या सतत वाढणाऱ्या उन्हात भूक न लागणे हे अगदी सामान्य आहे. पण योग्य प्रमाणात खाणे आणि भरपूर पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक आहे. उन्हाळ्यात सलाड, कच्च्या भाज्या, फळे खाल्याने तुमचे पोट भरलेले राहते व तुम्हाला हलके वाटते. म्हणून उन्हाळ्यासाठी खास शेफ संजीव कपूर यांनी सांगितलेले फळं आणि भाज्यांचं तिखट व मसालेदार सलाड नक्की ट्राय करा. उन्हाळ्यात घ्या आस्वाद या ’5′ स्वादिष्ट अन अल्हाददायक सलाड्सचा !
सायट्रस फाळांचे फायदे, काकडीचा थंडावा आणि शिमला मिरचीत असलेल्या लो कॅलरीज यामुळे उन्हाळासाठी हे सलाड एक उत्तम पर्याय ठरेल. तसंच हे पदार्थ अन्नपचनास फायदेशीर ठरतात आणि त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात. द्राक्षात भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तुम्ही हायड्रेटेड राहता. द्राक्षांमुळे इम्म्युनिटी वाढीस लागते. तसंच त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा फळे घालू शकता. लिंबाचा रस, चाट मसाला घालून हे मस्त सलाड तयार होते. मग जाणून घेऊया हा उन्हाळा सुसह्य करणारी ही हेल्दी सलाड रेसिपी. कलरफूल आणि टेस्टी बीटरूट सॅलॅड
साहीत्य:
- २ कापलेले सफरचंद.
- २ संत्री (संत्राच्या फोडी).
- १०-१२ हिरवी द्राक्षे कापलेली.
- १०-१२ काळी द्राक्षे कापलेली..
- १ हिरवी शिमला मिरची कापलेली
- १ काकडी कापलेली. उन्हाळा विशेष -: थंडगार काकडी रायता
- १ टोमॅटो कापलेला.
- १ कांद्याची पात बारीक चिरलेली.
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.
- १ छोटा चमचा चाट मसाला.
- १ छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल.
- मीठ चवीनुसार.
- २ छोटे चमचे लिंबाचा रस. उन्हाळ्यातील रिफ्रेशिंग पेय – जलजीरा
कृती:
- सुरवातीला कापलेल्या सफरचंदच्या फोडींमध्ये लिंबाचा रस घाला. उन्हाळा सुसह्य करायचाय ? मग आंबेडाळ व कैरीचं पन्ह घ्या !
- त्यानंतर बाकी फळे, भाज्या कापून घ्या.
- टोमॅटो घालताना तुम्ही टोमॅटोचा आतला गर काढून फक्त वरचा भाग घेऊ शकता. त्यामुळे सलाडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक होणार नाही.
- आता एका भांड्यात सगळ्या भाज्या, फळे एकत्र करा. त्यावर चाट मसाला, मीठ, ऑलिव्ह ऑइल घाला. सगळे मिश्रण नीट मिक्स करा. थोडा वेळ थंड करा आणि थंडगार सलाडचा आस्वाद घ्या. उन्हाळ्यातील हेल्दी टेस्टी काकडीचे सॅलॅड !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock