मेष -:
तुमच्या राशीतील ग्रहमान या आठवड्यात आरोग्याच्या चिंता वाढवणार्या ठरणार आहेत. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. मधूमेहींनी आहाराचे पथ्यपाणी कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. या आठवड्यात इजा होण्याची शक्यता आहे.
वृषभ -:
या आठवड्यात मधूमेहींनी काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्या-पिण्याबाबत पथ्य पाळा. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हलका व्यायाम करा. अनपेक्षितरित्या इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धारधार वस्तू हाताळताना काळजी घ्या.
मिथून -:
या आठवड्यात श्वसनाचे विकार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच सांध्याचे दुखणे अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. आहारात कॅल्शियमयुक्त भाज्या आणि फळं यांचा अधिक समावेश करा. तसेच औषधांच्या वेळा पाळा.
कर्क -:
या आठावड्यात राशीतील ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. काही जुने आणि बरे झालेले आजार पुन्हा नव्याने डोकं वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर औषधोपचार करा. श्वसनाशी निगडीत आजार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
सिंह -:
या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदाबामध्ये चढ-उतार होत असल्यास चाचणीद्वारा वेळीच त्यावर नियंत्रण ठेवा. मधूमेहींनी त्यांच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे या आठवड्यात गरजेचे आहे.
कन्या -:
तुमच्या राशीतील ग्रहमान पाहता कॅल्शियमची कमतरता या आठवड्यात त्रासदायक ठरू शकते. दातदुखी, घशातील खवखव यासारख्या समस्यांवर तात्काळ उपचार घ्या. तसेच या आठवड्यात इंफेक्शन होण्याचा संभव असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
तूळ -:
या आठवड्यात आरोगाची काळजी घ्या. लहानसहान वाटणार्या समस्यादेखील या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्लक्ष न करता लक्षणं आढळताच तात्काळ उपचार सुरू करा.
वृश्चिक -:
आरोग्याच्या दृष्टीने सांधेदुखी आणि रक्तदाबाच्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अपघाताने इजा होण्याची दाट शक्यता आहे. तरूणांचे आरोग्य उत्तम राहील. वाढत्या वयानुसार शारिरीक त्रास कमी करण्यासाठी मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक करा.
धनू -:
या आठवड्यातील ग्रहमान मधूमेहींना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी दिलेल्या डाएटला कटाक्षाने पाळा. अपघाताने शरीराच्या खालच्या बाजूला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्या.
मकर -:
श्वसनाशी निगडीत समस्यांची या आठवड्यात काळजी घ्या. तसेच त्यावर वेळीच उपचार करा. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास नियमित चाचणी करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. योगा आणि ध्यानसाधना केल्यास तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
कुंभ -:
या आठवड्यातील तुमच्या राशीतील ग्रहमान आरोग्यविषयक समस्या वाढवणारे ठरणार आहे. आजारपणामुळे काही दिवस घरी सकतीचा आराम करणे भाग आहे. सौम्य लक्षणं आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा.
मीन -:
या आठवड्यात ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. तापामुळे तुम्ही काही दिवस आजारी राहण्याची शक्यता आहे. त्यावर डॉक्टरांकडून वेळीच उपचार आणि औषधं सुरू करा.