Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी १० फायदेशीर उपाय !

$
0
0

आजकाल डिप्रेशन म्हणजे काय हे सांगण्याची गरजच नाही कारण अगदी टीनएज मुले व तरुण मुलांमुलींच्या आयुष्यात देखील नैराश्य आल्याच्या अनेक केसेस आपण सतत पहात असतो.अशा नैराश्याच्या अधीन गेलेल्या लोकांना त्यामधून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे.डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी इतरांची मदत घेणे हाच त्यावर चांगला उपाय असू शकतो.

Spiritual healer Mynoo Maryel यांनी त्यांच्या मुलाच्या ११ ते १७ या वयातील नैराश्य व चिंतेबाबतच्या वैयक्तिक अनुभवातून नैराश्य दूर करणारे काही उपाय शेअर केले आहेत.हे उपाय तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना नैराश्य दूर करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.यासाठी लक्षात ठेवा नैराश्य ही एक व्यापकतेने पसरणारी स्थिती असून तुम्ही त्यातून पुर्णपणे बाहेर पडू शकता.तसेच जाणून घ्या आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !

जाणून घेऊयात डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी काही प्रभावी उपाय-

१.यासाठी सर्वप्रथम तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात या वास्तव स्थितीचा स्वीकार करा.डिप्रेशन एका रात्रीत येत नाही.त्यासाठी चिंता-काळजी निर्माण करणा-या अनेक घटना कारणीभूत असू शकतात.डिप्रेशनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत:ला अंधारात ढकलण्यासारखे आहे.कारण त्यामुळे नंतर एखादी भावनिक गोष्ट देखील तुम्हाला नैराश्य आणू शकते.तसेच नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी.

२.दुसरी गोष्ट म्हणजे या वाईट काळात देखील तुम्हाला विश्वास असायला हवा की तुम्ही यातून पुर्णपणे नक्कीच बरे व्हाल व पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकाल.जसे एखाद्या काळ्याकुट्ट अंधा-या रात्रीनंतर सुर्योदय हा होणारच असतो.यासाठी नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जे करता येणे शक्य आहे ते करा.तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या मित्र-मंडळी,कुटूंबातील माणसे अथवा एखाद्या जिवलग व्यक्तीला सांगू शकता.तसेच यासाठी प्रोफेशनल मदत देखील घ्या ज्यामुळे तुम्हाला ही समस्या दूर करणे सहज शक्य होईल.

३.जीवनात घडलेल्या सर्व छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींकडे स्वत:चे लक्ष वेधा.तुमच्या मनाला उभारी आणणा-या गोष्टी शोधा.तुम्हाला आनंद वाटेल अशा छोट्या छोट्या गोष्टी करा.या गोष्टी केल्याने तुम्हाला अधिक आनंद व प्रोत्साहन मिळेल.सुरुवातीला या गोष्टी करणे तुम्हाला थोडे कठीण जाईल पण हळूहळू त्यातून तुम्हाला आशेची किरणे दिसू लागतील.एकदा का तुम्हाला तुम्ही कशामुळे आनंदी होता हे समजू लागले की तशा अनेक गोष्टी तुम्हाला जीवनात दिसू लागतील व तुम्ही पुन्हा आनंदाचा अनुभव घेऊ लागाल. Mynoo Maryel यांनी मुलाच्या नैराश्यातील कठीण काळात त्याला सहकार्य केल्यामुळेच त्यांच्या मुलाच्या जीवनात आमुलाग्र बदल घडू शकला.

४.त्यांच्या मुलांमधील डिप्रेशन दूर करण्यासाठी त्यांना सकारात्मक वायब्रेशन व मनाला उभारी आणणा-या गोष्टींची मदत झाली.त्यामुळे एखादे चांगले ध्येय साध्य करण्यासाठी वाईट गोष्टींपासून दूर रहाणे हाच यावर एक उत्तम मार्ग असू शकतो.यासाठी सावध रहा,दक्ष रहा,स्वत:कडे पहा व स्वयंप्रेरीत व्हा.तुम्ही निराश होताय असे तुम्हाला वाटू लागले की तुम्हाला आवडणा-या गोष्टी करा अथवा तशा गोष्टींचा शोध घ्या.ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतील.स्वत:बद्दल शंका येऊ लागल्यास व उदासीन वाटू लागल्यास एखादा मनोरंजक व्हिडीओ,सुंदर फोटो अथवा निसर्गसौदर्य पहा.

५.पोषक आहार घ्या(हाय वायब्रेशन फूड ज्याला रेन्बो फूड असे म्हणतात)तुमच्या आहारात विविध रंगाच्या पदार्थांचा समावेश करा.कारण पोषक आहार तुम्हाला डिप्रेशन दूर करण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्टीने सुदृढ करतो.आहार शाकाहारी अथवा मांसाहारी कोणताही असला तरी त्यातून तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन व मिनरल्स मिळतील याची दक्षता घ्या.त्याचसोबत डीप्रेस मूड सुधारायला आहारात करा हे बदल !

६.मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी तुम्हाला आवडणा-या गोष्टींची यादी करा.डिप्रेशनमध्ये निराश भावनिक अवस्थेत असे करणे थोडे कठीण जाऊ शकते.पण लक्ष विचलित करण्यासाठी व मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी या गोष्टीची तुम्हाला चांगली मदत होऊ शकते.या आयुर्वेदीक उपचारांनी करा डिप्रेशनवर मात !

७.इतर काही गोष्टी करुन तुमच्या भावनिक अवस्थेला बदला.जसे की यासाठी संगीत ऐका,बागेतून अथवा झाडांच्या सानिध्यात फिरण्यास जा ज्यामुळे तुम्हाला ताजे वाटेल.निसर्ग तुम्हाला तुमच्या मनातील भावना समजून घेण्यास उत्तेजन देईल.यासोबत स्वास्थ्य सुधारायला binaural beats ऐकणं अशाप्रकारे करते मदत !हे देखील जरुर वाचा.

८.आधार देणा-या गोष्टींना तुमच्या मनातील कृतज्ञतेच्या भावनेने जोडा.यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात याचे चिंतन करा.कृतज्ञतेने माणसाचे मन शांत होते.तुम्ही जितके कृतज्ञ व्हाल तितकी तुम्हाला मनशांती देखील अधिक मिळेल.कृतज्ञता व्यक्त करणे ही गोष्ट स्मरणात राहण्यासाठी लहान लहान गोष्टींची मदत घ्या.जसे की एखादी गाठ मारुन ठेवणे किंवा पाकीटामध्ये एखादी स्मरण करणारी गोष्ट ठेवणे.त्यामुळे त्या गोष्टीला पाहताच तुम्हाला कोणाबद्दल तरी कृतज्ञता व्यक्त करायची आहे याचे स्मरण होईल.यासोबतच केवळ शारिरीक नाही तर मानसिक समस्यांचाही वेळीच निचरा करा हे देखील जरुर वाचा.

९.नकारात्मक माणसे,टिव्हीवरील नकारात्मक बातम्या व नकारात्मक गोष्टी तुमची स्थिती अधिक खराब करु शकतात.त्यामुळे अशा गोष्टींपासून दूरच रहा.तसेच ताणात देखील आनंदी व सकारात्मक असल्याची कल्पना करा.आणि अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं अवश्य वाचा

१०.प्रत्यक्षात पाहणे शक्य नसल्यास फोटोमध्ये सुर्योदय व सुर्यास्त पहा.कारण सोनेरी व केशरी रंगामुळे तुम्ही तुमच्या आत्मशक्तीसोबत पुन्हा जोडले जाल.जीवनामधील जादू अनुभवण्याचे हे एक भक्कम पाऊल असेल.

Note: Spiritual healer Mynoo Maryel is a corporate leader turned seer, who lives in Bali. Her ‘The BE book’ is an Amazon bestseller.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>