Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

$
0
0

October 8 is World Sight Day.

ज्या डोळ्यांनी आपण हे सुंदर जग पाहतो. त्याची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. त्रास होत नसतानादेखील कितीजण डोळ्यांची चाचणी करतात ? सतत कम्युटर, मोबाईल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. पण कामाच्या निमित्ताने मोबाईल, कम्युटर टाळणे अशक्य असते. अशावेळी डोळ्यांची काळजी घेताना काय लहान सहान बदल करणे आवश्यक आहे याबाबत डिरेक्टर ऑफ़ आय असोसिएशन ( मुंबई) डॉ. प्रितम सामंत यांनी दिलेल्या या टीप्स जरूर पाळा -

कम्युटरच्या अतिवापरापासून डोळ्यांचे रक्षण कसे करावे ?

सतत कम्युटरच्या स्क्रिनकडे पाहणे टाळा.अधूनमधून पापण्यांची उघडझाप करणे आवश्यक आहे. काहीवेळ कामातून ब्रेक घ्या. तसे न केल्यास डोळ्यांची शुष्कता वाढते. यामुळे डोळे लाल  होण्याची शक्यता असते. म्हणूनच डोळ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी स्क्रीन तुमच्या नजरेच्या खाली ठेवा.  

टीव्ही किंवा लॅपटॉप वापरताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी  ? 

टीव्ही किंवा लॅपटॉप पाहताना 20-20 रूल पाळणे गरजेचे आहे. म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 सेकंदाचा ब्रेक ! तुमच्यापासून किमान20फीट दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे पाहा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होईल.

अनेकदा लोकं ब्रेक घ्यायला विसरतात. अशावेळी ही सवय लागेपर्यंत तुम्ही फोनवर रिमांईडर लावा. ही सवय सतत स्मार्टफोन्स किंवा टॅब्लेट वापरणार्‍‍या व्यक्तींनीदेखील लावणे गरजेचे आहे. (नक्की वाचा : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी या ’7′ सवयी दूर ठेवा)

 डोळे कधी तपासावेत? किंवा नेत्रचिकित्सकाची सल्ला घेणे कधी अटळ होते ?
  • जेव्हा डोळ्यांचा लालसरपणा वाढतो, त्यावर सूज दिसते किंवा सतत पाणी येते, चिकट स्त्राव येणे ही डोळे येण्याची लक्षणं आहेत. यावर तात्काळ उपाय करणे आवश्यक आहे.
  • जेव्हा एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी कमी होते. त्यावेळी डोळे तपासण्याची, चष्मा बदलण्याची गरज आहे.
  • सतत डोकेदुखीचा त्रास होत असल्यास डोळे तपासा. अनेकदा नर्व्ह्संना सूज आल्यास हा त्रास वाढू शकतो.
  • मधूमेही, रक्तदाबाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा डोळे तपासून घेणे गरजेचे आहे. तसेच 4 वर्षांहून अधिकच्या वयोगटातील सार्‍यानीच वर्षांतून एकदा अवश्य डोळे तपासावेत.
  • 40 वर्षांहून अधिकच्या वयोगटातील सार्‍यांनीच आय प्रेशर तपासून घेणे गरजेचे असते.
  • ज्यांचा मायनस नंबर अधिक आहे. त्यांनी नियमित डोळे तपासणे गरजेचे आहे. तसेच रेटीनाची तपसणी करून घेणे गरजेचे आहे.

निरोगी डोळ्यांसाठी तुम्ही काय टीप्स द्याल ?

  • व्हिटामिन ए,ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटामिन सी युक्त पदार्थांचा आहारात पुरेसा समावेश करावा.
  • नियमित डोळ्यांचे चेकअप करावे.
  • युवी रे पासून रक्षण करणारे सनग्लास वापरावेत.

हिरवळीवरून चालणे कसे ठरते डोळ्यांसाठी फायदेशीर ? हे तुम्हांला ठाऊक आहे का

संबंधित दुवे - 

जवळचे दिसणे सुकर करेल हे ’5′ घरगुती उपाय

 


Dr Preetam Saman is also an Associate Professor of Grant Medical College and Sir JJ Hospital, Mumbai. He is also a Consultant at PD Hinduja Hospital, Mumbai. He is a specialist in vitreoretinal surgery and LASERS.


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - World Sight Day – How to keep your eyes healthy at all ages

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>