Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
फळांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात आढळणारी द्राक्षं चविष्ट आणि आरोग्यदायीदेखील असतात. आठवड्यातून किमान तीन दिवस वाटीभर द्राक्षं खाल्ल्यास हृद्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. द्राक्षातील अॅन्टीऑक्सिडंट आणि पॉलिफेनॉल्स घटक हृद्यविकार नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. आरोग्यदायी द्राक्षं शरीरातील रक्तपुरवठा सुधारण्यास मदत करते. द्राक्षांपासून तयार केली जाणारी वाईन पिण्याऐवजी मूळ स्वरूपातील द्राक्षं खाणं अधिक फायदेशीर ठरते. द्राक्षं खाल्ल्याने शरीराला फायबरचादेखील मुबलक पुरवठा होतो. परिणामी पोट आरोग्यदायी राहते.
वाटीभर द्राक्षं कसे सुधारते हृद्याचे कार्य ?
#1 अथेरोस्लेरॉसिस (atherosclerosis) चा त्रास कमी करतो -:
अथेरोस्लेरॉसिस (Atherosclerosis) म्हणजे रक्तवाहिन्या जाड होणे. यामुळे अनेक हृद्यविकार जडण्याची तसेच हृद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. जर्नल ऑफ सर्क्युलेशनच्या 2001 मधील अहवालानुसार द्राक्षाचा रस प्यायल्यास ( प्रामुख्याने जांभळ्या) प्लेटलेट्सचा दाह वाढतो. तसेच नायट्रिक ऑक्साईडचा प्रवाह सुधारतो. यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते. यामुळे रक्तवाहिन्या जाड होण्यापासून बचावतात.
#2 वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते :
द्राक्षामध्ये आढळणारे पॉलीफेनॉल्स घटक हृद्यविकारांना कमी करण्यास मदत करते. तसेच एलडीएल कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाणही कमी होते. द्राक्षांमुळे ऑक्सिडेटीव्ह ताण कमी होण्यास मदत होते. तसेच हृद्याच्या आतील नाजूक त्वचेचेदेखील नुकसान होण्यापासून बचाव होतो.
#3 रक्तदाब कमी करण्यास मदत करतो -:
द्राक्षातील आरोग्यदायी गुणधर्म रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. तसेच रक्तावाहिन्यांना सदृढ आणि स्वास्थ्यकारक बनवण्यास मदत करतात.
Reference
1. Freedman JE, Parker C 3rd, Li L, Perlman JA, Frei B, Ivanov V, Deak LR,Iafrati MD, Folts JD. Select flavonoids and whole juice from purple grapes inhibit platelet function and enhance nitric oxide release. Circulation. 2001 Jun 12;103(23):2792-8. PubMed PMID: 11401934.
2. Wightman JD, Heuberger RA. Effect of grape and other berries on cardiovascular health. J Sci Food Agric. 2015 Jun;95(8):1584-97. doi: 10.1002/jsfa.6890. Epub 2014 Oct 6. Review. PubMed PMID: 25171728.
3. Dohadwala MM, Vita JA. Grapes and cardiovascular disease. J Nutr. 2009 Sep;139(9):1788S-93S. doi: 10.3945/jn.109.107474. Epub 2009 Jul 22. Review.PubMed PMID: 19625699; PubMed Central PMCID: PMC2728695.