मी ५० वर्षांचा असून मला मधुमेह आहे. गेल्याच महिन्यात माझ्या एका मित्राला बहिरेपणाची समस्या उद्भवली. त्याचे असे म्हणणे आहे की अनियंत्रित मधुमेहामुळे त्याला हा त्रास होत आहे. खरंच मधुमेहामुळे बहिरेपणा येतो का ? अनियंत्रित ग्लुकोजमुळे कानाच्या आरोग्यावर परिणाम होतो, हे कसे ओळखावे? मला खूप चिंता वाटते. कृपया मला मार्गदर्शन करा.
या प्रश्नाचे उत्तर एसआरव्ही हॉस्पिटलचे डायबोटोलॉजिस्ट डॉ. अभय विसपुते यांनी दिले.
सध्या, भारतात ६५.१ मिलियन पेक्षा अधिक लोकांना मधुमेह आहे आणि प्रत्येक वर्षी हे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे अवेळी जेवणे, अपुरी झोप, शारीरिक व्यायामाचा अभाव, बदलेली जीवनशैली, अन्नाचे अति सेवन आणि भावनिक अस्वस्थता. या सगळ्या बदलांमुळे शरीरात इन्सुलिन तयार होण्यास अडथळा येतो. तसंच मधुमेह नियंत्रित करण्यासाठी शरीरात इन्सुलिन योग्य प्रकारे वापरले जात नाही आणि त्यामुळे मधुमेहामुळे होणारे त्रास वाढीस लागतात. त्यापैकी एक म्हणजे बहिरेपणा. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय
अनियंत्रित ब्लड शुगर, रक्तदाब आणि ब्लड लिपिड्स मुळे कानाच्या आतील भागातील रक्तवाहिन्यांत ब्लॉकेजेस होतात व बहिरेपणा येतो. माझ्या सुमारे १३-१५% मधुमेही रुग्णांना बहिरेपणाचा त्रास आहे. साधारणपणे हा त्रास ज्याचे वय ४५ पेक्षा जास्त आहे आणि त्यांचे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित आहे, त्यांना होतो. कानात खाज येणे, कानातून आवाज येणे असे त्रास सुरुवातीला होतात आणि हळूहळू बहिरेपणाला सामोरे जावे लागते. मधुमेहींमध्ये मायक्रोव्हॅस्कुलर ब्लड सप्लाय कमी प्रमाणात होतो. त्यामुळे कानातील आतल्या भागात डीजेनेरेटिव्ह चेंजेस जलद गतीने होतात. त्यामुळे दोघांपैकी एका कानात कमी किंवा अधिक प्रमाणात रक्तपुरवठा होतो. परिणामी कानाच्या आतील भागावर ताण येतो. म्हणून जर तुम्हाला कोणत्याही एका कानात इको साऊंड ऐकू येत असेल तर हा बहिरेपणाचा संकेत असू शकतो. नक्की वाचा: तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
बहिरेपणावर एकच उपाय म्हणजे ऐकू येण्याची मशीन वापरणे. म्हणून नियमित कान तपासून घेणे योग्य ठरेल. २-३ वर्षांतून एकदा audiogram करून घ्या. तसंच बहिरेपणाला आळा घालण्यासाठी बहिरेपणाच्या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बहिरेपणा हा मधुमेह नसलेल्या व्यक्तीला ही येऊ शकतो. परंतु, मधुमेह असणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असतो. योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock