Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

फ्रॅक्चर झाल्यानंतर फिजिओथेरपी कशी घ्याल ?

$
0
0

ज्या लोकांना एखाद्या अपघातामुळे हातापायाला फ्रॅक्चर झाले असेल त्यांना फ्रॅक्चरनंतर होणा-या वेदना किती असह्य असतात याची नक्कीच कल्पना असेल.तुटलेले हाड पुन्हा जोडण्यासाठी दीर्घ कालावधी लागू शकतो.जवळजवळ दोन ते तीन आठवडे हाड पुन्हा जोडण्यासाठी लागतात.पण खरेतर ही समस्या पुर्णपणे बरी होणे गरजेचे असते.यासाठी केअर २४ च्या फिजिओथेरपिस्ट डॉ.श्रुती बर्वे यांच्या सल्लानूसार फिजिओथेरपी उपचारांचा रुग्णाला चांगला फायदा होऊ शकतो.यासाठी त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात फ्रॅक्चर होण्याची कारणे व धोके काय असतात व फिजिओथेरपी उपचार सांधे व स्नायुंच्या हालचाली साठी किती महत्वाचे असतात. टेनिस एल्बो बाबतचे काही इंटरेस्टिंग गोष्टी !देखील जरुर वाचा.

फॅक्चर झाल्याची लक्षणे-

फ्रॅक्चरमध्ये झाल्याचे दर्शविणारे तीन महत्वाचे संकेत-

१.वेदना

२.सूज

३.आकारामध्ये बदल

पण या संकेता वरुन नेमक्या कोणत्या भागात फ्रॅक्चर झाले आहे हे सांगणे कठीण असते.

फॅक्चर झाल्याची लक्षणे-

  • दुखापत होताना तुम्हाला आवाज एेकू येतो अथवा तो अनुभवता येऊ शकतो.

  • दुख-या भागात सूज येऊ शकते.

  • दुखापत झालेल्या भागावर स्पर्श झाल्यास,त्यावर दाब पडल्यास अथवा त्या भागाची हालचाल झाल्यास तुम्हाला वेदना जाणवतात.

  • दुखापत झालेल्या भागाचा आकार बदलतो.

  • हाड मोडल्याच्या धक्कामुळे तुम्हाला निराश,उदास व आजारी वाटू लागते.मात्र तुमच्या दुखापत झालेल्या हाडाला हलकेचे क्रॅक जर गेले असेल तर तुम्हाला फार वेदना होत नाहीत अथवा फ्रॅक्चर झाल्याचे समजत देखील नाही.

या काही स्थितींमध्ये फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता असते-

  • गंभीर दुखापत- खाली पडणे,मोटार अपघात किंवा अगदी फुटबॉल खेळताना देखील फ्रॅक्चर होण्यातची शक्यता असते.यासाठी धावताना दुखापती टाळण्यासाठी पाळा या खास टीप्स !

  • ऑस्टिओपोरोसिस- या विकारामध्ये हाडे कमजोर झाल्यामुळे ती तुटण्याची शक्यता अधिक असते.

  • अतिश्रम- अतिश्रम व मेहनत केल्यामुळे स्नायु थकतात व हाडांवर त्याचा ताण येतो.यामुळे स्ट्रेस फॅक्चर होण्याची शक्यता असते.अॅथलीट लोकांना स्ट्रेस फॅक्चर होण्याचा धोका अधिक असतो.

  • वृद्धापकाळ- पौढ लोकांना वृद्धापकाळामध्ये हाडे कमजोर झाल्यामुळे व तोल न सांभाळता आल्यामुळे ते पडल्यास फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता असते.वयोवृद्ध लोकांच्या हाडांची झीज झाल्यामुळे त्यांची हाडे कमजोर होतात.महिलांमध्ये देखील मॅनोपॉजनंतर एस्ट्रोजन या हॉर्मोन्सच्या कमतरतेमुळे हाडांची झीज होऊ शकते.

  • इतर आरोग्य समस्या,औषधोपचार,धुम्रपान,मद्यपान किंवा तुमच्या जेनेटीक प्रीडिसपोझिशनमुळे तुमच्या हाडांचे नुकसान होऊ शकते.

