Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
७ मार्च २०१६- महाशिवरात्री
……………………………………………………………………………………………
महादेवाच्या पूजेमध्ये प्रामुख्याने वापरले जानारे पान म्हणजे बेलपत्र. बेलपत्रासोबतच बेलफळ (कवठ) हेदेखील अर्पण केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात बेलफळाचा मुरंबा प्रामुख्याने खाल्ला जातो. धार्मिक महत्त्वाप्रमाणेच बेल आणि बेलफळाचे आरोग्यदायी गुणधर्मदेखील आढळतात. आयुर्वेदामध्ये बेलाला दशमूळांपैकी एक मानले जाते. मधूमेहींसाठी बेल अतिशय गुणकारी आहे. यासोबतच ताप, बद्धकोष्ठता आणि डोळ्यांच्या विकारामध्येही बेल गुणकारी ठरतो. पण तुम्ही तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
- कशी ठरतात बेलाची पानं गुणकारी ?
बेलपत्रामध्ये अॅन्टी -डाएबिटीक गुणधर्म आढळतात हे वैज्ञानिकदृष्ट्यादेखील सिद्ध झाले आहे. बेलपत्राचा रस रक्तातील साखरेप्रमाणे कोलेस्टेरॉलवरही नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. बेलपत्राच्या रसात हायपोग्ल्यास्मिक आणि अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्माने परिपूर्ण असतो. ज्या पदार्थांमध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी तितका तो पदार्थ मधूमेहींसाठी फायदेशीर ठरतो. बेलपत्राच्या पानांमुळे स्वादूपिंडाच्या कार्याला चालना मिळते. परिणामी इन्सुलिनची निर्मिती सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. बेलपत्रासोबतच मधूमेह नियंत्रित करतील हे ’10′ घरगुती उपाय !
- कसा कराल बेलपत्राचा आहारात समावेश ?
#1 रिकाम्या पोटी किमान 4-5 स्वच्छ धुतलेली आणि ताजी बेलपत्राची पानं चघळा. हा प्रयोग नियमित केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
#2 काही ताज्या बेलपत्राच्या पानांचा मिक्सरमधून रस काढून घ्या. त्यामध्ये काळामिरीची चिमूटभर पावडर मिसळा. तयार मिश्रण नियमित प्या. ( नक्की वाचा : मधुमेहींसाठी खास औषधी चहाचे 5 पर्याय ! )
#3 बेलपत्रासोबत तुम्ही काही तुळशीची पानंदेखील चघळून खाऊ शकता. यामुळे मधूमेहासोबत कोलेस्ट्रेरॉलवरही नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.
खबरदारीचा उपाय -: बेलफळ किंवा बेलपत्राचे सेवन गरोदर स्त्रियांनी टाळावे. बाळासाठी प्रयत्न करत असल्यास किंवा गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बेलफळ किंवा बेलपत्राचा आहारात समावेश करावा. नक्की जाणून घ्या बाळ कसे होते ? आणि तुम्ही आई होण्याचा विचार करत असल्यास गर्भारपणात हे 6 पदार्थ खाणे टाळा.
References:
- Ankita, G., & Gupta, S. K. Wound Healing Activity of Topical Application of A. marmelos and Cow Ghee. International Journal Of Drug Discovery And Herbal Research (Ijddhr) 4(2&3): April-September.: (2014), 741-445
- T. Gohil, N. Pathak, N. Jivani, V. Devmurari and J. Patel. Treatment with extracts of Eugenia jambolana seed and Aegle marmelos leaf extracts prevents hyperglycemia and hyperlipidemia in alloxan induced diabetic rats. African Journal of Pharmacy and Pharmacology Vol. 4(5), pp. 270-275, May 2010
- Gupta, P. Preparation and standardization of Jamun RTS supplemented with Amla Juice and Bael Juice Pankaj Gupta. Online International Interdisciplinary Research Journal, {Bi-Monthly}, ISSN 2249-9598