छायाचित्र सौजन्य -: Shutterstock
Translated By – Dipali Nevarekar
Read this in English
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ बेबी पावडरच्या वापरामुळे एका महिलेचा ओव्हेरियन कॅन्सरने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातदेखील ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’च्या सोबतीने शॉवर टू शॉवर, डरमी कूल ,नायसिल आणि पॉन्ड्स यासारख्या काही अग्रगण्य टाल्कम पावडर कंपनींचे नमूने अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून तपासले जाणार आहेत. तसेच टाल्कम पावडरमध्ये काही हेवी मेटल आहेत का याची चाचणी होणार आहे. (नक्की वाचा : सर्व्हायकल कॅन्सरची ’10′ लक्षणं ! )
अमेरिकेत जॅकलिन फॉक्स या 65 वर्षीय महिलेचा ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ कंपनीची बेबी पावडर वापरल्याने मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. त्यानुसार कंपनीला 72 मिलीयन डॉलर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणीही करण्यात आली आहे. जॅकलिन फॉक्स ही महिला वुमेन हायजिन जपण्यासाठी 35 वर्ष जॉन्सन अॅन्ड जॉन्सन तसेच शॉवर टू शॉवर या टाल्कम पावडर वापरत असे. त्यानंतर तिचा ऑक्टोबर 2015 मध्ये ओव्हेरियन कॅन्सरने मृत्यू झाला. अमेरिकेत या प्रकरणी जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे. टाल्कम पावडरच्या प्रमाणेच नेहमीच्या वापरातील या ’20′ वस्तू ठरू शकतात ‘कॅन्सरचे कारण’ ! त्यामुळे या वस्तूंचा वापरदेखील करताना काळजी घ्या.
आपल्याकडे बाळाच्या जन्मापासून ते बारसं आणि वाढदिवसापर्यंत ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ सारख्या कंपनीची विविध गिफ्ट हॅम्पर्स देणं अनेकांना सोयीस्कर वाटतं. (नक्की वाचा : नवजात बाळाला भेटण्यापूर्वी या ’6′ गोष्टी अवश्य लक्षात ठेवा ) पण त्याची वैद्यकीय सुरक्षा धोक्यात आल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र अन्न आणि औषध सुरक्षा विभागाने कडक पावलं उचलली आहे. त्यानुसार जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला नोटीस पाठवून काही अधिकार्यांना कंपनीची बाजू आणि सुरक्षिततेचे पुरावे देण्याची संधी दिली असल्याची माहिती अन्न आणि औषध सुरक्षा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे. बेबी पावडरचा वापर लहान बाळांव्यतिरिक्त या या ’5′ समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठीदेखील होऊ शकतो.
एफडीए जॉईंट कमिशनर, ओमप्रकाश सधवानी, यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात उपलब्ध असलेल्या एखाद्या उत्पादनामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्यास त्याची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार त्याची वांद्रा -कुर्ला कॉम्पलेक्स येथील ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड्सच्या लॅबमध्ये चाचणी करण्यात येईल.