मेष -
तुमच्या राशीतील ग्रहांची स्थिती पाहता, तुमचे आरोग्य अचानक बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजाराची लक्षणं आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्या, चेकअप करा. अन्यथा काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
वृषभ -
हृद्यरोगींनी तसेच रक्तदाबाच्या रुग्णांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांचे आरोग्य ठीकठाक राहील. मात्र आरोग्य गृहीत न घेता नियमित व्यायाम करावा.
मिथून –
या आठवड्यात फारसे काळजीचे कारण नाही. मात्र काहींना पचनाचे विकार होण्याची शक्यता आहे. मात्र मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी आरोग्याविषयी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घातक सवयी टाळा. तसेच पोषक आहाराचा समावेश करा. श्वसनाच्या व्यायामांनी स्वतःचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा.
कर्क -
सांधेदुखी, रक्तदाब असे जुनाट विकार असलेल्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. औषधोपचारांकडे दुर्लक्ष करू नका. योगासनं किंवा ध्यानसाधना केल्याने तुम्हांला आराम मिळेल. तसेच जंकफूड आणि त्रासदायक जीवनशैली टाळा.
सिंह -
या आठवड्यात ऋतूमानातील बदलामुळे तसेच व्हायरल इंफेक्शनमुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार घ्यावेत. मध्यमवयीन व त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी रक्तदाबाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळोवेळी चाचणी करून घ्या.
कन्या-
पचनाच्या विकारांबाबत आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात त्याची गंभीरता वाढण्याची शक्यता अधिक आहे. विशेषतः मधूमेह, सांधेदुखी याचा दीर्घकाळ त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. संध्याकाळी नियमित चाला.
तूळ -
या आठ्वड्यात तुमचे आरोग्य अगदी ठणठणीत राहील. पण वाढ्त्या वयानुसार येणार्या समस्यांकडे लक्ष ठेवा. खाण्याच्या तसेच झोपेच्या वेळा पाळा. योगसाधनेसोबतच मेडीटेशनदेखील करा.
वृश्चिक -
तुमच्या राशीतील ग्रहमान पाहता ते आरोग्यास अनुकूल नाही. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आजाराची लक्षणं आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
धनू -
हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरेल. मानसिक आणि शारिरीक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित योग व ध्यानसाधना करावी. या आठवड्यात गुरूच्या प्रभावामुळे कोणतीही आरोग्य निगडीत समस्या उद्धभवणार नाही.
मकर -
या आठवड्यात आरोग्यविषयक चिंतेचे कारण नाही. मात्र सर्दी-पडशाचा त्रास होण्याची शक्यता आहे. जुनाट आजारदेखील या आठवड्यात नियंत्रणात राहतील. मात्र या आठवड्यात तुमचा फीटनेस आणि स्टॅमिना वाढवण्याचा प्रयत्न करा. नियमित किमान हलका व्यायाम करा.
कुंभ-
या आठवड्यात तुम्ही आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे लहानसहान आजारांकडेदेखील दुर्लक्ष करू नका. त्यावर वेळीच उपचार करा म्हणजे भविष्यात गंभीरता वाढणार नाही. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी व्यायाम करा.
मीन -
या आठवड्यात काही त्रास अचानक उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच ते खूप दिवस त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषधाकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा त्यातून बाहेर पडण्यास अधिक दिवस लागण्याची शक्यता आहे.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.