Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कफाचा त्रास दूर करेल खडीसारखेचे तुकडे !

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे. खडीसाखरेमुळे कमकुवत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास, ताण तणाव हलका करण्यास मदत होते. तसेच घशातील खवखव, खोकला दूर करण्यास मदत होते. कफाचा खोकला कमी करण्यासाठी खडीसाखर मदत करते.( नक्की वाचा : खोकल्याच्या प्रकारानुसार करा योग्य औषधाची निवड !)

  • कफाचा त्रास कमी करण्यासाठी कशी वापराल खडीसाखर
  • काळामिरी आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र वाटावी. या मिश्रणाची बारीक पूड तयार करा.
  • चहामध्ये हे मिश्रण एकत्र करून दिवसातून पिणे हितावह आहे. यामुळे  तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच कफाचा त्रास नियंत्रणात राहतो. काळामिरी आणि मधाचे मिश्रणदेखील दूर ठेवेल कफाचा त्रास !

खडी साखर ही कच्चा स्वरूपातील साखर आहे. त्यामुळे नेहमीच्या वापरातील साखरेपेक्षा खडीसाखर खाणे अधिक फायदेशीर ठरते. दक्षिण भारतात उन्हाळ्यात रिफ्रेशिंग पेय बनवण्यासाठी खडीसाखरेचा वापर केला जात असे. ग्लासभर पाण्यात खडीसाखरेची पूड मिसळली जाते. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते. तसेच ताणदेखील हलका होतो. ग्लुकोजमधून मिळणारी उर्जा इंद्रियांना शांत करते.

पण साखरेतून मिळणार्‍या कॅलरीबाबत काय ?

खडी साखरेत किती असतात कॅलरीज

नेहमीच्या वापरातल्या साखरेपेक्षा पत्री साखरेत कॅलरीज कमी असतात. ‘हेल्दी फाय  मी’ नुसार एक टीस्पून नेहमीच्या वापरातील साखरेतून 12 कॅलरीज मिळतात. तर एक टीस्पून खडीसाखरेतून 10 कॅलरीज मिळतात. नेहमीच्या वापरातील साखरेच्या तुलनेत खडीसाखरेतून मिळणारी कॅलरी सारखीच वाटत असली तरीही खडीसाखर चवीला उग्र असते. त्यामुळे थोड्या प्रमाणात त्याचा वापर केला तरीही तुमचे समाधान होऊ शकते.

कोणताही पदार्थ प्रमाणात खाणे हितकारी आहे. त्यामुळे अतिप्रमाणात साखर खाऊ नका. स्त्रियांनी साखर प्रतिदिन 100 कॅलरीज आहारात घ्यावी  तर पुरूषांच्या आहारात 150 कॅलरीज पुरेशा आहेत.

मधूमेही आणि खडीसाखर

मधूमेहाच्या रुग्णांनी साखरेऐवजी इतर स्विटनिंग एजंट वापरणे चूकीचे आहे. असे श्रेया डायबेटिक सेंटरचे डॉ.प्रदीप गाडगे सांगतात. कारण गूळ, साखर आणि खडीसाखर हे तिन्ही पदार्थ उसापासूनच बनतात.पण मधूमेहींनी सुकामेवा खाणे योग्य आहे का ? पोषणद्रव्यांच्या तुलनेत साखरेपेक्षा खडीसाखर अधिक चांगली असली तरीही साखरेचे प्रमाण समानच आहे. म्हणूनच मधूमेहींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करावा. 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>