  • तोल न सांभाळता येणे अथवा दृष्टी कमजोर झाल्यामुळे पडल्यास देखील तुम्हाला फ्रॅक्चर होण्याचा धोका असू शकतो.

फ्रॅक्चर होण्यामागे असलेले रीस्क फॅक्टर-

जेवढे तुमचे वय अधिक तेवढा तुम्हाला फ्रॅक्चरचा धोका देखील अधिक असू शकतो.त्याच प्रमाणे खाली दिलेल्या काही आरोग्य समस्या देखील यासाठी धोकादायक असू शकतात.तसेच यासाठी हात-पाय प्लॅस्टरमध्ये असल्यास या ’10′ गोष्टींची काळजी घ्या !

  • ओस्टिओपोरोसिस(बोन मास कमी होणे)

  • Paget’s विकार,कर्करोग,रुमटॉइड आर्थ्राटीस यासारखे अस्थिविकार

  • किडनी फेल झाल्यामुळे डायलिसीसवर असणे

  • अस्थमा,उच्च रक्तदाब,सिझर,ब्रेस्ट कॅन्सर,थायरॉइड,ब्लड थिनर,चिंता,झोपेसाठी घेण्यात येणारी औषधे.

  • महिलांना

  • आतड्यांच्या समस्येमुळे व्यवस्थित पोषण न होणे.

  • दीर्घकाळापासून मद्यपान किंवा तंबाखूचे व्यसन असणे.

  • निष्क्रिय जीवनशैली.

  • हायपर-थायरॉइड आणि हायपर-पॅराथायरॉइड विकार

  • Osteomalacia (वृद्ध लोकांमध्ये व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे होणारा एक अस्थिविकार)

  • भूतकाळात फ्रॅक्चर झालेले असल्यास

फ्रॅक्चरबाबत धोक्याच्या सूचना-

  • सामान्यत: फ्रॅक्चर हे वेदनादायकच असते.फ्रॅक्चर झालेल्या भागात खोलवर वेदना व सूज येते.

  • कधीकधी तुम्हाला यामध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. मात्र ओस्टिओपोरोसिस अथवा इतर गंभीर विकारांमुळे तुमची हाडे कमजोर झाली असतील तर तुम्हाला फ्रॅक्टर होण्याआधी वेदना जाणवू शकतात.

  • काही फ्रॅक्चर मध्ये वेदना जाणवत नसल्यामुळे त्यांचे एक्स-रे मशिन परिक्षणामधूनच निदान करावे लागते.

  • तुमची उंची कमी होणे अथवा आकारात बदलल होणे.तुमच्या पाठीच्या वरच्या भागात पोक आल्यासारखे वाटणे हे पाठीच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर असण्याचे लक्षण असू शकते.

फ्रॅक्चर असल्यास फिजिओथेरपी उपचार कधी सुरु करावे?

बरेच रुग्ण हातापायामध्ये फ्रॅक्चर असल्यास ४ ते ६ आठवड्यांनी पुर्ववत होतात.या काळात त्यांचे हाड जोडले जाते पण हालचाल करताना स्नायुंमध्ये वेदना जाणवत असतात.कारण दुखापत झालेल्या भागातील स्नायु हालचाल कमी झाल्यामुळे जखडले जातात.पण फिजिओथेरपीने या वेदना व सूज कमी करण्यास मदत होते व तुम्हाला पुर्ववत हालचाल करणे देखील सोपे जाते.

अर्ली फिजीओथेरपी इन्टरवेन्शन चे महत्व-

वेदना कमी करुन पुर्ववत बरे होण्यासाठी अर्ली फिजीओथेरपी उपचार करणे गरजेचे असतात. अर्ली फिजीओथेरपी इन्टरवेन्शन मध्ये दुखापत झालेल्या भागाच्या आजूबाजूचा भाग व सांधे यांची योग्य पद्धतीने हालचाल करण्यात येते.यामुळे वेदना व सूज देखील नियंत्रणात येते.स्नायु व अस्थिबंधांमधील सॉफ्ट टीश्यूंच्या हालचालींमुळे रक्तप्रवाह सुधारतो व त्या भागातील सूज कमी होऊन आराम मिळतो.

दुख-या भागातील सांध्याची हालचाल फार महत्वाची असते.उदा.हाताला फ्रॅक्चर झाल्यास काही आठवड्यांनी हालचालीवर बंधन आल्यामुळे त्या हाताचा खांदा जखडला जातो.फ्रोझन शोल्डरची लक्षणे व त्यावरील फायदेशीर फिजिओथेरपी एक्सससाईझ जरुर वाचा.

तीन ते चार आठवड्यांनी रुग्णाला बरे होण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करावे लागतात.या काळात त्यांच्या दुख-या भागातील वेदनेनूसार त्यांच्याकडून काही अॅक्टीव्ह असीस्टंट एक्सरसाइज व काही लाइट स्ट्रेटनींग वर्क करुन घेतले जाते.ज्यामुळे हालचाल कमी झाल्यामुळे कमजोर झालेल्या स्नायुंना अधिक आराम मिळतो.

फ्रॅक्चरवर करण्यात येणा-या फिजिओथेरपीचे काही प्रकार-

  • वॉकींग इनस्ट्रक्शन्स-जर तुमच्या पायाला अथवा घोट्याला फ्रॅक्चर झाले असेल तर थेरपिस्ट तुम्हाला वॉकरच्या सहाय्याने तुम्ही कसे चालावे याच्या सूचना देतात.यामध्ये तुम्ही तुमच्या शरीराचे वजन कोणत्या भागावर टाकावे,पाय-या चढता-उतरताना व कारमध्ये बसताना-उतरताना  काय काळजी घ्यावी हे सांगण्यात येते.त्यामुळे अशा वेळी जर काही शंका असतील तर तुम्ही त्यांना जरुर विचारा.तसेच नवीन पद्धत शिकण्यासाठी थोडा सराव करावा लागतो.यासाठी तुम्ही आधीच थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला दिलेल्या डिवाइस सोबत चालण्याचा सराव करा.

  • प्रशिक्षण घेणे-तुमचे फिजीओथेरपिस्ट तुम्हाला चालण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा होण्यासाठी काही विशिष्ट सूचना व व्यायाम सांगतात.याचा प्रमुख उद्दीष्ट तुमचे पाय व घोटे यांच्या मध्ये सुधारणा व्हावी हा असतो.या प्रकाराचा तुम्ही कमी स्पीड मध्ये ट्रेडमीलवर देखील सराव करु शकता किंवा जमीनीवर व पाय-यांवर याचा सराव करु शकता.

  • सूज कमी करणे-फ्रॅक्चर नंतर सामान्यपणे दुखापत झालेल्या भागावर सूज येते.यासाठी त्यावर हलका मसाज करण्यात येतो.तसेच सूज कमी करण्यासाठी लेप लावणे,बर्फ अथवा गरम शेक दिल्याने आराम मिळू शकतो.

  • घोट्यांची हालचाल सुधारणे-फिजिओथेरपीस्ट यासाठी मॅन्युअल टेकनिकने(हाताने) तुमच्या पाय,पायाचा तळवा व घोट्याची हळूवार हालचाल करतात.ज्यामुळे जखडलेेले सांधे मोकळे होतात व तुम्हाला आराम मिळू लागतो.

  • तुमचे काम पुर्ववत करण्यासाठी तुम्हाला सक्रिय करणे-थेरपीमुळे सांध्याजवळील स्नायु लवचिक व मजबूत होतात.रुग्णाला दुख-या भागावर वजन टाकून देखील वेदना होत नाहीत तेव्हाच थेरपिस्ट तुम्हाला तुमची कामे पुर्ववत करण्यासाठी अथवा खेळण्यासाठी काही अॅक्टिव्हिटी प्रशिक्षण देतात.घोट्यांच्या फ्रॅक्टरनंतर पुर्ववत काम करणे सुरु करण्यासाठी कमीतकमी १२ ते १६ आठवडे कालावधी लागतो.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>