयवाचे वातावरणातील अनिष्ट गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी निसर्गाने त्यावर पापण्या दिल्या आहेत.या पापण्यांच्या उघडझाप करण्यामुळे डोळ्याचे संरक्षण होत असते.तसेच यासोबत जाणून घ्या वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार
डोळ्यांना मेकअप केल्यामुळे तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.पण मेकअप करताना तेलकट पापण्यांवर आय लायनर लावले तर ते पसरते व फार विचित्र दिसू लागते.डोळ्यांचा पापण्या तेलकट होणे ही समस्या अनेकांना सतावत असते.खरेतर याचा तुमच्या तेलकट त्वचा या समस्येसोबत काहीही सबंध नसतो.कारण जरी तुमची त्वचा नॉर्मल अथवा ड्राय असली तरी देखील तुम्हाला ऑइली आयलीड ही समस्या असू शकते.तसेच यासोबत त्वचा अचानक संवेदनशील होण्याची ही आहेत ५ कारणे देखील जरुर वाचा.
Bharti Taneja’s ALPs च्या फाउंटर व डायरेक्टर व प्रसिद्ध Aesthetician आणि Cosmetologist मिसेस भारती तनेजा व Dr. Trasi’s Clinic & La Piel च्या MD Skin Consultant Dermatologist डॉ.शेफाली त्रासी नेरूरकर यांच्याकडून जाणून घेेऊयात ऑइली आयलीड या समस्येचे नेमके कारण व ही समस्या टाळण्यासाठी काही सोप्या टीप्स-
तेलकट पापण्यांची कारणे-
-
ओवर-अॅक्टिव्ह ऑइल ग्रंथीची स्थिती व तुमच्या डोळ्याचा आकार यामुळे तुमच्या पापण्या तेलकट होऊ शकतात.
-
हॉर्मोनल चढ-उतारामुळे तुमच्या त्वचेमधील तेलाची निर्मिती वाढते.तेलकट पापण्यांचे कारण अति फॅटी व तेलकट पदार्थांचे सेवन हे देखील असू शकते.त्वचेवर दिसणारी ही ’6′ लक्षणं देतात लैंंगिक आजारांचे संकेत !हे देखील जरुर वाचा.
-
Seborrhea या समस्येमधील कपाळामधील sebaceous ग्रंथीच्या स्त्रवणामुळे देखील तुमच्या पापण्या तेलकट होऊ शकतात.
-
Seborrheic dermatitis या त्वचा विकारामध्ये नाक,कान,कपाळ व पापण्यांमध्ये समस्या निर्माण होतात.
-
मॉर्श्चराझर,सनस्क्रीन व मेक-अपचा अति वापर अशी इतर कारणे देखील या समस्येला कारणीभूत असू शकतात.यासाठी हे त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय जरुर करा.
-
काही महीलांमध्ये सतत चेहरा धुतल्यामुळे देखील चेह-यावर अति प्रमाणात तेल निर्माण होते.अशा स्थितीत प्रत्येक वेळी क्लीनझर वापरुन चेहरा धुण्यापेक्षा फक्त साधे पाणी तोंडावर शिंपडा.
तेलकट पापण्यांपासून वाचण्यासाठी काही टीप्स-
-
चेह-यासाठी non-comedogenic व ऑइल फ्री सौदर्यप्रसाधनांची निवड करा.
-
salicylic असीड घटक असलेल्या keratolytic व sebum कंट्रोल क्रीमचा चेह-यावरील seborrheic भागावर वापर करा.मात्र हे घटक थेट डोळ्यात जाणार नाहीत याची काळजी घ्या.
-
तुमचा फेशवॉश हा salicylic acid अथवा glycolic acid सारखे alpha hydroxy acids घटक असलेला असेल याची काळजी घ्या.
-
भरपूर प्रमाणात भाज्या व फळे खा.ज्यामुळे त्वचेवर अति प्रमाणात तेल निर्माण होण्याची समस्या कमी होईल.तसेच नितळ त्वचा हवीय ? मग या ’10′ भाज्या व फळं अवश्य खा!
-
मेडीटेशनचा सराव करा.योगामुळे देखील तुम्हाला ताण-तणावापासून मुक्तता मिळेल व तुमच्या त्वचेवरील नसांना देखील आराम मिळेल.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock