गरोदरपणात गरोदर महिलेला अनेक सल्ले दिले जातात.कधीकधी हे सल्ले तिच्या भल्याचे असतात तर कधीकधी हे सल्ले म्हणजे गरोदरपणाबाबत असलेले फक्त काही समज असू शकतात.गरोदरपणाबाबत लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज असतात.गरोदर महिलेने अस्थमा या समस्येसाठी इन्हेलर वापरणे याबाबत देखील काही समज व गैरसमज आहेत.याबाबत केलेल्या अनेक संशोधनातून काही शक्यता समोर आल्या आहेत.संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की अस्थमाचा त्रास व फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यासाठी प्रभावी इनहेलर कोर्टीकोस्टिरॉइड थेरपी गर्भारपणातील धोका कमी करते.पण फक्त यावर विश्वास ठेवण्यापेक्षा गरोदरपणात कोणतेही औषध सुरु अथवा बंद करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.
मॅक्स हॉस्पिटलचे सिनीयर कन्सल्टंट डॉ.के.के.पांडे यांच्या मते गरोदरपणी अस्थमाचा धोका टाळण्यासाठी कोर्टीकोस्टिरॉइड असलेले इन्हेलर वापरुन अस्थमा नियंत्रणात आणता येतो.बाळाच्या योग्य वाढ व विकासासाठी बाळाला नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होणे गरजेचे असते.बाळ आईच्या गर्भात असताना हा पुरवठा तिच्या रक्तामधून बाळाला होत असतो.पण यासाठी आईची अस्थमा तपासणी नियमित होणे आवश्यक अाहे.ज्यामुळे तिच्या फुप्फुसांचे कार्य सुरळीत आहे का व गर्भाला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे का हे समजू शकते.कारण जर आईला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर याचा दुष्परिणाम बाळावर होऊ शकतो.यासाठी जाणून घ्या योग्य अस्थमा इन्हेलर कसा निवडावा?
इन्हेलर बाबतीत सांगायचे झाल्यास स्त्री गरोदर असेल अथवा नसेल तरी देखील तिच्यावर अस्थमा औषधांचा परिणाम हा समानच होत असतो.त्यामुळे गरोदरपणी अस्थमा नियंत्रणात ठेवण्यासाठी अस्थमा थेरपी सोबत इन्हेलर वापरणे,अस्थमा वाढवणा-या अॅलर्जीपासून दूर राहणे फार गरजेचे आहे.अस्थमाचा धोका वाढवणा-या अॅलर्जी, धुळ, धळीकण, प्रदुषके, धुम्रपान अशा गोष्टींपासून स्वत:ला कसे दूर ठेवावे याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत देखील चर्चा करु शकता.तसेच गरोदर स्त्रीला याबाबत काय दक्षता घ्यावी किंवा सेल्फ-मॉनिटरींग कसे करावे,डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत कशा पाळायच्या,वेळेवर औषधे कशी घ्यायची,वैद्यकीय मदतीची तुम्हाला केव्हा गरज असू शकते व इन्हेलरचा योग्य वापर याबाबत देखील अचूक ज्ञान असणे गरजेचे आहे.यासाठी अस्थमावर फायदेशीर असे आयुर्वेदीक उपचार !देखील जरुर वाचा.
मॅक्स हॉस्पिटलचे सिनीयर कन्सल्टंट डॉ.पांडे याच्या सल्लानूसार गरोदर महिलेने यासाठी धुळ,फर,तीव्र सुंगध व इतर प्रदुषके अशा गोष्टींपासून दूर रहावे.धुळीकणापासून दूर राहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चादर व उशीचा वापर करावा.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धुम्रपान करणे टाळावे व धुम्रपान करणा-या लोकांपासून देखील दूर रहावे.यासाठी जाणून घ्या या ’10′ कारणांमुळे येऊ शकतो अस्थमाचा अॅटॅक !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock