Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

उन्हाळ्यात डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास कमी करण्यास खास टीप्स !

$
0
0

करीना कपूर खान अर्थात बेबोचा ‘झिरो फिगर’ लूक पाहून चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे तिची न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर. डाएट,व्यायामच्या खुळ्या कल्पना बाजूला सारून भारतीय जेवणाचा आस्वाद घेऊन आरोग्य कसं जपावं ? याबाबत ऋजुता सतत मार्गदर्शन करत असते.

ऋजुताचे हेल्दी फंडे सोपे असल्याने ते पाळणेदेखील सार्‍यांच्याच आवाक्यात आहेत. म्हणूनच महागडे आणि रटाळ जीम आणि डाएट प्लॅन पाळण्यापेक्षा तुमच्या शरीराला समजून घेऊन त्यानुसार तुमच्या आहारात बदल करा. कारण अनेकदा केवळ एखादी व्यक्ती विशिष्ट डाएट फॉलो करते म्हणून त्याचे अंधानुकरण करणे फायद्यांपेक्षा पुन्हा तुमच्यावर पलटू शकते.

उन्हाळ्याच्या दिवसात  भूक मंदावलेली असते. पण सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकदा बाहेरचे खाणे, फिरणे होते. अशामुळे वाढत्या उन्हाच्या त्रासासोबतच पचानाचे विकारही वाढतात. अपचन, मळमळ, पित्त, उलट्या होणं, डीहायड्रेशन, भोवळ येणं असा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच उन्हाळ्यात वाढणारी डोकेदुखी आणि पित्ताच्या त्रासावर नेमकी कशी मात करावी याबाबत आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.

  • उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करा. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक पाणी प्या. मूत्रविसर्जनाच्या वेळेस काही त्रास  न होता.त्याचा रंगदेखील अधिक  पिवळसर नसेल याची काळजी घ्या. पाण्यामुळे शरीराचे तापमान सुरळीत राहण्यास मदत होते. फ्रीज शिवाय पाणी थंडगार करण्याचे 4 नैसर्गिक मार्ग !
  • नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी कोकम सरबत आणि सब्जाचे मिश्रण मिसळून प्या. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. या ’5′ घरगुती आणि हेल्दी सरबतांनी उन्हाळ्यात रहा कूल !
  • दुपारच्या जेवणात शक्य असल्यास दही भात खाण्याची सवय ठेवा. यामुळे शरीराला प्रोबायोटिक्स मिल मिळेल तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.या ’5′ समस्या करण्यासाठी दही-भात हवाच !
  • रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद आणि दूधाचे मिश्रण एकत्र करून प्यावे. दूध हे नैसर्गिकरित्या थंड स्वरूपाचे असल्याने शरिरातील उष्णता कमी करते तसेच शांत झोपण्यास मदत करते.
  • उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणात किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यास आंबा खा. मधूमेहीदेखील कॅलरीचे गणित सांभाळत आहारात आंब्याचा समावेश अवश्य करू शकतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक आढळते. यामुळे शरीरातील नसा शांत राहतात. तसेच तुम्हांला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत होते. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे ओळखण्याच्या स्मार्ट क्लुप्त्या

Image source: Rujuta Diwekar/Facebook

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Source – Rujuta diwekar Facebook timeline


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>