Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

चणा डाळीची खीर –गोड प्रेमींसाठी हेल्दी पर्याय

$
0
0

जेवणाचं ताट गोडाच्या पदार्थाने पूर्ण होते. पण वजन आटोक्यात ठेवण्यासाठी अनेकजण गोडाचे पदार्थ टाळतात. पण खीरी सारख्या पदार्थाला थोडा हेल्दी ट्विस्ट दिला तर तुम्ही त्याचा बिनधास्त आस्वाद घेऊ  शकता. चना डाळीचे पीठ आणि गूळ एकत्र करून हेल्दी खीर कशी बनवाल हे तुम्ही नक्की जाणून घ्या. चणा डाळीमध्ये व्हिटामिन आणि फायबर्सचा मुबलक साठा असतो तर गूळात आयर्न मुबलक आढळते.  (गूळ खा आणि या ’7′ समस्या दूर ठेवा)

साहित्य – :

  • चणा डाळ  – 1/2  कप
  • नारळाचं दूध  – 1/2  कप
  • गूळ – 1/2  कप
  • तांदळाची भरड  – 1 टीस्पून
  • वेलची पूड– 1 टीस्पून
  • काजू पूड– 1 टीस्पून

कृती – : 

  • चणाडाळ प्रेशर कूकरमध्ये वाफवून घ्या. मात्र अति वाफवू नका.
  • वाफवलेली डाळ पातेल्यात काढून त्यात नारळाचे दूध एकत्र करा आणि मंद आचेवर 10 मिनिटे गरम करावे.
  • यामध्ये गूळ व तांदळाची भरड एकत्र करून 10 मिनिटे गरम करा.
  • यामध्ये काजूपूड मिसळून गॅस  बंद करा.
  • तयार खीर थोडी थंड करून मग त्याचा आस्वाद घ्या.

संबंधित दुवे -

हेल्दी आणि टेस्टी ‘मूगडाळीची खीर’

दलिया खीर विथ चॉकलेट – हेल्दी खीरीला नवा टेस्टी ट्विस्ट !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - Chana dal kheer — a healthy way to indulge your sweet tooth

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>