Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हिपॅटायटिस –कारणे, लक्षणं आणि निदान !

$
0
0

हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे  पसरणारा आजार आहे. या संसर्गामुळे यकृताच्या कार्यावर आघात  करतो.  हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी, इ असे पाच प्रकार आहेत. त्यामुळे आजाराची गंभीरता लक्षात घेता लीवर (यकृत) सुजण्याची शक्यता असते. यामुळे मृत्यूदेखील ओढावू शकतो. विशेषतः हिपॅटायटिस बी व  सी यामुळे हा आजार तीव्र होऊ शकतो.  परिणामी त्याचे रुपांतर लिव्हर सिरॉसिस, कॅन्सर यामध्ये होऊ शकते. (आहारातील हे ’7′ पदार्थ तुमचे लिव्हर धोक्यात आणू शकतात !)

हिपॅटायटीसचे प्रकार -

हिपॅटायटीस हा व्हायरल इंन्फेक्शनमुळे होत असल्याने त्या  रोगजंतूच्या प्रकारानुसार  त्याचे 5 प्रकारात विभाजन करण्यात  करण्यात आले आहे.  हे पाचही प्रकार जगभरात त्याच्या गंभीरतेमुळे चिंतेचा विषय बनत आहेत.

  • हिपॅटायटीस ए 

‘WHO’ या आरोग्यसंस्थेच्या निष्कर्षानुसार जगभरात  दरवर्षी 1.4 मिलियन जणांना  ‘ हिपॅटायटीस ए’ चा संसर्ग होतो.  दुषित पाणी किंवा अन्नातुन ‘हिपॅटायटीस ए’  या वायरसचा शरीरात प्रवेश झाल्याने हा आजार होतो.

  • हिपॅटायटीस  बी 

हिपॅटायटीस  बी वायरस हा प्रामुख्याने दुषित रक्त शरीरात (transfusion) गेल्यास  किंवा शरीरातील दुषित ‘बॉडी फ्लुईड’, वीर्याशी संबंध आल्यास जडू शकतो.

  • हिपॅटायटीस सी 

हिपॅटायटीस सी वायरस हा प्रामुख्याने वैद्यकिय  चाचण्या व उपचारादरम्यान दुषित रक्ताशी संबंध आल्यास होण्याची शक्यता असते. ( ‘हेपटायटस सी’ ग्रस्त वडिलांना लिव्हर दान करणार्‍या जुही पवारची प्रेरणादायी कहाणी )

  • हिपॅटायटीस डी  

हिपॅटायटीस डी वायरसमुळे हा आजार होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्ती ‘ हिपॅटायटीस बी ‘मुळे ग्रस्त आहे अशाच व्यक्तींना ‘हिपॅटायटिस डी’ होतो. मात्र  हे दोन्ही संसर्ग एकाच वेळी होणे हे फारच गंभीर स्वरूपाचे ठरू शकते.

  • हिपॅटायटीस इ 

हिपॅटायटीस इ वायरस हा जगभर झपाट्याने वाढत आहे. दुषित पाणी व अन्नाच्या माध्यमातून हा वायरस मानवी  शरीरात प्रवेश करतो.

हिपॅटायटीस हा त्याच्या स्वरूपानुसार सौम्य किंवा तीव्र होऊ शकतो.

सौम्य स्वरूप : 

अचानक यकृताला सूज येणे व सहा महिन्यांत हा आजार आटोक्यात येणे शक्य असते. सौम्य  स्वरुपातील हिपॅटायटीस हा हळूहळू ठिक होऊ शकतो. प्रामुख्याने हिपॅटायटीस ए हा सौम्य प्रकार आहे.

तीव्र स्वरूप : 

तीव्र स्वरूपाचा संसर्ग दरवर्षी जगभरातील 13- 150 मिलियन रुग्णांना जडतो. यामुळे यकृताचा  कॅन्सर, यकृत निकामी होणे यामुळे मृत्यू होण्याचे  प्रमाणही अधिक आहे. हिपॅटायटिस इ ग्रस्त रुग्ण त्यांची रोगप्रतिकारशक्ती खालावल्याने अधिक धोक्यात येतात.  यकृतविकारांना दूर ठेवा या ’6′ नैसर्गिक उपायांनी !

हिपॅटायटीस जडण्याची कारणं - 

  • व्हायरल इंफेक्शन :  जगभरात हिपॅटायटस जडण्यामागे व्हायरल इंफेक्शन हे एक कारण आहे. त्यामुळे हिपॅटायटस ए, बी व सी जडण्याची  जडण्याची शक्यता अधिक असते.
  • ऑटोइम्यु-कंडीशन (Autoimmune condition):  यकृताजवळील रोगप्रतिकार पेशी कमकुवत झाल्यास त्याचा  परिणाम यकृताच्या कार्यावर होऊ शकतो.
  • मद्यपान :  दारूमुळे शरीराच्या मेटॅबॉलिझमवर परिणाम होतो. यामुळे शरीराचे कार्य बिघडते.  त्यामुळे अतिप्रमाणात मद्यसेवन केल्यास यकृत निकामी होते.
  • अतिप्रमाणात औषधं घेणे –   वैद्यकीय सल्ल्याविना औषध घेतल्यास किंवा एसिटामिनोफेन (acetaminophen) यासारख्या औषधांचा अति वापर केल्यास यकृताजवळील पेशींचे नुकसान होऊ शकते.

लक्षणं

  • कावीळ
  • मुत्राचा गडद  रंग
  • थकवा
  • मळमळणे
  • उलट्या
  • पोटदुखी
  • खाज येणे
  • भूक मंदावणे
  • वजन घटणे

हिपॅटायटीसच्या प्राथमिक अवस्थेत ही लक्षण आढळून येत नाहीत. मात्र हळूहळू तीव्र स्वरूपात ही लक्षण आढळतात.

निदान

तुमच्या लक्षणानुसार डॉक्टर यकृताची होणारी वाढ, त्वचेचा पिवळेपणा, पोटात असलेले पाण्याचे प्रमाण अशा काही शारिरीक चाचण्या करू शकतात. मात्र गंभीर  स्वरूपाच्या हिपॅटायटसचे  निदान करण्यासाठी या काही चाचण्या करणे आवश्यक आहेत.

  • लीवर फंक्शन टेस्ट (liver function tests)
  •  अल्ट्रासाउन्ड (ultrasound)
  • ऑटोइम्यू ब्लड मार्कर (autoimmune blood markers)
  •  हिपॅटायटिस ए, बी व सी ची टेस्ट (hepatitis A,B, or C)
  •  लीवर बायोप्सी ( liver biopsy)
  • पैरासेनटेसीस (paracentesis)

उपाय 

सौम्य स्वरुपाचा हिपॅटायटीस  योग्य उपचारांनंतर आटोक्यात आणणे शक्य आहे.  मात्र या आजाराची तीव्रता वाढल्यास वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

हिपॅटायटीस बी आणि सी चा प्रादुर्भाव हा  व्हायरल इंफेक्शनमुळे होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी  खालील काही उपाय करा

हिपॅटायटीस ए चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी

  • शारिरीक स्वच्छता पाळा
  • स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवा, खाण्यापूर्वीदेखील हात स्वच्छ धुवावेत.
  • अस्वच्छ ठिकाणी खाणे टाळा. लहान मुलांना हिपॅटायटीस प्रतिबंधक लस जरूर  टोचून घ्यावी.
  • सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एण्ड प्रिवेन्शन [ Center for Disease Control and Prevention (CDC)]  यांच्या अहवालानुसार लहान मुलांबरोबरच 18 वर्षांपर्यंतची मुल व मध्यमवयीन लोकांनी देखील 6-12 महिन्यांत 3 डोस घ्यावेत.

 

Translated By  -  Dipali  Nevarekar

Source - Hepatitis


छायाचित्र सौजन्य – shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 

 

 

 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>