Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बॉडी शेपर वापरल्यामुळे शरीर सुडौल होते का?

$
0
0

अनेक महिला वाढलेले शरीर लपवण्यासाठी टमी टकर अथवा बॉडी शेपर,शेप वेअर चा वापर करतात.काही विशिष्ट प्रकारच्या आउटफीट मध्ये बॉडी शेपर घातल्याने तुमचे शरीर सुडौल दिसू लागते.कारण त्यामुळे तुमचे वाढलेले शरीर तात्पुरते लपविले जाते.पण टमी टकर अथवा बॉडी शेपर वापरण्याबाबत अनेकांच्या निरनिराळ्या शंका असतात.

यासाठी Unmonk of Wellness चे फाउंडर व वेलनेस कोच आणि एंटरप्रेनर विक्रम दत्ता यांच्याकडून जाणून घेऊयात बॉडीशेपरचा तुम्हाला कितपत फायदा होऊ शकतो व सुडौल दिसण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स.

सर्वात प्रथम टोनिंग दी अॅब्स म्हणजे काय ते समजावून घेऊयात.जेव्हा एखादी व्यक्ती मला बॉडी टोनिंग करायचे असे सांगते तेव्हा त्या व्यक्तीला तिच्या शरीरातील अतिरिक्त चरबीचे लेअर कमी करायचे असतात.त्वचेच्या खाली असलेल्या चरबीला अॅडीपोज टीश्यू असे म्हणतात जे फ्लॅबी व सॉफ्ट असतात ज्यामुळे ते दुमडले जातात.त्वचे खालील चरबी कमी झाल्यामुळे शरीर सुडौल दिसू लागते.यासोबत वाचा सिक्स पॅक अ‍ॅब्स हवेत? मग करा ‘प्लान्क’ व्यायामाचे हे 5 प्रकार

टमी टकर अथवा बॉडी शेपर घालल्यामुळे दाब येऊन शरीराचा आकार बदलतो.याचा आंतरिक शरीररचनेवर कोणताही परिणाम होत नाही.चरबी कमी झाल्यामुळे टोनिंग दी अॅब्स ही एक शारीरिक गोष्ट घडते.त्यामुळे शरीर निराळे दिसू लागते.आपले शरीर हे आपण जे अन्न खातो त्यातून तयार होत असते.त्यामुळे आपले शरीर फॅट आहे की फीट आहे हे खरेतर आपण शरीराला काय अन्न देतो,बसून काम करतो की कार्यशील आहोत यावर अवलंबून असते.टमी टकर अथवा बॉडी शेपर हे फक्त कॉस्टमेटीक टेम्पररी फिक्सेस असतात.त्यामुळे त्यांचा खरे वास्तवात शरीर सुडौल होण्यासाठी उपयोग होत नाही.तसेच वाचा कसा प्रिया बापटचा नवा फिटनेस फंडा तुम्हांलाही प्रेरित करेल !

जर दिवसभर किंवा दीर्घ काळ किंवा व्यायाम करताना बॉडी शेपर घातले तर फायदा होऊ शकतो का?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉडी शेपरमुळे स्नायूंवर काहीही परिणाम होत नाही तर त्यामुळे फक्त शरीर काही काळासाठी दाबले जाते.स्नायूंचे आंकूचन पावणे ही एक निराळी गोष्ट आहे.स्नायू आंकुचन व प्रसरण पावल्यामुळेच आपण शरीराची हालचाल करु शकतो.आपल्या शरीराच्या अंतर्गत ही प्रक्रिया सुरु असते.त्याचप्रमाणे पोटाचे स्नायू आंकुचन पावल्याने पोटाचा भाग कमी होणे,त्या भागातील चरबीचे लेअर कमी होणे असे काहीही होत नाही.सहाजिकच बॉडी शेपर घालल्यामुळे फक्त शरीराचा बाहेरील भाग दाबला जातो,ज्यामुळे श्वसन करण्यास त्रास होतो व शरीर तात्पुरते बनावट रितीने सुडौल दिसते.

बॉडी शेपर चा तुमच्या शरीराच्या अंतर्गत रचनेवर काहीही परिणाम होत नसल्यामुळे ते घातल्याने तुमच्या शरीरातील फॅट कमी होत नाहीत.त्यामुळे चरबी कमी न झाल्यामुळे शरीर देखील सुडौल होत नाही.बॉडी शेपर मुळे शरीर सुडौल होते हा एक गैरसमज आहे.पोटाची चरबी कमी करण्यात, ‘ कडूलिंबाची फुले’ गुणकारी !हे देखील जरुर वाचा.

जर शरीर सुडौल करायचे असेल तर शरीर निरोगी ठेवणे हाच एक उत्तम उपाय आहे.यायाठी संपुर्ण शरीराला नियमित व्यायामाची गरज असते.(फक्त अॅब्जसाठी नाही)तसेच चांगल्या आहाराची देखील आवश्यक्ता असते.त्याचप्रमाणे व्यायाम करताना बॉडी शेपर घालल्याने देखील काहीही चांगला परिणाम होणार नाही.अॅब एक्सरसाइज केल्यास पोटातील स्नायू मजबूत होतात.चांगल्या वर्कआउट रुटीन व योग्य आहारामुळे तुमचे फॅट कमी होणे हा बीएमआर(बेसल मेटाबॉलीक रेट) सुधारल्याचा परिणाम असतो.फक्त अॅब एक्सरसाइज करुन बीएमआर सुधारु शकत नाही अथवा त्यामुळे स्नायू मजबूत व शरीर सुडौल होत नाही.

स्ट्रेन्थ,इंन्डूरन्स व फ्लेक्सिबिलीटी ट्रेनिंगचे कॉम्बिनेशन व योगा प्रॅक्टीस मुळे शरीरावर चांगले परिणाम होतात.तसेच शरीराचे कार्य देखील सुधारते.त्यामुळे सहाजिकच शरीर सुडौल देखील होते.यासाठी जाणून घ्या अतिलठ्ठ लोकांनी कशी कराल योगाभ्यासाला सुरवात ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>