Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

खाण्यापूर्वीच कशी ओळखाल भेसळयुक्त आणि खराब अंडी !

$
0
0

कोलकत्ता, चैन्नई पाठोपाठ डोबिंवलीतही अंड्यामध्ये प्लॅस्टिक सदृश्य घटक सापडल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मांसाहारी प्रेमींसाठी अगदी नाश्त्यालाही अंड्यापासून अनेक टेस्टी पदार्थ झटपट तयार होत असल्याने अनेकजण आहारात अंड्यांची निवड करतात. परंतू अंड्यांमध्येही आता भेसळ होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर अंडी विकत घेताना तसेच त्यापासून पदार्थ बनवताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Central Poultry Development Organization, गोरेगाव येथील असिसटंट डिरेक्टर डॉ.सत्यनारायण स्वामी यांनी याबाबत काही टीप्स शेअर केल्या आहेत.

डॉ. स्वामी यांच्या सल्ल्यानुसार, प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात अंडी कोल्ड स्टोरेजमधून थेट बाहेर काढल्यानंतर खराब होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे या दिवसात अंड खाताना थोडी काळजी आणि सजगता पाळणं गरजेचे आहे. काही घातक केमिकल्सचा वापर करून नकली अंडी बनवली जातात. जाणून घ्या गावठी की पांढरी अंडी खाणे अधिक फायदेशीर ?

अंड्यामधील भेसळ कशाप्रकारे ओळखाल ?

  • अंड्याच्या कवचावरून, रंगावरून तुम्ही साधारण अंदाज लावू शकता.
  • आपल्याकडे अंड्याचे कोणतेच विशिष्ट किंवा स्टॅन्डर्ड वजन असावे असा नियम नाही. त्यामुळे बाजारात विविध वजनात अंडी उपलब्ध आहेत. पण अंड नकली बनवले असेल तर सहाजिकच ते जड असण्याची शक्यता असते. जड वाटणारी अंडी नीट पडताळून निवडा.
  • सामान्य अंड्यामधील पिवळा बल्क हा मऊ असतो. पण अंड्यांमध्ये भेसळ केलेली असेल तर ते कडक असते. तव्यावर टाकल्यानंतर व्यवस्थित पसरत नाही.
  • अंड नीट फेटता येत नसेल, वॉटर पेंटप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी असेल, आतील बॅटर सामान्य अंड्यांप्रमाणे पातळ नसेल तर ते भेसळयुक्त असल्याची शक्यता असते.
  • अंड्याच्या आतील भाग रबरी जाणवल्यास त्याचा वापर टाळा.

आहारतज्ञ कांचन पटवर्धन यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार 22-35 डिग्री सेल्सिअलमध्ये अन्नपदार्थांमध्ये मायक्रोबायल बदल झपाट्याने होतात. त्यामुळे अन्न उन्हाळ्याच्या दिवसात खराब होते. अंड्याच्या कवचामध्ये डोळ्यांना दिसत नसले तरीही सुक्ष्म छिद्र असू शकतात. यामधून मायक्रोबायल वाढ होऊन अंड खराब होते.

सुमारे 42-45 डिग्री सेल्सिअस तापमान असल्यास कोल्ड स्टोरेजमधून काढलेली अंडी थेट उष्ण वातावरणात गेल्यास  अंड्यातील पांढरा भाग, त्यामधील प्रोटीन घटक यामध्ये स्टीफनेस वाढतो. परिणामी पांढर्‍या रंगांच्या गुठ्ळ्या वाढण्याची शक्यता असते. या तापमानात अन्न पूर्ण शिजत नाही मात्र त्याच्यामध्ये काही बदल होतात.

उन्हाळ्याच्या दिवसात अंड खाण्यापूर्वी ते चांगल्या स्थितीत असल्याची खात्री कशी कराल ?

  • अंड्याचा वापर करण्यापूर्वी ते पातेल्याभर पाण्यात  भिजत ठेवा. जर अंड वर तरंगले तर ते खाण्यास योग्य आहे. मात्र ते तळाशी गेल्यास खराब झाल्याचे संकेत देते.
  • अंड फोडल्यानंतर त्यामधील पिवळा भाग मऊ असावा तर पांढरा भाग हा पारदर्शी असावा.
  • अंड फोडल्यानंतर त्यामधील भागात लालसर डाग दिसल्यास त्याचा वापर टाळा.
  • अंड फोडल्यानंतर फार उग्र वास आल्यास त्याचा वापर कटाक्षाने टाळा.

अंड्यांना सुद्धा एक्सपायरी डेट असते. सामान्यपणे सात दिवसांपेक्षा अधिक दिवसांपूर्वीची अंडी जेवणात वापरू नका.मायक्रोबायल वाढ झालेली,खराब अंडी पोटात गेल्यास पचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळेस पोटात गॅस होणं, अपचन किंवा लूझ मोशनचा त्रास होऊ शकतो. मग उन्हाळ्यात अंड खाणे टाळावे का ? याबाबतचा सल्ला नक्की जाणून घ्या.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>