वर्ल्ड हेल्थ डे च्या निमित्ताने WHO (World Health Organization) यांनी डिप्रेशन या विषयावर जागरूकता निर्माण करण्याचे ठरवले आहे. या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन आम्ही Dr Vaidya’s – New Age Ayurveda च्या आयुर्वेदीक एक्स्पर्ट डॉ. सूर्या भगवती यांच्यांशी संवाद साधला. डिप्रेशनवर मात करण्यासाठी आयुर्वेद कसे फायदेशीर आहे आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने तुम्ही अधिक आरोग्यदायी आयुष्य कसे जगू शकता यावर त्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !
आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि शरीरात होणारे वेगवेगळ्या प्रकारचे असंतुलन याचा परिणाम डिप्रेशन मध्ये होतो. आयुर्वेदात डिप्रेशन म्हणजे मनोअवस्था. सत्त्व, राजस, तामस या मानसिक ऊर्जेचे असंतुलित प्रमाण आणि वात, पित्त, कफ या शारीरिक ऊर्जेचे असंतुलन यामुळे मानसिक पातळीवर असंतुलन निर्माण होते. डिप्रेशनमध्ये सात्विक ऊर्जा कमी होवून राजसिक आणि तामसिक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. प्रामुख्याने कफ प्रवृत्तीत झालेले असंतुलन हे डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरते. etiological factors शी संबंध आल्यास वात आणि पित्त प्रवृत्तीत असंतुलन होते. त्याचा परिणाम न्यूरोहार्मोन्सवर होतो. neuroendocrine सेल्स मधून स्त्रवणाऱ्या हार्मोन्स म्हणजे न्यूरोहार्मोन्स. हे सेल्स मेंदू, पाठीचा कणा आणि हृदयात असतात. नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी
जर तुमची कफ प्रवृत्ती असेल तर तुम्ही आळशी, सुस्तावलेले, घाबरलेले आणि डिप्रेसड असता. अतिरिक्त कफ ऊर्जेमुळे शरीरात मॉईश्चर तयार होते. जेव्हा तुम्ही तुमची कफ प्रवृत्ती योग्य आहाराने संतुलित करता तेव्हा तुम्हाला शरीरात जडत्व जाणवते. डीप्रेस मूड सुधारायला आहारात करा हे बदल !
कोणते अन्न घ्यावे?
- फळे: सफरचंद, चेरीज, ब्लॅकबेरीज, आंबा, पेर, सुकलेले अंजीर, सुकलेल्या क्रॅनबेरीज, जर्दाळू, डाळिंब, मनुका.
- भाज्या: ब्रोकोली, शतावरी, बीट, गाजर, फ्लॉवर, लसूण, पालेभाज्या, मशरूम, कांदा, बटाटा, पालक, मुळा, रंगीत शिमला मिरची, मटार, भेंडी आणि मोड आलेली कडधान्ये.
- धान्य: सातू, मका, ज्वारी.
- डाळी: काबोली चणे, मसूर.
- दुग्धजन्य पदार्थ: तूप, बकरीचे दूध. (प्रमाणात)
- दाणे आणि बिया: भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया. (प्रमाणात)
- तेल: मक्याचे तेल, मोहरीचे तेल. ( mustard oil)
- गोड पदार्थ: मध (कच्च्या स्वरूपात)
- मसाले: काळीमिरी, आलं, हळद, कोथिंबीर, जिरं.
- औषधी वनस्पती: अश्वगंधा, ब्राम्ही, शंखपुष्पी, शतावरी, वेलची आणि वेखंड.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock