Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सौंदर्य खुलवण्यासाठी डर्मा रोलर घरी वापरणं कितपत सुरक्षित ?

$
0
0

डर्मा रोलर हे एका बाजूने ड्रमच्या आकाराचा रोलर असलेले एक छोटे व हाताळण्यास सोपे असे साधन असते.या रोलरवर ०.५ mm ते २ mm लांबीच्या टायटॅनिम अथवा मेडीकल ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या लहान सुया जोडलेल्या असतात.त्वचेवरुन हे साधन फिरवताना या सुया तुमच्या त्वचेवर जखमा करतात.या जखमांमुळे शरीर रिपेयर मॅकेनिझमला कार्यान्वित करते व त्याभागात कोलाजन हे संप्रेरक पाठवून या क्रियेला प्रतिसाद देते.जेव्हा त्वचेत मोठया प्रमाणावर कोलाजन निर्माण होते तेव्हा शरीराचा रिपेअरींग मोड अॅक्टिव्ह असल्यामुळे डाग व जखमा ब-या होतात व एवढया प्रचंड वेदना सहन करुन शेवटी तुम्हाला डाग विरहीत व नितळ त्वचा प्राप्त होते.तसेच नितळ त्वचा हवीय ? मग या ’10′ भाज्या व फळं अवश्य खा!

तीव्र अॅक्नेची समस्या असलेल्या काही जणांना डर्मा रोलर च्या दोन सेशनमध्ये चांगला परिणाम दिसून येतो.जर हे उपचार तज्ञांकडून व वैद्यकीय देखरेखीखाली केले गेले तरच त्यामुळे आश्चर्यकारक बदल घडू शकतात.पण जर तुम्ही स्वत:च हे उपचार करण्याचा प्रयत्न  केला तर तुम्हाला भयंकर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.त्यामुळे जर तुम्ही तुमचे सौदर्य खुलवण्यासाठी घरीच डर्मा रोलरचा वापर करण्याचा विचार करीत असाल तर त्यापुर्वी ही महत्वाची माहिती जरुर जाणून घ्या.

डर्मा रोलींगचा एक भयंकर अनुभव-

डर्मा रोलर फारच महाग असतात.त्यांची किंमत २,००० ते ५,००० रु.असते.मात्र एका महिलेने एका ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर ते ६०० रु.ला विकत घेतले.तिने या साधनाचा चेह-यावर वापर करण्यापूर्वी व नंतर असलेल्या प्रिकॉशन्स घेतल्या व स्टर्लाइज लिक्विड देखील वापरले.तिला रोलर वापरताना खूप त्रास सहन करावा लागला.कारण या साधनाचा वापर करताना एकाचवेळी जवळजवळ २०० टोकदार सुया तुमच्या त्वचेमध्ये टोचत असतात.त्यानंतर दोन दिवस तिची त्वचा लालसर व रुक्ष झाली.पण तिस-या दिवशीपासून तिची त्वचा सुंदर दिसू लागली.आठवडाभरात तिच्या चेह-यावरील डागांमध्ये बदल दिसू लागले.महिनाभराने तिने ही प्रकिया पुन्हा केली तेव्हा तिला पुर्वीप्रमाणेच परत अनुभव आला.

पण तिस-यांदा डर्मा रोलर वापरताना मात्र तिला भयंकर अनुभव आला.डर्मा रोलर वापरल्यानंतर काही तासांमध्ये तिच्या त्वचेमध्ये विचित्र दाह होऊ लागला.एक दिवसानंतर तिच्या चेह-यावर फोड आले.हे एक इनफेक्शन होते.ती जेव्हा डर्माटोलॉजिस्टकडे गेली तेव्हा तिने १.५ mm डर्मा रोलर कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय तिच्या चेह-यावरुन फिरवला हे ऐकून डॉक्टरांना देखील धक्काच बसला.त्यानंतर तिला काही औषधे व क्रीम देऊन बरे करण्यात आले.पण यातून हा धडा घेण्यासारखा आहे की घरी स्वत:च डर्मा रोलींग उपचार कधीही करु नयेत. त्वचा अचानक संवेदनशील होण्याची ही आहेत ५ कारणे देखील जरुर जाणून घ्या .

या अनुभवाबाबत तज्ञांचे मत-

Skinfiniti Skin & Laser Clinic चे सीईओ,प्रसिद्ध डर्मालॉजिस्ट डॉ.जयश्री शरद यांच्याकडून जाणून घेऊयात याबाबतीत त्यांचे नेमके काय मत आहे.

सर्वच डर्मा रोलर घरी वापरण्यासाठी सुरक्षित नसतात-

डॉक्टरांच्या मते घरी वापरण्यात येणा-या डर्मा रोलरला ०.५ mm च्या सुया बसविलेल्या असतात.तसेच ते वापरताना इनफेक्शन होऊ नये यासाठी भरपूर काळजी घ्यावी लागते.मात्र काही लोक प्रोफेशनल डर्मा रोलर विकत घेतात ज्यामध्ये १.५mm ते ३ mm च्या सुया बसविलेल्या असतात.असे डर्मा रोलर घरी वापरण्यासाठी मुळीच सुरक्षित नसतात.कारण १.५ mm चा डर्मारोलर वैद्यकीय मदतीशिवाय वापरणे अत्यंत धोकादायक असते.यासाठी तज्ञांच्या मते डर्मारोलर घरी वापरुच नका व वापरण्याची अगदी गरजच असल्यास ते रोलर ०.५mm चेच असतील याची काळजी घ्या.

डर्मा रोलरवैद्यकीय मदतीशिवाय वापरणे धोकादायक असते-

सामान्यत: डर्मा रोलर वापरल्यामुळे बॅक्टेरियल इनफेक्शन,फोडामध्ये पस होणे,अॅक्ने फुटणे,वायरल इनफेक्शन असे अनेक दुष्पपरिणाम होऊ शकतात.तसेच जर डर्मा रोलर योग्य पद्धतीने वापरले नाही तर पिगमेंटेशन व डाग वाढण्याची देखील शक्यता असते.

जर डर्मा रोलर वापरायचा असेल तर त्याबाबत योग्य काळजी घ्या-

डर्मा रोलर गरम पाण्यात धुवा.चेह-यावर हे साधन फिरवताना योग्य ती काळजी घ्या.जर तुम्हाला चेह-यावर फोड,अॅक्ने,नागिण अथवा जखम झाली असेल तर डर्मा रोलरचा वापर करणे टाळा.

पुन्हा पुन्हा वापर करु नका-

डर्मा रोलर हे एकदाच वापर करण्याचे साधन असते.त्याचा पुर्नवापर करताना फार काळजी घ्यावी लागते.उपचारांआधी व उपचारानंतर त्याच्यावरील रक्ताचे डाग स्वच्छ करण्यासाठी ते गरम पाण्यात चांगल्या पद्धतीने धुणे गरजेचे असते.तसेच तीन पेक्षा अधिक वेळा ते वापरल्यास त्याच्यावरील सुया बोथट झाल्याने तुमच्या चेह-यावर व्रण होऊ शकतात.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>