मुंबई – 24 x 7 रुग्णांच्या सेवेत सेवेत असणार्या डॉक्टरांकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नसतो. पण आता डॉक्टरांचेही आरोग्य निरोगी राहण्यासाठी जे.जे रुग्णालयात खास सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते नुकतेच जे.जे रुग्णालयातील अद्ययावत व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
डॉ.दीपक सावंत यांनी या व्यायमशाळेसाठी आमदार निधीतून खास अद्ययावत साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. तसेच या व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी लवकरच महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशी रिक्रेशन सेंटर्स उभारली जातील अशी माहिती डॉ.सावंत यांनी दिली आहे. व येत्या पाच वर्षांत डॉक्टरांचा मेंटल व फिजिकल स्ट्रेस कमी होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. (सलंब सर्वांगासन – ताण दूर करण्याचा उपाय )
- संबंधित दुवे-
ट्रेडमिल वापरताय ? मग या 5 खास टिप्स पहाच !
जिममध्ये व्यायामापूर्वी नाश्त्याला खा हे 5 पदार्थ
छायाचित्र सौजन्य – Getty Images