गरोदरपणानंतर तुमचे शरीर पुर्वीसारखे राहत नाही.काही महिलांना शरीरात जाणवणारे हे बदल सहन करणे फार कठीण जाते.शरीरात झालेले हे नवे बदल अनेक जणींना नकोसे वाटू लागतात.यातील काही बदल बाळंतपणानंतर पहिल्या सहा ते आठ महिन्यांमध्ये कमी होतात.पण काही बदल मात्र आयुष्यभर तसेच राहतात.तसेच जाणून घ्या या ’10′ उपायांनी प्रसुतीनंतर मिळवा पुरेशी झोप !
यासाठी जाणून घेऊयात बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये कोणते बदल जाणवतात-
१.तुमचे पोट पुर्वी प्रमाणे दिसत नाही-
गरोदरपणामध्ये दिसणारे बेबी-बम्प कितीही सुंदर वाटत असले तरी बाळंपणानंतरही जेव्हा काही दिवस तुमचे पोट वाढलेले राहते त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते.खरेतर हे बाळंतपणानंतरचे एक अगदी सामान्य लक्षण आहे.कारण गर्भाशय पुर्ववत होण्यासाठी बाळंतपणानंतर जवळजवळ सहा ते आठ आठवडे लागतात.काही जणींना तर डिलीवरीनंतर पोट पुर्ववत होण्यासाठी अगदी काही महिने अथवा वर्षे देखील लागू शकतात.बाळंतपणानंतर पोट लवकर पुर्ववत होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरु शकतात.एक म्हणजे गरोदरपणात केलेला योग्य व्यायाम व चांगल्या खाण्याच्या सवयी.ज्यांचा बाळंतपणानंतर तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो.दुसरी गोष्ट म्हणजे बाळंतपणानंतर तुम्ही घेतलेली पुरेशी काळजी.ज्यामुळे तुमचे वजन कमी होते व आतील स्नायु पुर्ववत होतात.जर या दोन्ही गोष्टींबाबत तुम्ही दुर्लक्ष केले तर याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर पडत असतो.तसेच तुमची नैसर्गिक प्रसूती झाली आहे की सिझेरियन यावर देखील बाळंतपणानंतर दिसणा-या तुमच्या पोटाचा आकार अवलंबून असू शकतो.प्रसुतीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत करा हे ५ व्यायाम
२.तुमच्या स्तनांचा आकार बदलतो-
गरोदरपणात स्तनपान व दूधाच्या योग्य प्रमाणासाठी तुमच्या स्तनांच्या आकारात बदल होतात.असे असले तरी भविष्यात हा आकार पुन्हा बदलू शकतो.तसेच स्तनपानाच्या काळात तुमचे स्तन जड,गळालेले व सुरकुतलेले देखील दिसतात.तज्ञांच्या मते यासाठी तुमचे स्तनपान करणे कारणीभूत नसून तुमच्या शरीरात गरोदरपणात होणारे हॉर्मोनल बदल कारणीभूत असतात.तसेच यासोबत स्तनपान देणार्या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स ! देखील जरुर वाचा.
३.तुमच्या पाऊलांचा आकार बदलतो-
गरोदरपणाच्या काळात हाता पायावर सूज हमखास दिसते. यामुळे हालचालींवर मर्यादा असते.बाळंतपणानंतर शरीरातील अतिरिक्त पाणी शरीराबाहेर पडले तरी तुमचे पाय मात्र पुर्वीप्रमाणे दिसत नाहीत.काही जणींमध्ये तर त्यांचा आकार भविष्यात देखील तसाच राहतो.तुम्हाला जर गरोदरपणी स्पाइन वेन्स किंवा व्हेरीकोस व्हेन्स ची समस्या झाली तर मात्र तुमची स्थिती अधिकच गंभीर होऊ शकते.यासाठी व्हेरिकोस व्हेन्सच्या रुग्णांनी कशी घ्यावी काळजी ?हे देखील अवश्य वाचा
४.तुमचे केस भरपूर प्रमाणात गळू लागतात-
Post pregnancy alopecia किंवा केसगळतीमुळे तुमच्या केसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.कारण या काळात तुमच्या शरीरात अनेक हॉर्मोनल बदल घडत असतात.गरोदरपणात महिलांमध्ये इस्ट्रोजीनची पातळी जास्त असल्यामुळे तुमचे केस गळण्यापासून संरक्षण होते पण बाळंतपणानंतर ही पातळी खालवते व तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात.त्यात तुमचे योग्य पोषण योग्य न झाल्यास ही समस्या अधिकच वाढते.केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा.
५.तुम्हाला अस्वस्थ वाटते-
बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला अस्वस्थ करणारे अनेक बदल घडू लागतात.नैसर्गिक प्रसूतीनंतर तुमचा योनीमार्ग ताणामुळे शिथील होतो.जर तुम्हाला Episiotomy ही समस्या असेल तर हा काळ तुमच्यासाठी फार वेदनादायक असू शकतो.काही जणींचा योनीमार्ग या काळात कोरडा होतो(विशेषत: स्तनपानाच्या काळात)यामुळे इनफेक्शन होण्याची व सेक्स करताना ल्युब्रिकेशनच्या कमतरतेची शक्यता निर्माण होते.यासाठी vaginal infections जडण्याची कारणं, लक्षणं आणि उपचार !देखील जरुर जाणून घ्या.
६.तुमच्या चेह-यामध्ये बदल होतो-
काही महिलांना गरोदरपणामध्ये चेह-यावर काळे डाग पडतात.काही आठवड्यांनी तर त्यांचा चेहरा काळपट दिसू लागतो.बाळंतपणानंतरही चेह-यामधील हा बदल तसाच राहतो.असे असले तरी यावर काही क्रीम व सौदर्य उपचार नक्कीच करता येऊ शकतात.
७.तुमचे स्ट्रेच मार्क तसेच राहतात-
बाळंपणानंतर तुमचे पोट स्ट्रेच मार्कमुळे ओंगळ वाटू लागते.हे स्ट्रेच मार्क आयुष्यभर तसेच राहतात.काही काळाने हे स्ट्रेच मार्क हलक्या रंगाचे होतात पण शरीराचा तो भाग पुर्वीप्रमाणे नक्कीच दिसत नाही.यासाठी गरोदरपणीच याबाबत योग्य ती काळजी घ्या ज्यामुळे पुढे तुम्हाला चिंता करावी लागणार नाही.प्रसूतीनंतर दिसणारे स्ट्रेच मार्क्स लेझर उपचारांनी दूर करता येतात का?
८.तुम्हाला व्रणासोंबत जगावे लागते-
विशेषत: जर तुमची सिझेरियन डिलीवरी झाली असेल तर आयुष्यभर हे व्रण तुमच्या शरीरावर तसेच राहतात.हे व्रण जरी लहान असले व पटकन दिसत नसले तरी तुम्हाला आयुष्यभर प्रसवनवेदनांची आठवण करुन देतात.तसेच वाचा सिझेरियन नंतर वजन कमी करण्याचे ५ उपाय
९.तुमच्या मूत्राशयामध्ये बदल होतो-
डिलीवरी दरम्यान तुमच्या पेल्विक भागातील,ओटीपोटातील व गर्भाशयातील स्नायुंवर ताण येतो.या काळात त्यांच्यामधील लवकचिकता कमी होते.यातील काही स्नायुंमुळे मूत्रमार्गातील मूत्र बाहेर येण्यावर नियंत्रण ठेवता येत असते.मात्र बाळंतपणात हे स्नायु शिथिल झाल्यामुळे त्यानंतर लघवीवर नियंत्रण ठेवणे तुम्हाला कठीण जाते.
१०.रात्री तुम्हाला घाम येऊ शकतो-
हा बदल कायस्वरुपी नसला तरी काही दिवस तुम्हाला या समस्येचा त्रास होऊ शकतो.तुमच्या शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडण्याचा हा एक मार्ग असतो.या काळात तुमची एनर्जी लेवल सतत कमी असते त्यामुळे तुम्हाला आळस व थकवा देखील येतो.पण आनंदाची गोष्ट ही की हे लक्षण तात्पुरते असते.तसेच सिझेरियन प्रसुतीनंतर टाळा या १५ चुका.
संदर्भ-
[1]1: Negishi H, Kishida T, Yamada H, Hirayama E, Mikuni M, Fujimoto S. Changes in uterine size after vaginal delivery and cesarean section determined by vaginal sonography in the puerperium. Arch Gynecol Obstet. 1999 Nov;263(1-2):13-6. PubMed PMID: 10728621.
[2]1: Pisacane A, Continisio P; Italian Work Group on Breastfeeding. Breastfeeding and perceived changes in the appearance of the breasts: a retrospective study. Acta Paediatr. 2004 Oct;93(10):1346-8. PubMed PMID: 15499956.
[3] Novak, M. A., & Meyer, J. S. (2009). Alopecia: possible causes and treatments, particularly in captive nonhuman primates. Comparative medicine, 59(1), 18.
[4] 1: Mason L, Glenn S, Walton I, Appleton C. The experience of stress incontinence after childbirth. Birth. 1999 Sep;26(3):164-71. PubMed PMID: 10655816
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock