12 ऑक्टोबर – वर्ल्ड अर्थ्राईस डे
जर्नल ऑफ अर्थ्राईटीस आणि रुमॅटोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार अमेरिकेत प्रत्येक तीन जणांपैकी एक विनाकारण गुडघ्याच्या प्रत्यारोपणाचा निर्णय घेतात. भारतातदेखील ही परिस्थिती अशीच आहे. असे मत डॉ. प्रदीप मुनोत ( ऑर्थोपेडीक सर्जन ) यांनी व्यक्त केले आहे. त्यातही तिशी आणि चाळीशीतील अनेकजण या शस्त्रक्रियेचा आधार घेत आहेत. हे धोकादायक आहे. (सांधेदुखीचा त्रास कमी करणारे ‘हेल्दी घरगुती पेय’)
गुडघा प्रत्यारोपणाचा निर्णय का घेतला जातो ?
‘आजकाल सर्रास गुडघ्याच्या रिपलेसमेंटचा सल्ला सर्जनकडून दिला जातो. अनेकदा ही शस्त्रक्रिया अनावश्यक असते. मात्र पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने आंधळेपणाने हा सल्ला स्विकारला जातो.’ असे डॉ. मुनोत सांगतात.
जीवनशैलीत झालेले बदल आणि काही चूकीच्या सवयींमुळे गुडघ्यांचे दुखणे अधिक वाढते. वाढ्त्या वयानुसार खालील सवयी गुडघ्यांचे दुखणे वाढवतात -
सवय | गुडघ्यांवर येणारा त्राण |
चालणे | शरीराचे निम्मे वजन |
पायर्या चढणे | शरीराचे तिप्पट वजन |
पायर्या उतरणे | शरीराचे पाचपट वजन |
धावणे | शरीराचे 20 पट वजन |
यासोबतच सतत उठबस करणे, गुडघ्यावर बसणे तसेच क्रॉस लेग बसणं त्रासदायक ठरू शकते. मात्र ज्या लोकांमध्ये सांधेदुखीचे दुखणे हे जुनाट आहे. अशांसाठी ही शस्त्रक्रिया फायदेशीर ठरण्याची शक्यता असल्याचे डॉ. मुनोत यांचे मत आहे.
परंतू खालील परिस्थितीत ‘गुडघा प्रत्यारोपणाची’ शस्त्रक्रिया मात्र टाळा -
- पेनकिलर्स आरामदायी ठरत असल्यास …
अनेकाजण वेदना टाळण्यासाठी ‘गुडघा प्रत्यारोपणाची’ शस्त्रक्रिया करून घेणे पसंत करतात. परंतू हा त्रास टाळण्याची पहिली पायरी म्हणजे औषधोपचार आणि गोळ्या / पेनकिलर्स घेणे. काहींना पेनकिलर्स घेणे हे किडनी किंवा लिव्हर (यकृत) यांच्या आरोग्यासाठी घातक वाटू शकते. पण विनाकारण गुडघा प्रत्यारोपणाचा त्रास हा पेनकिलर्सपेक्षा अधिक त्रासदायक ठरू शकतो.
- दुखणे जुने नसल्यास ..
वयोमानानुसार गुडघ्याचे दुखणे हे स्वाभाविक आहे. क्रॉस्ड लेग बसणं, 2 किमीपेक्षा अधिक एकावेळी चालणे, गुडघ्यांवर बसणे किंवा धावणे टाळा. यांमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी ध्यानसाधना करा, जीवनशैलीत सकारात्मक बदल करा. त्रासाचे प्रमाण कमी असल्यास त्यावर शस्त्रक्रिया केल्याने ही लक्षणं कमी होणार नाहीत. सांधेदुखी कमी करण्यासाठी खास योगासनं
- अपघातामुळे दुखणे वाढल्यास …
काहीवेळेस अनपेक्षित अपघातामुळे गुडघ्यावर आघात झाल्यास किंवा मुरगळल्यास तीव्र वेदना होतात. अशावेळेस त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया नाही. काहीवेळेस हाडांमध्ये / सांध्यामध्ये काही त्रास जाणवत असल्यास आर्थोस्कॉपीची निवड करा. मात्र अशा परिस्थितीत गुडघ्यांचे प्रत्यारोपण टाळा.
- दुखण्याचे कारण सहाजिक नसल्यास …
अनेकदा कंबरेच्या किंवा पाठीच्या कण्यामुळेदेखील हे दुखणे वाढू शकते. त्यामुळे तुमच्या गुडघ्यांचे दुखणे नेमके कशामुळे वाढते आहे. याकडे लक्ष द्या. त्याचे योग्य निदान झाल्यावरच गुडघ्याच्या प्रत्यारोपणाचा निर्णय घ्या. हे दुखणे ओळण्याची पद्धत म्हणजे गुडघ्यावर लोकल अनेस्थेटिक ( भूल देणारे इंजेक्शन) द्यावे. यानंतर शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना जाणवल्यास गुडघा प्रत्यारोपणाची गरज नाही.
यासोबतच गुडघा प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यापूर्वी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच सेकंड ओपिनियन घेऊन मगच हा निर्णय पक्का करा.
संबंधित दुवे -
संधिवाताच्या रुग्णांसाठी 9 सुपरफुड्स !!
सांधेदुखीचा त्रास कमी करणारे घरगुती तेल !
एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – reasons to avoid a total knee replacement surgery
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.
सांधेदुखीचा त्रास कमी करणारे ‘हेल्दी घरगुती पेय’