Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बायपोलर डिसॉर्डर जडण्याची ४ कारणं

$
0
0

बायपोलर डिसॉर्डर ही एक मेंदूशी निगडीत समस्या आहे.यामध्ये एखाद्या व्यक्तीला अचानक असामान्य पद्धतीने मूड बदलण्याचा अनुभव येऊ शकतो.असे असले तरी या विकाराचे खरे कारण अजूनही अज्ञात आहे.तज्ञांच्या मते ही स्थिती बळावण्यामागे बाहेरील वातावरण,न्युरोकेमिकल व जेनेटीक घटक कारणीभूत असू शकतात.बायपोलर डिसॉर्डरमध्ये अचानक मूड बदलण्यामागे देखील अनेक घटक कारणीभूत असू शकतात.या समस्येमध्ये कुटूंबातील मंडळींनी रुग्णांची योग्यकाळजी घेण्याची फार गरज असते. अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं देखील अवश्य वाचा

न्युरोलॉजिकल घटक-

बायपोलर डिसॉर्डर हा एक बायोलॉजिकल डिसॉर्डर असून तो मेंदूमधील न्युरोकेमिकल्स मध्ये असतुंलन निर्माण झाल्यामुळे होतो.Serotonin, Dopamine व Noradrenaline या न्युरोट्रान्समिटर्स मुळे मेंदूमधील कार्यावर नियंत्रण येत असते.शरीरातील एक अथवा अधिक हॉर्मोन्सच्या पातळीमध्ये  बिघाड अथवा असतुंलन निर्माण झाल्यामुळे मॅनिया अथवा डिप्रेशन येऊ शकते.डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी १० फायदेशीर उपाय !देखील अवश्य वाचा

जेनेटीक घटक-

बायपोलर डिसॉर्डरचा संबंध आनुवंशिकतेशी येत असतो.म्हणजेच जर ही समस्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला असेल तर आनुवंशिकतेने ती पुढील पिढीला होऊ शकते.त्यामुळे ज्या लोकांच्या पालकांना डिप्रेशन हा मुड डिसॉर्डर असेल त्यांच्या मुलांना हा विकार होण्याचा धोका अधिक असतो.तसेच या स्थितीची वाढ इतर रुग्णांपेक्षा या विकाराची फॅमिली हिस्ट्री असलेल्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते.

वातावरणातील घटक-

बायपोलर डिसॉर्डर विकारामुळे जेनेटेकली धोक्यात असलेल्या लोकांमध्ये वातावरणातील घटकांची अधिकच भर पडते.कारण ज्या घरामधली मुले ताण,मद्यपानामुळे होणारा छळ,सेक्शुअल शोषण,आर्थिक समस्या व बायपोलर डिसॉर्डर अथवा मुड स्वींग ग्रस्त पालकांच्या सानिध्यात वाढतात त्या मुलांमध्ये हा विकार विकसित होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो.तसेच घरातील प्रिय व्यक्तीचा मृत्यु व एखादी रिलेशनशिप कायस्वरुपी संपणे या ताणात्मक परिस्थितीमुळे देखील या विकाराला चालना मिळते.

औषधे-

Antidepressants, Illicit drugs व Amphetamines यामुळे देखील या विकाराचा त्रास वाढू शकतो.अति प्रमाणात कॅफेन व Appetite Suppressants मुळे देखील मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घटतात व त्यामुळे मॅनिक एपिसोड निर्माण होऊ शकतात.असे असले तरी औषधोपचारांनी त्या व्यक्तीला पुर्ववत करता येते.ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !जरुर करा.

संदर्भ-

  1. Greenberg S, Rosenblum KL, McInnis MG, Muzik M. The role of social relationships in bipolar disorder: A review. Psychiatry Res. 2014 Oct 30;219(2):248-254. doi:10.1016/j.psychres.2014.05.047. Epub 2014 Jun 4. Review. PubMed PMID: 24947918.

  2. Birkle S, Holtmann M. [Bipolar depression in childhood and adolescence]. Prax Kinderpsychol Kinderpsychiatr. 2014;63(3):219-36. Review. German. PubMed PMID:24707769.

  3. Bizzarri JV, Sbrana A, Rucci P, Ravani L, Massei GJ, Gonnelli C, Spagnolli S, Doria MR, Raimondi F, Endicott J, Dell’Osso L, Cassano GB. The spectrum of substance abuse in bipolar disorder: reasons for use, sensation seeking and substance sensitivity. Bipolar Disord. 2007 May;9(3):213–220.

  4. Nurnberger JI, Jr., Foroud T. Genetics of bipolar affective disorder.Curr Psychiatry Rep. 2000 Apr;2(2):147–157

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>