Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

घाम किंवा ओल्या कपड्यांमुळे वाढतो या ’5′त्वचाविकारांचा धोका !

$
0
0

इनटेन्सिव्ह वर्कआउटनंतर खूप घाम आल्यावर कपडे बदलून स्वच्छ व कोरडे कपडे न घातल्यास,बाहेर उन्हात फिरताना किंवा अगदी उन्हाळ्यात काही काळ वीजपुरवठा खंडीत झाल्यावर तुमचे कपडे घामाने ओले होतात.

असे ओले कपडे सतत अंगाला चिकटल्यामुळे मुळे तुमची केवळ गैरसोय अथवा गोंधळ होत नाही तर त्यामुळे तुम्हाला स्कीन इनफेक्शन व त्वचाविकार देखील होऊ शकतात.North Carolina च्या Wake Forest University School of Medicine च्या रिसर्च टीमने लॅटीनो शेतक-यांच्या त्वचा समस्या व त्या संबधित असलेले धोकादायक घटक यांचा प्रभाव याबाबत संशोधन केले.त्यांना या संशोधनात असे आढळले की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एक-तृतीयांश लोकांना त्वचा समस्या,त्वचेचे व नखांचे फंगस,सनबर्न,टेंगूळ,पिम्पल्स,Calluses,खाज,पुरळ,किटकदंश या समस्या आढळल्या.या समस्यांचे कारण त्यांचे ओले कपडे व शूज असावेत असा अंदाज आहे.

जरी हे संशोधन युएसच्या नॉर्थ कॅरोलीना मधील फार्मींग कम्युनिटी मध्ये करण्यात आले असले तरी त्यातून काढण्यात आलेले निष्कर्ष जगातील या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी खरे असू शकतात.

घामाने भिजलेले ओले कपडे का घालू नयेत याची काही कारणे-

ओल्या कपड्यांमुळे रिंगवर्म इनफेक्शन होऊ शकते-

रिंगवर्म अथवा नायटा हे एक फंगल इनफेक्शन असून ते त्वचा व नखांवर होते.हा रिंगच्या आकाराचा एखादा वर्म अथवा गोलाकार किडा नसून यात लाल रंगाचे गोलाकार पुरळ उठते यासाठी त्याला  रिंगवर्म अथवा नायटा असे म्हणतात.नायटा पाय(अॅथलीटचे पाय),हात, अंगठयाचे नख किंवा हाताची नखे आणि केसांची त्वचा या ठिकाणी होऊ शकतो.तसेच हे इनफेक्शन जांघेचा भाग,मांड्याचा आतील भाग,नितंब या ठिकाणी देखील होऊ शकते.या इनफेक्शनची  बुरशी अथवा फंगी ओल्या कपड्यांमध्ये व सार्वजनिक  स्वच्छतागृहे अशा ओलसर वातावरणात वाढत असते.त्यामुळे सतत घाम येत असल्यास,सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरल्यास किंवा अगदी ओले इनरवेअर किंवा सॉक्स वापरल्यामुळे देखील तुम्हाला रिंगवर्म अथवा नायटा होण्याचा धोका असू शकतो.त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!

ओले कपडे अथवा अंर्तवस्त्रे घातल्याने तुम्हाला गजकर्ण(eczema)होऊ शकतो-

गजकर्ण(Eczema) हा एक गंभीर त्वचा विकार आहे ज्यामुळे तुमची त्वचा लाल व खाजणारी होते.तुम्हाला खाज थांबवणे कठीण जाते व खाजवल्यामुळे हे बॅक्टेरियल इनफेक्शन अधिक वाढू शकते.हा Atopic dermatitis नावाच्या हायपर सेंसिटीव्हिटी च्या स्थितीचाच एक भाग असतो.ज्यामध्ये अस्थमा व इन्हेलंट अॅलर्जीचा देखील समावेश असतो.संशोधनानूसार अति आर्द्रता,घट्ट कपडे घालणे,सतत हात धुणे व अति घाम येणे यामुळे Atopic dermatitis ही समस्या गंभीर होते.यामधील सर्व कारणे ही फक्त हात धुण्याशिवाय( जर तुम्हाला काम झाल्यावर हात धुऊन ते घातलेल्या कपड्यांना पुसण्याची घाणेरडी सवय असेल) ओले कपडे व अंडर गारमेंटशी निगडीत आहेत.

ओले कपडे घालल्यामुळे अॅक्नेची समस्या होऊ शकते-

घामाने भिजलेले ओले कपडे घालल्यामुळे अॅक्नेची समस्या नक्कीच होऊ शकते.उष्णता व आर्द्रतेमुळे तुमच्या त्वचेमध्ये भरपूर तेल निर्माण होते.त्यात तुम्हाला अॅक्नेची गंभीर समस्या असल्यास यामुळे तुम्हाला अॅक्ने येऊ शकतात.त्यात घामाने भिजलेले ओले कपडे बॅक्टेरीयाची वाढ होण्यास अधिक प्रोत्साहन देतात.तुम्हाला फारच घाम येत असेल तर सफेद व फिकट रंगाचे सुती कपडे व इनरवेअर घाला.कारण सुती कपडे घाम व तेल दोन्हीही शोषून घेतात.अ‍ॅक्ने,सोयरासिस सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय

ओल्या कपडयांमुळे तुम्हाला सनबर्नचा त्रास होऊ शकतो-

कपडे तुमच्या त्वचेचे सुर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतात.पण हे फक्त तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता यावर अवलंबून असते.जर तुम्ही बाहेर सुर्यप्रकाशात जाणार असाल तर घट्ट विणलेल्या कापडाचे व गडद रंगाचे कपडे घाला.असे कपडे तुम्हाला सनबर्न पासून संरक्षण देऊ शकतात.तसेच ते तुमची त्वचा पुर्ण झाकणारे असावेत.ओल्या कपडयांमुळे अतिनील किरणांपासून कमी सरंक्षण मिळते.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानूसार अति ताणलेले,ओले व खराब झालेल्या कपड्यांचे संरक्षक गुणधर्म कमी होतात.सुर्याच्या अतिनील किरणांमुळे फक्त सनबर्नच होते असे नाही तर यामुळे त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो.सनबर्नची समस्या हटवण्याचा घरगुती उपाय

घामाने भिजलेल्या कपड्यांमुळे तुम्हाला यीस्ट इनफेक्शन होऊ शकते-

यीस्ट इनफेक्शनला कॅनडिडायसिस असेही म्हणतात.कारण हे इनफेक्शन Candida albicans या यीस्ट पासून होते.यीस्ट इनफेक्शन तोंडासह शरीवरील सर्वच त्वचेवर होऊ शकते.जेव्हा हे इनफेक्शन व्हजायनाला होते तेव्हा त्याला Vulvovaginal candidiasis असे म्हणतात.ही बुरशी ओलसर भागात तग धरते त्यामुळे ओली अंर्तवस्त्रे तिच्या वाढीसाठी अतिशय पोषक जागा ठरते.

कदाचित तुम्हाला माहित नसेल पण यीस्ट इनफेक्शन पुरुषांच्या पेनिसच्या त्वचेवर देखील होऊ शकते.या इनफेक्शनला Urogenital candidiasis अथवा Male thrush असे म्हणतात.हे इनफेक्शन बाहेरील भागात आणि गुद्दद्वार व अंडाशयाच्या मधील भागात देखील होते.जर पुरुषांनी या इनफेक्शनकडे दुर्लक्ष केले तर ही समस्या अधिक बळावते या स्थितीला  Balanoposthitis असे म्हणतात.या समस्येमध्ये त्वेचवर तीव्र खाज येते,जळजळ व दाह होतो.यावर लवकर उपचार न केल्यास समस्या गंभीर होते ज्यावर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात.vaginal infections जडण्याची कारणं, लक्षणं आणि उपचार !

ओली अंर्तवस्त्रे घातल्यामुळे Intertrigo ही समस्या होते-

भारतीय शौचालय शिष्टाचारांमध्ये जेट स्प्रे वापरणे अथवा पाण्याच्या केलेल्या वापरामुळे तुम्हाला गुप्तांगाची नीट स्वच्छता राखता येते.पण यासाठी तुम्ही ते लगेच व्यवस्थित कोरडे करणे फार गरजेचे असते.कारण गुप्तांग कोरडे न करता अंर्तवस्त्रे परिधान करताना तुम्ही रोगजनकांना आमंत्रण देत असता.Intertrigo ही एक अशी इन्फ्लैमटरी स्थिती असते ज्या स्थितीमध्ये उष्णता, आर्द्रता, ओलसरपणा, घर्षण, हवा खेळती न राहणे यामुळे नितंब व जांघेमधील त्वचा दुमडली जाते.त्वचा एकमेंकावर घासली गेल्यामुळे तिथे दाह निर्माण होतो.या समस्यमध्ये यीस्ट, बॅक्टेरीयल अथवा वायरल इनफेक्शनची भर पडते.घाम, मल, मूत्र व व्हजायनल डिचार्ज यामुळे मुले व मोठी माणसे या दोघांच्याही समस्येमध्ये अधिक भर पडते.त्वचेवर दिसणारी ही ’6′ लक्षणं देतात लैंंगिक आजारांचे संकेत !

बाळ व वृद्ध लोकांना डायपर रॅशेससारखे काही इनफेक्शन होऊ शकतात.गुप्तांगामध्ये होणा-या Dermatitis, युरीनरी ट्रॅक इनफेक्शन या फंगल इनफेक्शनला Scrotal dermatitis असे म्हणतात

ओले कपडे,घाम व आर्द्रतेमुळे होणा-या सर्वच इनफेक्शनवर उपचार करणे शक्य असते.पण नंतर इनफेक्शन झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच घामाचे कपडे वेळेवर बदला व स्वच्छ सुती कपडे व अंर्तवस्त्रे परिधान करा.ज्यामुळे अशा इनफेक्शन पासून तुमचे संरक्षण होईल. लिंबूपाणी – Urinary tract infections चा त्रास टाळण्याचा घरगुती उपाय

Reference:

  1. Feldman, S. R., Vallejos, Q. M., Quandt, S. A., Fleischer, A. B., Schulz, M. R., Verma, A., & Arcury, T. A. (2009). Health Care Utilization among Migrant Latino Farmworkers: The Case of Skin Disease. The Journal of Rural Health: Official Journal of the American Rural Health Association and the National Rural Health Care Association, 25(1), 98–103. doi:10.1111/j.1748-0361.2009.00205.x

  1. Kim, D., & Lockey, R. (2010). Dermatology for the Allergist. The World Allergy Organization Journal, 3(6), 202–215. doi:10.1097/WOX.0b013e3181e2eb2e

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>