ऑलिव्ह ऑइलचे अनेक फायदे आहेत. स्वयंपाकघरापासून ते अगदी सौंदर्य खुलवण्यासाठी देखील ऑलिव्ह ऑइल सर्रास वापरले जाते. सौंदर्य आणि आरोग्यवर्धक असे हे तेल आरोग्याच्या बाबतील जागरूक असलेल्या आपल्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. आता फक्त परदेशी पदार्थांमध्ये नाही तर भारतीय जेवणातही ऑलिव्ह ऑइल वापरले जाते. या तेलाचे चार प्रकार असून, प्रत्येकाचे फायदे व गुणधर्म वेगवेगळे आहेत. या हेल्दी टेस्टी तेलाबद्दल Del Monte यांनी दिलेली ही माहिती. नखांची वाढ आणि सौंंदर्य वाढवण्यासाठी असा करा ऑलिव्ह ऑईलचा वापर
Extra virgin olive oil: या तेलाचा सुगंध व स्वाद उत्तम असल्याने जर तुम्हाला तुमचे नेहमीचे तेल बदलायचे असेल हा पर्याय चांगला आहे. सलाडवर हे तेल घालून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. टेस्टी आणि हेल्दी असे हे तेल तुम्ही भाज्यांसाठी देखील वापरू शकता. तसंच थोडसं तेल पोळी किंवा ब्रेड वर लागून देखील तुम्ही खाऊ शकता. जाणून घ्या: नियमित आहारात किती चमचे तेल वापरावे ?
क्लासिक ऑलिव्ह ऑइल: extra virgin olive oil चा स्वाद आणि सुगंध सौम्य असल्याने तुम्ही ते तेल Mediterranean, कॉन्टिनेन्टल आणि भारतीय जेवणासाठी वापरू शकता. तर क्लासिक ऑलिव्ह ऑइल पास्ता, फ्राय केलेल्या भाज्या, भात यासाठी वापरू शकता. त्यातील परिणामकारक मॉइश्चरायझरमुळे केस व त्वचेचे पोषण होते. तसंच बाळाला किंवा मोठ्यांना देखील मसाज करण्यासाठी हे तेल अत्यंत उपयुक्त आहे. नक्की वाचा: बाळाला मसाज करण्यासाठी ‘५’ फायदेशीर आयुर्वेदिक तेलांंचे पर्याय !
लाईट फ्लेवर ऑलिव्ह ऑइल: या तेलाचा रंग फिकट असतो. हे तेल रोजच्या भारतीय किंवा कॉन्टिनेन्टल स्वयंपाकासाठी अतिशय योग्य आहे. तळणे, भाजणे, बेकिंग या सगळ्यासाठी तुम्ही हे तेल वापरू शकता. हेल्दी तेलाचे ’7′ पर्याय !
Olive pomace oil: हे तेल हलकं असून याची चव व स्वाद नैसर्गिक आहे. त्यामुळे भारतीय पदार्थांसाठी अतिशय योग्य आहे. याचा स्मोकींग पॉईंट अधिक असल्याने पदार्थ तळण्यासाठी (डीप फ्राय) हे तेल चांगले. हे तेल हलके असल्याने पुलाव, पकोडा, पराठा, रस्सा, आमटी करण्यासाठी इतर तेलांपेक्षा हे तेल वापरा. जरूर वाचा: हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहारात करा या खाद्यतेलांचा समावेश
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock