नखांवरील गुलाबी व पांढरट डागांचा अर्थ काय असू शकतो हे तुम्हाला माहित आहे का? प्रत्येकवेळी अशा नखांना मेनिक्युअरचीच गरज असते असे नाही.कारण कधी कधी हे डाग तुमच्या आरोग्याबाबत धोक्याची सूचना देखील देऊ शकतात.खरेतर तुमची नखे तुमच्या आरोग्य स्थितीचे संकेत वेळीच देत असतात फक्त तुम्ही ते योग्य वेळी ओळखणे गरजेचे अाहे.
मुंबईतील क्युटीस स्कीन स्टुडीओच्या अप्रतिम गोयल यांच्याकडून जाणून घेऊयात तुमची नखे तुमच्या आरोग्याबाबत काय सांगत असतात व तुम्ही या लक्षणांकडे वेळीच लक्ष देण्याची का गरज आहे.तसेच जाणून घ्या नखं काळवंडण्याची ’4′ कारणं !
१.कमजोर नखं -जर तुमची नखे ठिसूळ झाली असतील तर ती सहजपणे तुटतात अथवा दुमडली जातात.मात्र तुम्ही याबाबत विशेष चिंता करण्याची गरज नाही.जर तुम्ही तुमच्या नखांना सतत नेल पेन्टच्या मल्टीपल कोटनी रंगवित असाल.सतत नेल स्पा अथवा नखांवर निरनिराळी साधने वापरत असाल तर काही दिवसांसाठी नखांना यापासून आराम द्या.तसेच नखांची वाढ आणि सौंंदर्य वाढवण्यासाठी असा करा ऑलिव्ह ऑईलचा वापर
पण असे करुनही अथवा काळजी घेऊनही जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुमच्या मात्र डर्माटॉलॉजिस्टचा सल्ला घेणेच योग्य ठरेल.ठिसूळ झालेली नखे तुमच्या मध्ये लोहाची कमतरता दर्शवित असतात.ज्यामुळे तुम्हाला अॅनिमिया व त्यासारख्या इतर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.हे तुमच्यामध्ये व्हिटॅमिन ए,सी किंवा बी च्या अभावाचे देखील एक लक्षण असू शकते.ठिसूळ नखे हे हायपरथायरॉइडीझम चे देखील लक्षण असू शकतात.ज्यामधील समस्या टाळण्यासाठी तुम्हाला त्वरीत वैद्यकीय मदतीची गरज असते.
२.पिवळसर नखं -हे लक्षण आरोग्य समस्या दर्शवणारे एक महत्वाचे लक्षण असूनही त्याकडे ब-याचदा दुर्लक्ष केले जाते.पिवळसर नखे अनेक आरोग्य समस्या दर्शवित असते.ज्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक अाहे.
तसेच सौदर्यप्रसाधनांचा अतिवापर अथवा गैरवापर केल्यामुळे होणारे हे एक फंगल इनफेक्शन देखील असू शकते किंवा ही एक Lymphoedema नावाची आरोग्य समस्या असू शकते.ही आरोग्य स्थिती Lymphatic system मधील बिघाड,इनफेक्शनला लढा देण्यासाठी जबाबदार रक्तवाहिन्यांच्या जाळ्या व ग्रंथींमधील समस्या तसेच शरीरातील अतिरिक्त पाणी कमी होणे दर्शवित असते.ही दीर्घ काळ चालणारी एक गंभीर आरोग्य समस्या आहे ज्यामुळे शरीरातील टीश्यूजनां व हात व पायाला सूज येते.कदाचित पिवळसर नखे असणे हे Pleural Effusion चे देखील लक्षण असू शकते.ज्या आरोग्य स्थितीमध्ये फुफ्फुसांमध्ये अतिरिक्त पाणी जमा होते व नखे पिवळसर होतातही स्थिती अधिक गंभीर होण्याआधीच त्यावर उपचार करुन घ्या.हा नखांचा पिवळेपणा हटवणारा घरगुती उपाय !देखील जरुर करा.
३.पांढरी नखं -नखांना एक नैसर्गिक रंग असतो.पण अचानक या रंगामध्ये बदल झाल्यास ते काळजीचे कारण असू शकते.जर तुमच्या नखांचा नैसर्गिक रंग जाऊन नखे पांढरी दिसू लागली असतील तसेच यासोबत नखांवर गुलाबी छटा देखील दिसू लागल्या असतील तर हे तुमच्या यकृतामध्ये समस्या असल्याचे एक लक्षण असू शकते किंवा कदाचित हे हिपॅटायटीस चे प्राथमिक लक्षण देखील असू शकते.
४.निळसर नखं – तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर निळा रंग दिसल्यास ते धोकादायक असू शकते.कारण हे डाग तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही हे दर्शवित असतात.असे लक्षण असल्यास तुमच्या यकृताच्या कार्यात समस्या अथवा ह्रदय समस्या आहेत हे ओळखा व यासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.या उपायांनी नैसर्गिकरित्या वाढवा नखांची शुभ्रता !
५.पिटेड नेल्स- या स्थितीत तुमच्या नखांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतात.तुमच्या नखांवर एखाद्या पीनने खरवडल्याप्रमाणे पिट्स दिसू लागतात.जरी ही स्थिती वेदनादायक नसली तरी हे सोरायसिसचे एक प्राथमिक लक्षण असू शकते. सोरायसिस एक त्वचा विकार असून त्यामध्ये त्वचेवर लाल,खाजणारे,भयंकर असे चट्टे येतात.जर तुमच्या त्वचेमध्ये हा विकार बळावत असेल तर त्याआधी तुमच्या नखे लालसर दिसू लागतात.तसेच पिटेड नेल्स हे Ritter’s disease चे देखील एक लक्षण असू शकते.हा देखील एक भयानक त्वचा विकार असून तो Staph या बॅक्टेरियामुळे होतो.यामध्ये एक विशिष्ट प्रोटीन तयार होते ज्यामुळे नखे त्वचेेपासून सैल होतात.
६.डार्क लाइन किंवा डिप्रेशन- जर तुम्हाला तुुमच्या नेल बेडवर आडव्या गडद रेषा आढळल्या व जरी तुम्हाला त्यापासून कोणताही त्रास अथवा वेदना होत नसल्या तरी त्या लपविण्यासाठी त्यावर कधीच नेल पेन्टचा थर लावू नका.कारण हे डायबेटीस,सर्क्युलेटरी प्रॉब्लेम किंवा न्यूमोनिया सारख्या गंभीर विकारांचे लक्षण असू शकते.नखं कमजोर होण्याची कारणं आणि उपाय !देखील जरुर जाणून घ्या.
७.पांढरे चट्टे- या समस्येचे वर्णन करण्यासाठी Leukonychia ही संज्ञा वापरण्यात येते.सामान्यत: नखांच्या वाढ होणा-या भागावर दुखापत झाल्यास ही समस्या निर्माण होते.कदाचित हे एखाद्या अॅलर्जी,झिंकचा अभाव,कॅलशियमचा अभाव,प्रोटीनचा अभाव अथवा फंगल इनफेक्शन चे देखील लक्षण असू शकते.मात्र याचे खरे कारण डर्माटॉलॉजिस्ट कडून निदान झाल्यावरच समजू शकते.
८.स्पून्ड नेल्स- या स्थितीत तुमची नखे फार विचित्र दिसू लागतात.अशा नखांना मेनिक्युर करता येत नाही.पण हे यामागील खरे चिंतेचे कारण नाही.या स्थितीत तुमची नखे एखाद्या चमच्यामधून बाहेर आलेल्या स्कुप सारखी दिसतात.हे कदाचित थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत नसल्याचे अथवा ह्रदयविकाराचे लक्षण असू शकते.तसेच ही समस्या लोहाची कमतरता असल्यामुळे देखील होऊ शकते.त्यामुळे समस्या पुढे अधिक वाढू नये यासाठी आधीच योग्य ती काळजी घ्या.नक्की वाचा नखांजवळील काळवंडलेली त्वचा कशी दूर कराल ?
९.पफ्ड नेल्स- जर तुमच्या नखाजवळील त्वचा लालसर व पफी झाली असेल तर त्याचे कारण तुमच्या नेल फोल्डमध्ये दाह असू शकतो.हे lupus अथवा त्यासंबधित विकाराचे एक लक्षण असू शकते.इनफेक्शनमुळे देखील नेल फोल्ड लालसर होणे व दाह होणे हे लक्षण दिसू शकते.
१०.नेल रिजेस- कधी कधी तुमच्या नखांवर उभ्या रिजेस दिसतात ज्या वेदनादायक नसतात.अशा वेळी लगेच त्या नेल फाइलने स्मुथ करु नका.या रिजेस तुमच्या शरीरातील हॉर्मोनल असतुंलन,थायरॉइड समस्या,मधुमेह अथवा एखादा ताण-तणाव दर्शवित असतात.
जर तुमच्या नखांवर अशी काही लक्षणे आढळली तर नेहमी डॉक्टरांचा याबाबत सल्ला घेणे हेच श्रेयस्कर असू शकते.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock