टॉन्सिल्स हे घशाच्या मागील बाजूची ग्रंथी ! त्याला सूज आल्यामुळे किंवा संसर्गामुळे घशात वेदना होणे, बोलणे, अन्न खाणे, गिळणे कठीण होते. यावर औषधोपचार केल्यास त्रास कमी होतो. मात्र त्याऐवजी काही घरगुती उपायांनीदेखील टॉन्सिल्सच्या वेदना कमी होण्यास मदत होते. मग घशातील खवखव आणि वेदना कमी करणारा उपाय म्हणजे हळदीचे दूध !
का आहे हळदीचे दूध फायदेशीर ?
हळदीच्या दुधामुळे घशातील खवखव कमी होते. तसेच त्यातील अॅसट्रींजंट आणि अॅन्टीसेप्टिक घटक सूज कमी करण्यासही मदत करते. त्यामुळे टॉन्सिल्सचा त्रास कमी होण्यास मदत होते. यासोबतच काळामिरी घशातील संसर्ग दूर करण्यास मदत करते. त्यामुळे मधासोबत मिरपूड मिसळून चाटावे. हळदीचे दूध प्यायल्याने वेदना आणि त्रास कमी होण्यास मदत होते.
साहित्य -
- ग्लासभर उकळलेले दूध
- चिमूटभर हळद
- काळामिरीची पूड
- चमचाभर मध
कसे बनवाल हळदीच्या दुधाचे मिश्रण
- एका पातेल्यात ग्लासभर दूध उकळा. एक उकळ आल्यानंतर त्यात हळद आणि मिरपूड मिसळा. या मिश्रणाला थोडा वेळ उकळत ठेवा.
- नंतर मिश्रण गाळून त्यात चमचाभर मध मिसळा. कोमट असताना हे दूध प्यावे.
- रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण पिणे फायदेशीर ठरते.
- डॉ.एच.के भाकरू यांच्यामते, नियमित 3 रात्री हे मिश्रण पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते व टॉन्सिल्सच्या त्रासापासून आराम मिळेल.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Home remedy for tonsillitis you will be thankful for!
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.