Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हिपॅटायटीस सी पासून तुमच्या यकृताचा बचाव करण्यासाठी या खास टीप्स !

$
0
0

तुमची त्वचा तजेलदार असण्याचे अथवा तुम्ही जीवनात आनंदी असण्याचे खरे कारण तुमच्या आयुष्यातील प्रेम नसून तुमचे यकृत आहे.कारण यकृत दिवसरात्र मेहनत करुन तुमचे रक्त शुद्ध करते,पोट निरोगी ठेवते व दिवसभर तुम्हाला ताजे व उत्साही ठेवते.तुम्हाला हे माहित आहे का ? चुकीच्या सेक्शुअल सवयींमुळे तुमचे यकृत कमजोर देखील होऊ शकते.मद्यपान व प्रक्रिया केलेले अन्न खाण्यासोबत तुमच्या सेक्शुअल हॅबीट्स मुळे देखील तुमच्या यकृतामध्ये बिघाड होऊ शकतो. हिपॅटायटीस सी अथवा HCV हे यकृताला होणारे एक वायरल इनफेक्शन आहे जे सेक्शुअल संबधातून पसरते.जर यावर वेळीच उपाय केले नाही तर ७५ ते ८५ टक्के लोकांमध्ये यामुळे कॅन्सर व Cirrhosis असे यकृताचे भयंकर विकार विकसित होण्याचा धोका असतो.यासाठी जाणून घ्या हिपॅटायटिस – कारणे, लक्षणं आणि निदान !

जर तुम्हाला असे भयंकर यकृताचे विकार होऊ नयेत असे वाटत असेल तर बॉम्बे हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजीशन डॉ.गौतम भानूशाली यांच्या सल्लानूसार स्वत:ला या सुरक्षित सेक्शुअल सवयी जरुर लावा.तसेच यकृतविकारांना दूर ठेवा या ’6′ नैसर्गिक उपायांनी !

यासाठी काही सुरक्षित सेक्शुअल सवयी-

नेहमी कंडोमचा वापर करा-

एचआयव्ही प्रमाणेच एचसीव्ही पासून बचाव करण्यासाठी देखील सेक्स करताना गर्भनिरोधके वापरा.याचा अर्थ प्रत्येक वेळी सेक्स करताना कंडोम वापरणे खूप गरजेचे आहे.सेक्स करताना कंडोम फाटू नये यासाठी चांगल्या गुणवत्तेचेच कंडोम वापरा.कारण सेक्स दरम्यान कंडोम फाटल्यास तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका असू शकतो.यासाठी हे देखील जरुर वाचा सेक्स दरम्यान कंंडोम फाटले तर काय कराल?

पार्टनरची माहिती घ्या-

एखाद्या व्यक्तीसोबत सेक्शुएल रिलेशनशीप करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या भुतकाळाविषयी पुरेशी माहिती घ्या.यासाठी हेल्थ चेक-अप करुन घेणे मुळीच अयोग्य नाही.जर तुम्ही लॉन्ग टर्म रिलेशनशीप मध्ये असाल तर तुम्हाला हिपॅटायटीस सी होण्याचा धोका फार कमी असू शकतो.मात्र कधीकधी असे असले तरी कदाचित तुमच्या जोडीदाराला हा संसर्ग आधीच्या रिलेशनशीपमध्ये झालेला असू शकतो.यासाठी एकदा रुटीन हेल्थ चेक-अप जरुर करुन घ्या.जर तुमच्या दोघांपैकी एखाद्याला एचआयव्हीची लागण झाली असेल तर सेक्स करताना कंडोम वापरणे अनिवार्य आहे.तसेच यासाठी HIV/AIDS बाबत या ’33′ प्रश्नांंबाबतचे समज-गैरसमज आजच दूर करा !

किस करताना सावध रहा-

एचसीव्ही ची लागण सेक्सच्या माध्यमातून शरीरातील रक्त व द्रवातून प्रसारित होते.तसेच कधीकधी किसच्या माध्यमातून देखील याचा संसर्ग होऊ शकतो.आक्रमक पद्धतीने घेतलेल्या किसमुळे कधी कधी तोंडावर व ओठांवर जखम होते ज्यातून निघणा-या रक्तातून संक्रमित व्यक्तीचा संसर्ग तुम्हाला देखील होऊ शकतो.त्यामुळे नविन सेक्शुअल पार्टनर सोबत असताना त्या व्यक्तीच्या तोंड,ओठ,हिरड्यांवर एखादी जखम अथवा फोड दिसल्यास त्याला किस करणे टाळा.

अॅनल सेक्स करणे टाळा-

योनीमार्गाचे स्नायू लवचिक असल्याने सेक्स दरम्यान त्यातून प्रवेश करणे सोपे असते मात्र गुद्दवाराचे स्नायू कठीण असल्याने त्या मार्गाने प्रवेश करणे त्यामानाने थोडे कठीण असते.अॅनल सेक्स करताना पुरुषांना अॅनल पोकळीतून प्रवेश करताना अधिक दाब द्यावा लागतो.ज्यामुळे सेक्स दरम्यान एखादी जखम होऊ शकते.अशा वेळी झालेल्या रक्तस्त्रावामधून निरोगी व्यक्तीला संक्रमित व्यक्तीचा संसर्ग होऊ शकतो.तसेच हे जरुर वाचा ओरल सेक्समुळे HIV चा प्रसार होऊ शकतो का ?

तुमचे सेक्स टॉय शेअर करु नका-

सेक्स टॉय शेअर केल्याने निरोगी व्यक्तीला देखील एचसीव्हीचा संसर्ग होऊ शकतो.अशा सेक्स टॉय मधून संक्रमित व्यक्तीच्या रोगाची लागण इतर निरोगी व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकते.त्यामुळे इतरांनी सेक्ससाठी वापरलेले वायब्रेटर अथवा Dildos असे सेक्स टॉय मुळीच वापरु नका.

ओरल सेक्स करताना डेन्टल डॅम व कंडोम जरुर वापरा-

निरोगी व्यक्तीने ओरल सेक्स करताना देखील डेन्टल डॅम व कंडोमचा वापर केल्याने त्याला संसर्ग होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.तसेच जाणून घ्या  या ’7′ कारणांसाठी पुरूषांना आवडतो ओरल सेक्स

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>