अलिकडे सतत महिलांवर स्टाल्कर्सकडून हल्ले झाल्याच्या अनेक घटना ऐकू येतात.मागच्या वर्षी देशभरात स्टाल्किंग व त्यासंबधित हिंसाचाराच्या अनेक प्रकरणांची नोंद झाली आहे.फेब्रुवारीमध्ये केरळ मधील एका मुलीला तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डने तिच्यावर पाळत ठेऊन तिला जिंवत जाळले.तर वर्ष भरापूर्वीच चेन्नई मधील एका मुलीची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.थोडक्यात Stalkers या समस्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.कारण अशाने या दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना अधिक प्रोत्साहन मिळू शकते.
Mind Matterz च्या फाउंडर व डायरेक्टर,सायकॉलॉजिस्ट श्रद्धा संकुलकर यांच्याकडून जाणून घेऊयात अशा ट्विस्टेड माइंड स्टाल्कर विषयी अधिक माहिती व त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स-
Stalkers कोण असतात?
Stalkers म्हणजे अशी एक व्यक्ती जी एखादा अथवा एखादीचा वेड्यासारखा पाठलाग करते व त्यांना छळते. स्टाल्कर छळ करत असलेल्या व्यक्तीला त्यांच्यासोबत सतत फोन कॉल,पत्र व्यवहार अथवा मेलच्या माध्यमातून संवाद साधण्यास भाग पाडू शकतात.मिडीयावर सतत जरी पुरुष स्टाल्कर महिलांवर हल्ले करत असल्याच्या बातम्या सांगितल्या जात असल्या तरी संकुलकर यांच्या मते पुरुष व महिला या दोघांमध्ये देखील स्टाल्कर प्रवृत्ती आढळू शकते.स्टाल्कर ही भावनिक दृष्या असुरक्षित माणसे असतात.त्यांचे लहानपणी जसे संगोपन होते तसे ते मोठेपणी वागू लागतात.स्टाल्करीश टेंडसी असलेल्या माणसांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची पोकळी असते जी ते या वेडाच्या भरात तात्पुरती भरुन काढण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यांच्या अशा वागण्यातून त्यांच्यामधील भावनिक अस्थिरता व कमी आत्मसन्मान या दोन्ही बाबींची झलक दिसत असते.यासोबत हे प्रेम नसून आकर्षण असल्याचे संकेत देतात या ‘९’ गोष्टी हे देखील जरुर वाचा.
तरुणपणीच ही समस्या निर्माण होेते-
जेव्हा एखादे मुल टीनएज मध्ये प्रवेश करते तेव्हा त्याचे खरे व्यक्तिमत्व विकसित होऊ लागते.मानशास्त्रज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व त्याचे करीयर,रिलेशनशिप व कला-कौशल्य या तीन गोष्टींमधून घडत असते.कारण या माध्यमातून लोक एकमेकांना आपली ओळख पटवून देत असतात.(जसे की करीयर-“मी एक उद्योजक आहे.” रिलेशनशिप-“मी दोन मुलांची आई आहे.” कला-कौशल्य-“मी संगीतकार आहे.”)
स्टाल्कर व्यक्तीला त्याची ओळख त्याच्या आयुष्यातील रिलेशनशिप मधून करायची असते.वयात येताना अशी माणसे त्याच्या पालकांसोबत हेल्थी रिलेशनशिप निर्माण करण्यात अपयशी ठरतात.मानसशास्त्रज्ञांच्या मते पालकांच्या निष्काळजीपणामुळे अशा मुलांच्या आयुष्यात एक प्रकारची पोकळी निर्माण होते.त्यामुळे त्यांना आवडणा-या एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करुन अथवा त्याच्यासोबत काल्पनिक रिलेशनशिप असल्याचे स्वप्नरंजन करुन स्टाल्कर त्यांच्यावर कोणाचे तरी खरोखरच प्रेम आहे अशी त्यांची फॅन्टेसी पुर्ण करण्याचा प्रयत्न करतात.तसेच जाणून घ्या नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी
स्टाल्करचे प्रकार-
-
रिजेक्टेड स्टाल्कर -रिजेक्टेड प्रेमी कधीतरी प्रेम मिळेल या आशेपोटी त्याच्या पूर्व जोडीदाराचा पाठलाग करतात.
-
इन्टीमसी-सीकींग स्टाल्कर-काही स्टाल्करनां ते छळत असलेली व्यक्ती कधीतरी त्यांच्या प्रेमात पडेल या आशेपोटी त्यांच्यासोबत इन्टीमेट होण्याची फॅन्टेसी असते.
-
इनकम्पीटंट स्टाल्कर- ते त्रास देत असलेल्या व्यक्तीचे त्यांच्यावर प्रेम नाही हे त्यांना माहित असते.पण तरीही देखील पाठलाग करुन अथवा छळून त्यांना मिळवण्याचा ते प्रयत्न करीत असतात.
-
प्रीडेटोरी स्टाल्कर-अशा स्टाल्करनां त्यांना बळी पडलेल्या व्यक्तीमध्ये सेक्शुअल इंटरेस्ट असतो.त्यामुळे ते लैंगिक भूक शमवण्यासाठी त्यांचा सतत पाठलाग करतात.
स्टाल्करच्या बळी पडलेल्या लोकांवर याचा नेमका काय परिणाम होतो?
-
स्टाल्करच्या बळी पडलेल्या लोकांची चिंता वाढते.
-
त्यांना झोप लागत नाही.
-
काही जणांमध्ये पोस्ट ट्रॉमेटीक स्ट्रेस डिसॉर्डर विकसित होतो.
-
त्यांच्यामध्ये निराधार असल्याची व नैराश्याची भावना विकसित होते.
-
काही लोक स्टाल्करच्या तावडीतून सुटण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.यासोबत वाचा या ’10′ कारणांमुळे मनात येतात आत्महत्येचे विचार !
-
सामान्यपणे असे लोक स्टाल्करच्या अत्याचार व हिंसाचाराचे बळी पडतात.
स्टाल्करपासून सुरक्षित राहण्याचे मार्ग कोणते?
जर तुम्हाला तुमचा कोणीतरी पाठलाग करत असल्याचा संशय असेल तर या महत्वाच्या टीप्स जरुर करा-
-
तुमच्या सोशल मिडीया अकाउंटची प्रायव्हर्सी सेटींग बदला.ज्यामुळे तुमची महत्वाची वैयक्तिक माहिती कोणापर्यंत पोहचणार नाही.
-
तुमच्या घरातील मंडळींच्या सुरक्षेची काळजी घ्या.कारण स्टाल्कर त्यांचा तुम्हाला त्रास देण्यासाठी गैरवापर करु शकतात.
-
काहीही झाले तरी स्टाल्कर सोबत संवाद करु नका.कारण यामुळे तुम्हाला त्यांच्यामध्ये रस आहे असा चुकीचा संदेश त्यांना मिळेल व पुढे समस्या निर्माण होतील.
-
अशा व्यक्तीला सुधारण्याचा विचार करुन त्यांच्यासोबत बोलू नका कारण यामुळे देखील त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल.
-
जर तुमचा पाठलाग होतोय असे वाटत असेल तर तुमचा मार्ग व वेळ सतत बदला.
-
एकटयाने प्रवास करु नका.
-
स्टाल्करच्या विरोधातील पत्र,मेल,फोन कॉल्स रेकॉर्ड जमा करुन ठेवा.कदाचित या गोष्टींचा तुम्हाला पुढे उपयोग होऊ शकतो.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock