Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

शिराळं/दोडकं आहारात न टाळण्याची ’6′कारणं

$
0
0

फार चविष्ट नसले तरी अनेक पोषक घटकांनी परिपूर्ण असलेले शिराळं अनेकजण आहारातून वगळतात. शिराळामध्ये उच्च प्रतीची फायबर्स, व्हिटामिन सी,आयर्न तसेच इतर अनेक पोषणद्रव्यं असतात.  शिराळ्यात कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने सारेच आहारात या भाजीचा समावेश करू शकतात.

#1. दाह कमी होतो  -

शिराळ्याची पानं त्वचेवर लावल्यास दाह कमी होण्यास मदत होते. तसेच आहारात शिराळ्याचा समावेश केल्यास शरीरातील जळजळ, कफ तसेच लिम्फ ग्रॅंल्डसवरील सूज कमी होते.  कुष्ठरोगात शिराळ्याची पानं व लसूण यांची पेस्ट फायदेशीर ठरते.

#2 वजन घटवते -

शिराळ्यामध्ये उच्च प्रतीची डायटरी फायबर्स असल्याने ती शरीरात शोषून घेण्यास अधिक वेळ घेतात. यामुळे अधिकवेळ तुमचे पोट भरलेले राहते. यामध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचा अंश अधिक असल्याने आरोग्यदायी मार्गाने वजन घटवण्यास फायदेशीर ठरते. सोबतच परिणामकारक वजन घटवतील ही ’15′ घरगुती ड्रिंक्स !!

#3 मधूमेह नियंत्रणात ठेवतो - 

मधूमेहांच्या आहारात शिराळं प्रामुख्याने असणे आवश्यक आहे. त्यातील कमी कॅलरीज आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट क्षमता फायदेशीर ठरते. शिराळ्यातील हायपोग्ल्यासमिक क्षमता रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

#4 शरीरातील उष्णता कमी होते - 

शिराळ्यातील मिनरल्स शरीरात अल्कलाईन घटक निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे पित्त कमी होऊन शरीर  शांत राहते. शरीरात अल्कलाईन घटकांची निर्मिती झाल्याने मूत्रविसर्जनाच्या वेळी होणारी जळजळ कमी होते तसेच अल्सर आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार शिराळं शरीरातील पित्त कमी करण्यास अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

#5 केसांचे  आरोग्य सुधारते -

सुकवलेले शिराळे खोबरेल तेलात मिसळल्यास अकाली केस  पांढरे होण्याची समस्या दूर होते. शिराळ्यातील पोषणद्रव्य केसांच्या मुळांना मजबुती देते. परिणामी केसगळतीची समस्या कमी होते. ( केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा)

#6 त्वचारोग कमी होतात - 

शिराळ्यामुळे रक्त शुद्ध होत असल्याने पिंपल्स, अ‍ॅक्ने, ब्रेकआऊट्सची समस्या कमी होते. त्यामुळे आठवड्यातून 2 दोनदा शिराळ्याचा आहारात समावेश केल्यास रक्त शुद्ध होते, विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. परिणामी त्वचारोग व संसर्ग कमी होतो. (‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !)

  • कसे वापराल आहारात शिराळे ? 

शिराळ्याची भाजी तेलावर परतावी. वाफवलेले शिराळे सूप्समध्येदेखील वापरता येते. मात्र शिराळं गोड आणि कडू अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असते. त्यामुळे भाजीचे गोड शिराळं निवडताना त्यावरील शिरा मोजाव्यात. गोड शिराळ्यावर दहा तर कडू शिराळ्यावर नऊ  शिरा असतात.

संबंधित दुवे -

‘शेपू’ची भाजी आहारात ठेवण्याची ’7′ आरोग्यदायी कारणं !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Health benefits of ridge gourd or tori

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>