अनेकजण ट्रेडमीलवर भरपूर व्यायाम करतात. अशाप्रकारे ट्रेडमीलवर व्यायाम केल्यानंतर शरीराला उर्जा आणि चालना मिळते. तसेच कॅलरीज बर्न होतात, हृद्याच्या कार्याचा वेग सुधारतो असा सल्ला Technogym चे मॅनेजिंग डायरेक्टर पंकज अरोरा यांनी दिला आहे. पण ट्रेडमीलवर व्यायाम करून स्वास्थ्य सुधारण्यासाठी या वर्कआऊट्सच्या प्रकाराचाही नक्की प्रयत्न करून पहा. ट्रेडमिल वापरताय ? मग या 5 खास टिप्स पहाच !
- वॉकिंग लंग्स - या व्यायामामध्ये ट्रेडमीलमध्ये कोणताच अडथळा नसतो. त्यामुळे तुमच्या मूव्हवर पूर्ण लक्ष केंद्रीत करता येते. परिणामी तुमच्या लेग बर्निंग लंग्जचा ( leg-burning lunge) योग्य परिणाम मिळतो.
- साईड शफल्स - याप्रकारच्या शफल्समुळे मांड्यांच्या आतील आणि बाहेरील भागांना पुरेसे स्ट्रेचिंग मिळते.म्हणूनच कार्डियो व्यायामामुळे शरीर सुडौल होण्यास मदत होते.
- वॉकिंग प्लान्क - या व्यायामामुळे खांद्याच्या पुढच्या भागाला स्ट्रेचिंग मिळते. यामध्ये स्टेबिलायझर अधिक तीव्रतेने काम करतात.
- रिव्हर्स माऊंटन क्लाईम्बर्स - नियमित केल्या जाणार्या माऊंटन क्लाईम्बर्समध्ये शरीराचा व्यायाम होतो. मात्र रिव्हर्स माऊंटन क्लाईम्बर्स मध्ये पायांच्या मागच्या बाजूला, गुडघ्यांच्या विरुद्ध दिशेला स्ट्रेचिंग होते. तुम्ही मागच्या भागाला टोनअप करत असाल तर हा पर्याय उत्तम आहे.
- क्रॅब वॉक - अनेकजणांनी शेवटचा क्रॅब वॉक केवळ शाळेतच केला असेल. पण हा एक उत्तम व्यायाम आहे. ट्रेडमीलवर हा व्यायाम केल्याने हार्मस्टिंग, ट्रायसेप्स, कोअर मसल्स बळकट होण्यासाठी मदत होते.
- ट्रेडमील पुश – वजनदार स्लेड ढकलणं कठीण आणि सोबतच आव्हानात्मक व्यायाम आहे. म्हणूनच ट्रेडमील बंद करून पुढे धावण्याचा सराव करा.
मात्र सार्याच ट्रेडमीलवर त्या बंद असताना पट्टा पुढे सरकत नाही. अशाप्रकारे पट्टा सरकत नसेल तर त्यावरच वेळ वाया घालवू नका. इतर कोणता तरी व्यायामप्रकार आजमावून पहा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock