महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या (27 मे) रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. मार्च महिन्यात पार पडलेल्या एच.एस.सी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतसंस्थळावर दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल.
बारावीचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या निकालाची काळजी करत न बसता शांतपणे त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा.
कुठे पहाल बारावीचा निकाल ?
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com
www.hscresult.mkcl.org
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर 4 जून रोजी विद्यार्थांना दुपारी तीन वाजता निकालाची प्रत हाती मिळेल. तर त्यानंतर 15 जून पर्यंत विद्यार्थी गुणपडताळणी बाबत अर्ज दाखल करू शकतात.
एका परीक्षेच्या आधारे सार्या जीवनाचा निर्णय घेऊ नका. तसेच मुलांना परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांनी त्यांना रागवताना या ५ चुका टाळा.
संबंधित दुवे-