Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘ब्रेस्ट सेल्फ एक्झाम’–स्तनांचा कर्करोग ओळखण्याचा पहिला संकेत

$
0
0

ऑक्टोबर – ‘ब्रेस्ट कॅन्सर जागृती महिना’ 

तणावाग्रस्त जीवनाशैलीमुळे आजकाल अनेक आजार फार कमी वयात आणि लवकर जडण्याचे प्रमाण वाढले आहे. स्तनांचा कर्कारोग हा असा एक आजार. डॉक्टरांच्यामते, जितक्या लवकर याची निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते. 35 वर्षांवरील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी करणं आवश्यक आहे. मात्र  अनेकजणी पुरेशा माहिती अभावी किंवा त्यातील वेदनांमुळे ही चाचणी करणे टाळतात.  पण ‘ सेल्फ एक्झाम’ म्हणजेच स्वतःच्या स्तनांची चाचणी स्वतः करणे देखील फायदेशीर ठरू  शकते.  हा हमखास  खात्रीशीर उपाय नसला तरीही यामुळे तुम्हांला गाठींचा अंदाज येऊ शकतो.

‘ब्रेस्ट सेल्फ एक्झाम’ म्हणजे काय ?

या निदान प्रक्रियेमध्ये तुम्ही स्तनांना स्पर्श करून गाठी किंवा अनियमित बदलांबद्दल माहिती करून घेऊ शकता. याकरिता विविध स्थितींमध्ये झोपून, उभे राहून आरशात हे बदल तुम्ही पाहू शकता.

कशी कराल ही चाचणी ?   

दी नॅशनल ब्रेस्ट कॅन्सर फाऊंडेशनच्या नुसार 20 वर्षाहून अधिक वयोगटातील मुलीने  महिन्यातून एकदा ही चाचणी करणे गरजेचे आहे. याचाचणी दरम्यान हलका दाब द्यावा. अतिदाबामुळे अस्वस्थता वाढू शकते. तसेच मासिकपाळीच्या दिवसांत ही चाचणी टाळावी. या दिवसांत स्तन अधिक संवेदनशील होतात.

1) उभ्याने चाचणी -
breast-self-exam-shower-194x300

ही चाचणी तुम्ही एखाद्या खोलीत किंवा बाथरूममध्ये करू शकता. हात सरळ रेषेत वर करा. हळूहळू स्तनाच्या बाहेरील बाजूकडून आतील दिशेने गोलाकार दिशेने हात फिरवा. मात्र सुरवात  काखेपासून करा. एखादी गाठ, जाडसरपणा जाणवतोय का? याकडे लक्ष द्या. तसे  आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2) आरशासमोर चाचणी  - 

breast-self-exam-mirror-246x300

आरशासमोर उभे राहून हात कंबरेवर ठेवा. आता स्तनांच्या रंगात, स्वरूपात,त्वचेत काही बदल झालेत का ? हे पहा. तसेच हात वर करूनदेखील हा प्रयोग करून पहा.

3)  झोपून  करा चाचणी - 

breast-self-exam-lying-down-300x171

पाठीवर झोपून एका खांद्याखाली उशी ठेवा. ज्या खांद्याखाली उशी आहे तो हात सरळ रेषेत वर करा आणि दुसर्‍या हाताने चाचणी करा. या दरम्यान त्वचा, गाठ आणि स्वरूपात काही बदल झालेत का? हे जरूर पहा. अशाचप्रकारे उशी बदलून दुसर्‍या स्तनाचीदेखील चाचणी करा. तसेच स्तनातून काही स्त्राव होतोय का ? याकडेही लक्ष द्या.

कर्करोगाबाबत भीती बाळगळून चाचण्या टळण्यापेक्षा शरीरात होणार्‍या बदलांकडे वेळीच लक्ष द्या. यामुळे त्याचा त्रास कमी होण्यास मदतच होईल.

संबंधित दुवे - 

जाणून घ्या स्त्रीयांच्या स्तनाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - How to do a breast self-examination to check for cancer

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>