Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आर्थ्राटीसवर होमिओपॅथी उपचार घ्यावेत का ?

$
0
0

आर्थ्राटीस हा सर्व विकारांमध्ये अतिशय वेदनादायक विकार आहे.कारण यामुळे रुग्णाला त्याची दैनंदिन कामे करणे देखील कठीण जाते.तसेच हालचालीवर मर्यादा आल्यामुळे काम करणे हळूहळू जवळजवळ बंदच होते.

आर्थ्राटीसचा धोका कोणाला असू शकतो?

वय- रुमटॉइड आर्थ्राटीस हा विकार ३० ते ६० वयोगटातील लोकांमध्ये तर ऑस्टीओआर्थ्राटीस सामान्यत: वृद्धकाळात म्हणजे पन्नाशी नंतरच्या लोकांमध्ये आढळतो.यासाठी जाणून घ्या Rheumatoid Arthritis पाय आणि घोट्यावरही करतात हे गंभीर परिणाम

महिलांना अधिक धोका- मॅनोपॉजच्या काळात हाडांची झीज होत असल्यामुळे महिलांमध्ये आर्थ्राटीसचे प्रमाण अधिक आढळते.स्नायुबंध ठिसूळ  झाल्यामुळे देखील महिलांना दुखापत होण्याचा धोका वाढतो.

दुखापत- कोणत्याही शारीरिक अथवा मेंदूला झालेल्या दुखापतीचा सांध्यावर विपरित परिणाम होऊ शकतो व आर्थ्राटीस होण्याची शक्यता वाढते.तसेच अधिक माहितीसाठी साधे सांध्यांचे दुखणे अर्थ्राईटीसच्या त्रासापासून या ’6′ लक्षणांनी वेगळे ठरते !हे जरुर वाचा.

पारंपारिक औषधोपचारांमध्ये आर्थ्राटीससाठी अॅलोपॅथीमधील पेनकिलर,स्टिरॉइड देऊन दाह कमी केला जातो.नॉन-स्टिरॉइड अॅन्टी-इनफ्लैमटरी औषधे वेदना कमी करण्यासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येतात.पण रुग्णाने नंतर ही औषधे घेणे बंद केल्यास आर्थ्राटीसच्या वेदना पुन्हा सुरु होऊ शकतात.कारण या औषधांमुळे दुखणे मुळापासून बरे केले जात नाही.

यासाठी या विकाराच्या उपचारांकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे.उषा प्रभाकर सावंत या ५९ वर्षीय महिलेने इम्पेरियल क्लिनीकचे एमडी प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ.श्रीपाद खेडेकर यांच्याकडून उपचार घेण्यापूर्वी सर्व पारंपारिक उपचार करुन बघीतले.औषधांचा काहीच परिणाम न होऊ शकल्याने या महिलेला शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले होते.पण या महिलेने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला.त्याच दरम्यान तिच्या सुनेच्या वडीलांनी त्यांना डॉ.खेडेकर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.आज या महिलेला कोणताही त्रास व वेदना जाणवत नाहीत व त्यांची प्रकृती देखील आता पहिल्या पेक्षा उत्तम आहे.तसेच त्या पुर्वीप्रमाणे त्यांची नित्याची कामे देखील करु शकत आहेत.

आर्थ्राटीस विकाराबाबतीत होमिओपॅथीचा काय दृष्टीकोन आहे?

डॉ.खेडकर यांच्या मते त्यांना त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरुन असे आढळले आहे की आर्थ्राटीसचे कारण एखाद्यामध्ये लहानपणापासून असलेली सर्दी अथवा अॅलर्जी असू शकते.कारण जेव्हा सर्दी,अॅलर्जी अंगावर काढली जाते तेव्हा ती समस्या त्या व्यक्तीच्या हाडांमध्ये मुरते व नंतर आर्थ्राटीसच्या रुपात बाहेर पडते.अगदी त्याचप्रमाणे आर्थ्राटीसला पेनकिलर अथवा स्टिरॉइड देऊन दाबून टाकण्याच्या प्रयत्न झाला तर त्याचे पुढे गंभीर परिणामांमध्ये रुपांतर होऊ शकते.यामुळे कधीकधी रुग्णाला ह्रदयविकार देखील होऊ शकताे.

उलट होमिओपॅथी उपचारांनी आर्थ्राटीसचा त्रास कमी होतो.व त्याचे रुपांतर पुर्वीप्रमाणे सर्दी किंवा अॅलर्जी या प्राथमिक स्वरुपात होते.या उपचारांनी एक ते दोन महिन्यांमध्ये आर्थ्राटीस पुर्ण बरा होतो.

होमिओपॅथीमध्ये आर्थ्राटीसवर काय उपचार करण्यात येतात?

डॉ.खेडेकर यांच्यामते होमिओपॅथीचा दृष्टीकोन व्यापक असल्यामुळे यात रुग्णाच्या संपुर्ण आरोग्याची काळजी घेण्यात येते.यासाठी या उपचारांमध्ये प्रथम रुग्णाची शारीरिक व मानसिक स्थिती समजून घेण्यात येते.आर्थ्राटीस वर उपचार करण्यासाठी व्यापक दृष्टीकोनातून रुग्णाला औषधांसोबत व्यायाम करण्यास सांगण्यात येते. तसेच रुग्णाला खालील काही औषधे देण्यात येतात.

  • Rhustox

  • Bryonia

  • Causticum

  • Ledum Pal

  • Ferrum Met

  • Kalmia

डॉ.खेडेकर यांच्या सल्लानूसार आर्थ्राटीसवर होमिओपॅथी उपचार घेणे हा एक चांगला निर्णय असू शकतो.कारण आत्तापर्यंत अनेक रुग्णांना या औषधोपचारांचा चांगला फायदा झाला आहे.होमिओपॅथी औषधे घेतल्यामुळे रुग्णाला पेनकिलर अथवा स्टिरॉइड घेण्याची गरज कमी होते.विकारावर नियंत्रण आल्यामुळे पुढे होणारा बिघाड देखील होत नाही.या उपचारांमुळे हजारो रुग्णांना गुडघे प्रत्यारोपण प्रक्रिया टाळता येऊ शकते.

श्रीपाद खेडेकर-

डॉ.श्रीपाद खेडेकर यांनी जगप्रसिद्ध टेनिस स्टार Novak Djokovic याच्यावर अस्थमा या समस्येसाठी उपचार केले आहेत.तसेच युरोपियन प्रिमियर लीगमध्ये खेळणा-या अनेक युरोपियन फुटबॉल स्टार्सनां देखील बरे केले आहे.ते युरोपमध्ये प्रॅक्टीस करतात व त्यांनी केलेल्या संशोधनातील शेकडो केसेस एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय मेडीकल जर्नल मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.ते एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिजीशन,शिक्षक,संशोधक व लेखक आहेत.तसेच त्यांनी होमिओपॅथीवर चार पुस्तके लिहिली आहेत.एका साधा व व्यापक दृष्टीकोनातून गंभीर व गंुतागुंतीच्या Pathologies हाताळणे ही त्यांची स्पेशलिटी आहे.ते त्यांच्या दादर व बेलग्रेडमधील क्लिनीक मधून कार्य करतात व मुंबईच्या शुश्रूषा हॉस्पिटचे कन्सल्टंट देखील आहेत.यासाठी जाणून घ्या होमिओपॅथी उपचार पद्धती आणि त्याबाबतचे 9 समज -गैरसमज !

अधिक माहिती साठी भेट द्या- www.imperialclinics.com

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>