Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अश्वगंधा –पुरूषांमधील इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्याचा रामबाण उपाय !

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

पुरूषांमधील इन्फर्टिलिटी वाढण्यामागे शुक्राणूंची कमतरता हे सर्रास आढळणारे एक कारण आहे. मग त्याची संख्या वाढवण्यासाठी काही हर्ब आहारात घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिकदृष्ट्यादेखील या हर्ब्सचा इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसून आले आहे. ‘अश्वगंधा’ ही वनस्पती अशांपैकीच एक ! मग पहा अश्वगंधाच्या पानांनी कसा कराल हा त्रास दूर .. ( नक्की वाचा : शुक्राणू आणि पुरूषांच्या फर्टीलीटीबाबत जाणून घ्या ’6′ आश्चर्यकारक गोष्टी !)

  • कशी ठरते अश्वगंधा फायदेशीर ?

पुरूषांसाठी अश्वगंधा कामवासना (aphrodisiac) उत्तेजित करण्यास फायदेशीर ठरते. अश्वगंधामुळे शरीरात नायट्रीक अ‍ॅसिडला चालना मिळते.परिणामी जननेंद्रियाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. तसेच सेक्श्युअल डिझायर ( सेक्स करण्याची इच्छा) सुधारते. एविडन्स बेस्ड कॉम्पलिमेंटरी अ‍ॅन्ड अल्टरनेटीव्ह मेडिसीनच्या अभ्यासानुसार, अश्वगंधाच्या मुळांचा रस शुक्राणूंची संख्या वाढवण्यास, व्हॉल्युम वाढवण्यास मदत होते. अश्वगंधामुळे टेस्टोस्टेरॉनच्या निर्मीतीस चालना मिळते. अश्वगंधाच्या पानांचा वापर वजन घटवण्यास कसा करावा हे देखील जाणून घ्या. ( नक्की पहा : यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!)

कसा कराल त्याचा आहारात समावेश ? 

#1 ग्लासभर गरम दुधामध्ये अर्धा टीस्पून अश्वगंधाची पावडर मिसळा.

हे मिश्रण दिवसातून प्यावे. तसेच सकारात्मक निकाल पाहण्यासाठी तुम्हांला काही दिवस असे दूध नियमित पिणे गरजेचे  आहे. पण दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !

#2 यासोबतच अश्वगंधाच्या मूळांचा रस पिणेदेखील फायदेशीर ठरू शकतो. परंतू त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. किंवा त्याऐवजी तुम्ही अश्वगंधाच्या गोळ्या / कॅप्सूलचा पर्याय निवडू शकता. परंतू डोस हे डॉक्टरांच्या सल्ल्याने निवडा.  अश्वगंधा तुमच्यासाठी सुरक्षित आहे का हे विचारून घ्या. तसेच तुम्हांला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास अश्वगंधाचे सेवन करणे टाळा.

पण तुम्हांला ठाऊक आहे का बाळ कसं होतं ?

Reference: 

[1] Ambiye, V. R., Langade, D., Dongre, S., Aptikar, P., Kulkarni, M., & Dongre, A. (2013). Clinical Evaluation of the Spermatogenic Activity of the Root Extract of Ashwagandha (Withania somnifera) in Oligospermic Males: A Pilot Study.Evidence-Based Complementary and Alternative Medicine : eCAM, 2013, 571420. http://doi.org/10.1155/2013/571420


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>