प्राचीन काळापासून तुळशीच्या झाडाला पवित्र मानले जाते. या औषधी झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याचबरोबर तुमचे सौंदर्य खुलवण्यातही तुळस महत्त्वाची भूमिका निभावते. तुळशीमध्ये जंतूनाशक व अँटि-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने मुरमांची व खाजेची समस्या दूर होण्यास मदत होते. तुळशीची पाने त्वचेला लावल्यास त्वचेचा तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. या पानांमधील कॅम्फेन नामक गुणधर्मामुळे त्वचेला थंडावा मिळतो व त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
मुरमांची समस्या कमी होते –
तुळशीची १०-१२ पाने घेऊन त्यांची पेस्ट करावी. त्यात एका अंड्याचा पांढरा भाग मिसळावा. हे मिश्रण मुरमांवर लावून अर्ध्या तासाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. अंड्यातील पांढऱ्या भागामुळे त्वचेवरील रंध्रे नाहीशी होण्यास मदत होते. तुळशीमुळे त्वचेवरील जंतू नाहीसे होऊन मुरमांची समस्या कमी होण्यास मदत होते.
स्किन टोनर –
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांपासून घरच्या घरी स्किन टोनर तयार करू शकता. तुळशीची काही पाने पाच मिनिटे पाण्यात उकळावीत. यामध्ये एक टेबलस्पून गुलाबपाणी व काही थेंब लिंबाचा रस मिसळावा. कापसाच्या बोळ्याने हा रस चेहऱ्याला लावावा व सुकल्यावरथंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
फेस पॅक –
तुळशीची पाने सुकवून त्यांची पूड करावी. ही पूड रात्रभर एका डब्यात भरून ठेवावी. त्यामध्ये मुलतानी माती मिसळून तयार झालेला फेस पॅक चेहऱ्याला लावावा. १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. तुमची त्वचा शुष्क असल्यास यामध्ये दही मिसळावे. यामुळे शुष्क त्वचा निघून जाऊन त्वचा मुलायम व नितळ होते.
तुळशीप्रमाणेच या काही औषधी झाडांचे गुणधर्म जाणून घ्या.
संबंधीत दुवे -
डार्क सर्कल्स हटवण्याचा घरगुती उपाय !
घरगुती उपायांनी दूर करा कोपरे-गुडघ्यांचा काळपटपणा !
लसणामध्ये दडले आहेत 5 सौंदर्यवर्धक गुणधर्म !!
Translated by – Lina Bhalke
Source - Tulsi or basil — a home remedy for glowing skin
छायाचित्र सौजन्य - Getty images
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.