मनिष हा एक कामाप्रती प्रामाणिकपणा दाखवणारा तरुण एका नामांकित कंपनीमध्ये एका मोठ्या टीमसोबत काम करतो.लहान वयापासून त्याने असे अनुभवले आहे की जे लोक रागावतात व भांडतात त्यांच्याकडे इतरांचा पाहण्याचा दृष्टीकोन हा कलूषित असतो.त्याच्या हे ही लक्षात आले आहे की जे लोक खंबीर व स्पष्टवक्ते असतात तेही लोकांना फारसे आवडत नाहीत.त्यामुळे तो नेमका कसा वागतो? तर तो सर्वांसोबत अगदी गुडीगुडी वागण्याचा प्रयत्न करतो.ब-याचदा लोकांना त्याचे हे असे वागणे आवडते.पण गुडीगुडी वागण्याच्या सोबत त्याला असे देखील वाटत असते की लोक त्याला सतत गृहीत धरतात.त्याच्या बॉसला त्याने केलेले चांगले काम कधीच दिसत नाही त्यामुळे तो त्याच्या कलीग्सनां प्रमोशन देण्याचा निर्णय घेतो.खरेतर यामुळे मनिषला खूप वाईट वाटते पण त्याबद्दल बॉसला जाऊन विचारण्याऐवजी तो अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचण्याचा निर्णय घेतो.यासाठी ज्या दिवशी त्याच्या टीमला त्याची खरंच गरज असते तेव्हा तो अचानक आजारी पडतो व त्याच्या टीममेंबर्सना धडा शिकवतो.
तुम्ही देखील अशा एखाद्या माणसाला भेटला आहात का? मनिष हे एक पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह व्यक्तीमत्व आहे.या उदाहरणावरुन आपण आपल्या आजूबाजूला असणा-या अशा व्यक्तीला ओळखून त्याच्या स्वभावाविषयी अधिक जाणून घेऊयात.तसेच कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स !देखील जरुर वाचा.
पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे सुरुवातील खूपच चांगली वाटतात.पण हळूहळू त्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यामधील हे अवगुण तुमच्या लक्षात येऊ लागतात.अशा माणसांसोबत काम करणे त्यांच्या निष्क्रियपणा मुळे खूपच त्रासदायक होऊ शकते.
पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसांना ओळखण्यासाठी ही त्यांची आठ लक्षणे जरुर जाणून घ्या-
१.अशी माणसे कामात दिरंगाई करतात-
दिरंगाईमुळे एखादी व्यक्ती काम करण्यासाठी मागे राहू शकते.समजा तुम्ही मनिषची एखाद्या कामासाठी मदत मागितली तर तो ते काम करण्यासाठी उत्साह दाखवत नाहा अथवा पुढे येत नाही.उलट तो ते काम करु शकत नाही हे सांगण्यासाठी देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहतो.यातून तो तुम्हाला कामासाठी त्याच्याकडे पुन्हा मदत मागू नये हे शिकवत असतो.
२ धुसमुसत काम करतात-
जेव्हा मनिषला कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी सोपवण्यात येत तेव्हा तो ते काम करण्यासाठी अजिबात उत्साही नसतो.ते काम करण्याची इच्छा नसल्यामुळे तो आतल्याआत धुसमुसत रहातो.तुम्ही जर अशा व्यक्तीला काय झाले असे विचारले तर तो तुम्हाला उडवाउडवीचा उत्तरे देतो अथवा शांत बसतो.
३.मुद्दाम वाईट काम करतात-
अशी माणसे खरेतर षडयंत्री असतात.मनिष कडे लिखाणाचे कौशल्य आहे. तुम्हाला त्याची तुमच्या एखाद्या ऑफिशल ड्राफ्ट अथवा लेटरसाठी मदत हवी असते.पण त्याला असे वाटते की तो कामामध्ये बिझी असताना तुम्ही त्याच्यावर अधिक कामाची भर टाकण्याचा प्रयत्न करीत आहात.अशा वेळी शांतपणे त्याला हे काम करणे आता शक्य नाही असे सांगण्याऐवजी तो तुम्ही त्याच्याकडून पुन्हा मदत मागू नये यासाठी कसेतरी चुकीचे अथवा अर्धवट काम तुम्हाला करुन देतो.
४.सारासार विचार न करताच निषेध व्यक्त करतात-
पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे इतर लोक त्यांना चुकीची वागणूक देतात अशी सतत तक्रार करतात.ब-याचदा अशा आरोपामध्ये काहीही तथ्य नसते.स्वत:मध्ये काहीतरी कमतरता आहेे हे त्यांना मुळीच पटत नाही.मनिष नेहमी त्यांच्या बॉस अथवा मित्रांकडून त्याचे बुलींग केले जाते अशी तक्रार करत असतो.पण ते थांबविण्यासाठी त्याविरुद्ध लढण्यास मात्र तो कधीच तयार नसतो.
५.जबाबदारी विसरण्याचे नाटक करतात-
समजा मनिषची कलीग मिनाक्षी हिने मनिषकडे त्याचे एखादे पुस्तक मागितले.तर मनिष त्याच्या पुस्तकांच्या बाबतीत फारच पझेसिव्ह असल्याने तिला थेट नाही म्हणत नाही.मात्र तो तिला सोयीस्करपणे प्रत्येकवेळी ते पुस्तक विसरल्याचे सांगतो.पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे नेहमी आपल्या जबाबदा-यांपासून पळ काढण्यासाठी काहीतरी शुल्लक कारण सांगतात.
६.सल्ला सकारत्मक दृष्टीने घेत नाहीत-
पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे नेहमी त्यांच्या क्षमतेचा अपमान होत आहे असा विचार करतात.समजा जर मनिषची बॉस लक्ष्मी हिने त्याला त्याचे काम वेळेत करण्यासाठी एखादा चांगला सल्ला दिला तर तो दिवसभर त्यांच्या आत्मविश्वासाबाबत अविश्वास दाखविल्याची तक्रार करत अथवा धुसफुस करत राहतो.
७. आयत्यावेळी कामात अडथळे आणतात-
पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसांकडे षडयंत्र करुन कामात अडथळा आणणे हा एक शेवटचा मार्ग असतो.समजा अशा व्यक्तीचे प्रमोशन नाही झाले तर त्याच्या टीममेंबर्स व बॉस ने त्याची काहीही चुक नसताना त्याला उगाचच टारगेट केले आहे असे वाटते.अशा वेळी तो त्याच्या इतर टीममेंबर्संना धडा शिकवण्यासाठी एखाद्या महत्वाच्या प्रेझेंटेशन मधून आयत्यावेळी काढता पाय घेतो.
८.वरिष्टांबाबत नेहमी तक्रार करतात-
पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसांना नेहमी अधिकारी व्यक्ती जसे की बॉस,पालक अथवा जोडीदार यांच्यासोबत समस्या असतात.अशी माणसे सतत या लोकांची तक्रार करीत असतात.
जसे की वैैयक्तिक आयुष्यात मनिषची बायको ही एक खंबीर व एक डॉमिनंट व्यक्ती आहे जी कोणासमोरही बेधडकपणे बोलण्यास घाबरत नाही.त्यामुळे तिच्यासमोर काही बोलण्याची मनिषची अजिबात हिंमत नसते.मात्र तो तिच्याबाबत त्याच्या आईकडे सतत तक्रार करतो.ज्यामुळे त्याच्या आईचे व त्याच्या पत्नीचे नाते चांगले नाही.
पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे माणसांसोबत राहणे फारच त्रायदायक असते.त्यामुळे अशा माणसांसोबत संवाद साधताना या काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा-
-
त्यांच्याकडून एखादे आश्वासन घेताना ते पुर्ण केले जाईल याची खात्री करुन घ्या.
-
जर तुमचे ऑफीस कलीग पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह असतील तर त्यांच्यावर पुर्णपणे अवलंबून राहू नका.त्याऐवजी कामाचा एखादा पर्याय तुमच्यासाठी नेहमीच खुला ठेवा.
-
अशा लोकांसमोर खंबीरपणे वागा.
-
पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह माणसे काहीही कारण देतात त्यामुळे त्यांना अशावेळी योग्य उत्तर द्या.
-
जर तुमचा जोडीदार पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह असेल तर त्यांच्या सोबत चांगले वागा व त्याचा विश्वास संपादन करा.ज्यामुळे ते देखील तुमच्यासोबत चांगले वागतील.
संदर्भ-
1. Whitson, S. (2013). The Passive Aggressive Conflict Cycle. Storms, 16. 2. Freeman, A., Pretzer, J., Fleming, B., & Simon, K. M. (1990). Passive-Aggressive Personality Disorder. In Clinical Applications of Cognitive Therapy (pp. 291-304). Springer US.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock