पिळदार मिशा आणि रूबाबदार दाढी यास्वरूपातच महाराष्ट्रीयन पुरूषाचे वर्णन केले जाते. मग तुम्हीही असा भारदस्त लूक नक्कीच आजमावून पाहायला काहीच हरकत नाही. मग झटपट दाढी वाढवण्यासाठी हे काही सहजसोपे उपाय तुम्ही नक्की आजमावून पहा.
नारळाचे तेल : नारळाचे तेलामुळे दाढीची वाढ चांगल्या प्रकरे होते.
- १० भाग नारळाचे तेल आणि १ भाग रोझमेरी(rosemary) तेल यामुळे चेहऱ्याचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. तसेच केसही वाढतात.
- हे तेलाचे मिश्रण कापसाच्या बोळ्यावर घेवून चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. (नक्की वाचा: नारळाच्या दुधाचे 5 आरोग्यदायी फायदे)
आवळ्याचे तेल : आवळा हे दाढी झटपट वाढवण्यास मदत करते. हे तेल मोहरीच्या पानाच्या पेस्टबरोबरही लावू शकता.
- ह्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.
- मोहरीच्या पानांची पेस्ट करून त्यात आवळ्याच्या तेलाचे थेंब मिसळा. तयार मिश्रण १५ मिनिटांनी चेहऱ्याला लावा थोड्यावेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
असे आठवड्यातून ४ वेळा केल्यास तुम्हाला दाढीच्या वाढत्या केसांमधला फरक जाणवेल.
तमालपत्र आणि लिंबू
- तमालपत्राची पावडर आणि दोन चमचे लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र करा.
- हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.
हा उपाय सगळ्यांनाच लागू पडत नाही. कारण काही जणांच्या त्वचेला लिंबाचा रस संवेदनशील ठरण्याची शक्यता असते. जर तुम्हांला काही त्रास झाल्यास हे मिश्रण लावू नका. तर इतरांनी हे मिश्रण आठवड्यातून दोनवेळा चेहरयाला लावा.
निलगिरी तेल : रोझमेरी(rosemary) तेलाप्रमाणे, निलगिरी तेल ही दाढीच्या केसांची वाढ होण्यास मदत करते. पण या तेलामुळे चेहर्याची आग होते. म्हणूनच या तेलाबरोबर ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलाचे काही थेंब एकत्र करा.
- अर्धा कप ऑलिव ऑईल किंवा तीळाच्या तेलाबरोबर १५ थेंब निलगिरीच्या तेलाचे मिश्रण करा.
- तयार मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. जर चेहरा तेलकट वाटत असेल तर तो साबणाने पुन्हा धुवा.
या सोबतीने तुम्हाला खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- तुमच्या आहारामध्ये मिनरल्स आणि व्हिटामिन्स असणे गरजेचे आहे.
- सौम्य मॉईश्चरायझर फेसवॉशने चेहरा धुवा.
- त्याचप्रमाणे सारखे रखरखीत साबणाने तोंड धुण्याचे थांबवा ज्यामुळे त्वचा नेहमी कोरडी राहते.
- सिगारेटचे व्यसन टाळा. त्यातील निकोटीनमुळे केसांची वाढ खुंटते. (नक्की वाचा:मैत्री, प्रेम आणि सिगारेट … , पण प्रेमात खरचं सारं माफ असतं ?)
- तणाव हे सुद्धा केसांच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण करते. त्यामुळे योगा किंवा ध्यानसाधना करून तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा.
संबंधित दुवे -
घरगुती उपचारांनी मिळवा, चेहर्यावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती!
Translated By - Sushantdeep Sagvekar
Source – Wish to keep a fully grown beard? Here are home remedies to grow beard faster
छायाचित्र सौजन्य – shutterstock
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.