Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ब्रेस्ट कॅन्सरशी धैर्याने सामना करण्यासाठी खास ’10′टीप्स !

$
0
0

तुम्हांला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला ‘ब्रेस्ट कॅन्सर’चे निदान झालय ? मग आता खचून जाऊ नका. या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा. ‘ब्रेस्ट फीटनेस’ ( सेंट मार्टीन प्रेस) याच्या सहलेखिका यांनी ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची  ट्रीटमेंट  घेताना काळजी घेण्यासाठी तसेच त्यातूल लवकर बाहेर पडण्यासाठी या खास ’10′ टीप्स शेअर केल्या आहेत. पण वेळीच ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ओळखण्यासाठी करा ‘सेल्फ ब्रेस्ट एक्झाम’ 

1. तुमच्या मनातील सारे प्रश्न लिहा 

उपचारादरम्यान तुम्हांला पडणारे सारे प्रश्न डॉक्टरांना विचारा. ते लिहून काढल्यास अपॉईंटमेंटच्या वेळी विचारणे सुकर होते. तुमच्या नजरेत आलेली माहिती डॉक्टारांकडून तपासून घ्या आणि त्यानुसार योग्य निर्णय घ्या.

2.योग्य डॉक्टरांची निवड करा 

कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये कार्यरत असलेले डॉक्टर  निवडा. कारण सतत  याच विषयाशी निगडीत असल्याने त्यांना नव्या घडामोडी व संशोधनाबाबत अधिक माहिती असते. स्पेशल कॅन्सर सेंटर्स किंवा हॉस्पिटल्समध्ये एकाच ठिकाणी सारे उपचार, आर्थिक मदत तसेच पथ्यपाण्याबाबत माहिती मिळेल.

3. तुमच्या मित्रपरिवाराशी /नातेवाईकांशी बोला 

तुम्हांला कर्करोगाचे निदान झाले आहे, हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना / नातेवाईकांना सांगणे  हे धैर्याचे काम आहे. काळजीपोटी त्यांच्यापासून लपवून ठेवणे टाळा. तसेच त्यानंतरही याविषयाबाबत  खुलेपणाने  बोला.

4. आर्थिक सहाय्याची मदत घ्या 

कर्करोगाची ट्रीटमेंट खर्चिक असते. अशावेळी आवश्यकता भासल्यास आर्थिक मदत घ्या. काही सेवाभावी संस्था, देवस्थानं तसेच समाजसेवक गरजेनुसार मदत करतात. काही उपचारपद्धती उपलब्ध करून देतात त्याची मदत घ्या.

5. मोनोपॉजच्या लक्षणांबाबत डॉक्टरांशी बोला 

काही ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्समध्ये केमोथेरपीदरम्यान गर्भाशय काढले जाते, काहींमध्ये हार्मोन रिपलेसमेंट थेरपी ही मोनोपॉजच्या लक्षणांवरून ठरवली जाते. त्यामुळे मोनोपॉजची लक्षण कशाप्रकारे कमी करावीत याबाबत डॉक्टरांशी बोला.

6. ‘हेल्दी डाएट’कडे दुर्लक्ष करू नका 

कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे  तुमची चव, वास यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच भूक मंदावते. त्यामुळे वाफवलेल्या भाज्या, सूप्सचा आहारात समावेश करा. एकावेळी भरपेट खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने आणि हलकेफुलके पदार्थ खावेत. यामुळे अधिक एनर्जी मिळेल.

7. लिम्फडीमाचा त्रास टाळण्याचा प्रयत्न करा 

 लिम्फडीमा हा ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंटचा एक दुष्परिणाम आहे. यामध्ये काखेत, हाताजवळ किंवा छातीजवळील सॉफ्ट टिश्यूंना सूज येण्याची शक्यता असते. हा जीवघेणा त्रास नाही. मात्र त्याची गंभीरता वाढण्याआधीच उपचार घ्यावेत. सुज येण्यासोबतच संवेदना कमी होणे, संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. 

8. व्यायाम करा 

ट्रीटमेंट दरम्यान हलका व्यायाम करण्यास काही हरकत नाही. नियमित चालणे या व्यायामामुळे तुमचा शारिरीक आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर हळूहळू व्यायाम करा. यामुळे थकवा कमी होईल तर स्नायू बळकट होण्यास मदत होईल.

9. हाडांची काळजी घ्या 

हाडांची मजबुती ठेवणं हे  सार्‍यांसाठीच फार आवश्यक आहे. मात्र ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी हाडांची मजबुती ठेवणं फार गरजेचं आहे. काहीजणींमध्ये ट्रीटमेंटमुळे ठिसूळपणा वाढण्याचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

10. काम आणि ट्रीटमेंटचा समन्वय साधा 

काही जण कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यानदेखील काम करु शकतात. मात्र काहीजणींना या ट्रिटमेंटच्या दरम्यान होणार्‍या त्रासामुळे कामातून काही दिवस आराम घेणे भाग असते. त्यामुळे जर तुम्ही ब्रेक घेतला असेल तर पूर्ण ट्रीटमेंट संपल्यानंतर कामावर रूजू व्हा. यामुळे  त्रासदायक विचारांपासून तुम्ही दूर रहाल.

 


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - 10 tips to cope with breast cancer

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>