बाळ झाल्यानंतर त्याची नाना प्रकारे काळजी घ्यावी लागते. बाळाचा आहार, आरोग्य याबाबत सतत सतर्क राहावे लागते. त्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळत त्याचे लसीकरण इतपर्यंत सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. या सगळ्यात आपले लहान सहान गोष्टींकडे नकळत दुर्लक्ष होते. म्हणून या काही सोप्या टीप्स ज्यामुळे तुमचं बाळ हेल्दी आणि गुटगुटीत राहील. नक्की वाचा: नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड !
रात्री आईने दूध पाजल्याशिवाय अनेक बाळ झोपत नाहीत. परंतु, दात यायला लागल्यानंतर रात्रीचे दूध देऊ नये. कारण त्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीज होतात. असा सल्ला अनेक डॉक्टर देतात. या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !
रात्री दूध पाजल्याने दात खराब होतात का?
बाटलीने दूध पिताना किंवा ब्रेस्टफिडींग करताना थोडेसे दूध बाळाच्या तोंडात राहते. ते पूर्णपणे गिळले जात नाही. त्यामुळे बाळाच्या नवीन येणाऱ्या दातांना हानी पोहचते. म्हणून दात येत असताना रात्रीचे दूध न पाजण्याचा सल्ला डॉक्टर देतात. विशेषतः बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर असे करणे टाळावे. परंतु, रात्रीचे दूध दिल्याशिवाय बाळ झोपत नसेल किंवा दूध न देणे कोणताही कारणामुळे कठीण होत असल्यास दूध पाजल्यानंतर बाळाला थोडं पाणी पाजा. त्यामुळे दोन फायदे होतील:
१. त्यामुळे तोंडात राहिलेले दूध गिळून टाकण्यास मदत होईल. बाळाच्या रडगाण्यामागे दडल्यात या ’5′ भावना !
२. तसंच दातांचे कॅव्हिटीपासून संरक्षण होईल. म्हणून लहान मुलांना दात येताना वेळीच काळजी घ्या. लहान मुलांच्या दूधाच्या दातांबाबत वेळीच जाणून घ्या या ’8′ गोष्टी !
हे करण्याची योग्य पद्धत कोणती?
दूध पाजताना बाळ झोपी जात असले तर त्याला/तिला अलगद उचला आणि अर्धा चमचा पाणी पाजा. त्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून सावकाश हात फिरवा म्हणजे बाळाला ढेकर येईल. ढेकर न आल्यास बाळाच्या पोटात दुखू लागेल व मध्यरात्री बाळ रडत उठेल. जाणून घ्या: बाळाने ढेकर दिल्याशिवाय त्याला का झोपवू नये ?
रात्री भूक लागल्यावर बाळ मध्ये मध्ये जागे होते. तेव्हा दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळी बाळाला १-२ चमचे पाणी पाजा. हे करणे थोडेसे कठीण असले तरी त्यामुळे बाळाचे दात सुरक्षित राहतील. जरूर वाचा: बाळाला दात येताना ही काळजी नक्की घ्या
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock